मेल्ट्रॉनच्या कोविड सेंटरमध्ये अपुरा औषध साठा, रूग्णांना बाहेरून आणावी लागत आहेत औषधे; मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

औरंगाबाद | चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या कोवीड केअर सेंटरमध्ये औषधी उपलब्ध नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी विकत आणावी लागत असल्याने तात्काळ या सेंटरवर औषधी उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मागील वर्षी कोरोनाचे रुग्ण वाढताच रेमडेसेवीर इंजेक्शनच्या मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत आली होती. शहरातील अनेक रुग्णालयांना या औषधाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले होते. रुग्णांच्या नातेवाईकांवर वेळेवर धावाधाव करण्याची वेळ आली होती. काळाबाजार फोफावला होता. असाच प्रकार याहीवर्षी सुरू असून चिकलठाणा येथील मेल्ट्रॉन कंपनीच्या कोविड केअर सेंटरमध्ये औषधी उपलब्ध नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधी खरेदी करुन या सेंटरमध्ये द्यावी लागत आहे. काही नातेवाईकांनी आपले दागिने विकून औषधी खरेदी केल्याचा प्रकार या ठिकाणी दिसून आला असल्याचं वास्तव मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणलं होतं.

औषधी साठा उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची होत असलेली फरपट थांबविण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, चंदू नवपुते, संतोष कुटे, दीपक पवार, बाबुराव जाधव यांची उपस्थिती होती.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

You might also like