जयकुमार गोरे यांना 11 ऑगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर

Jayakumar Gore

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मायणी (ता. खटाव) येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे आज सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीशांपुढे शरण आले होते. न्यायालयाने अर्जावर 11 ऑगस्टपर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला. पुढील सुनावणी 11 ऑगस्टला होणार आहे. मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार … Read more

अबब ! शेतकऱ्याकडे 1 कोटीच्या लाचेची मागणी : पोलिस दलात खळबळ

कोल्हापूर | पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण खंडपीठ येथे दाखल दाव्यांचा निकाल आपल्या बाजूने करून देतो, असे सांगून पुण्यातील शेतकऱ्याकडे तब्बल एक कोटीच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. कोल्हापूर पोलीस मुख्यालयातील कॉन्स्टेबल जॉन वसंत तिवडे (वय- 40, रा. कोरोची, ता. हातकणंगले ) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लाचेसाठी एक कोटीची पोलिसांकडून मागणी … Read more

साताऱ्यात 10 महिन्याच्या बाळाचा विहिरीत टाकून खून : आरोपी चुलत्यास अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील एमआयडीसी परिसरात घरगुती वादातून चुलत्याने 10 महिन्याच्या लहान चिमुकल्याला विहिरीमध्ये टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. शलमोल मयुर सोनवणे असे विहिरीत टाकलेल्या 10 महिन्याचे बाळाचे नाव असून त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा पोलिस … Read more

पोक्सो अंतर्गत युवकास 7 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके लग्नाचे अमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकास सातारा न्यायालयाने पोक्सो अंतर्गत दोषी ठरवून 7 वर्षे सक्तमजुरी व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सागर बलभीम कांबळे (वय-24, रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी, सदरबझार, सातारा) असे शिक्षा झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेली … Read more

पोलिस सुस्त… चोरटे मस्त : एका रात्रीत 15 घरे फोडली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी चाफळ विभागातील 5 गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका रात्रीत बंद 15 घरे फोडली  आहेत. या घरफोडीत सुमारे 19 तोळे सोन्यासह लाखांचा ऐवज केला लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. या घरफोडीमुळे चाफळ विभागात घबराटीचे वातावरण आहे. तर पोलिसांच्या रात्र गस्ती नसल्याने व कामचुकारपणामुळे अशा पध्दतीने चोरट्यांनी लक्ष केल्याचे ग्रामस्थ सांगत … Read more

सातारा- पंढरपूर हायवेवर भीषण अपघात 3 जण जागीच ठार : वाहने 300 फूटावर फेकली गेली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा- पंढरपूर महामार्गावर गोंदवले खुर्दजवळ समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात तिघे तरुण जागेवरच ठार झाले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की चक्काचूर झालेली अपघातग्रस्त वाहने सुमारे तीनशे फूट अंतरापर्यंत दूरपर्यंत जाऊन पडली होती. सर्व मृत पळशी आणि दीडवाघवाडी (ता. माण) येथील असल्याने पळशी व दिडवाघवाडी … Read more

बेलवडे हवेली येथील छाप्यात अवैध पिस्तूलसह दोघांना अटक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी बेलवडे हवेली (ता. कराड) येथे छापा टाकून अवैध पिस्तूल बाळगल्याबद्दल दोघांना अटक करण्यात आली आहे. तळबीड पोलिसांनी रात्री सापळा रचून योगेश पवार (वय- 37) आणि समाधान देशमुख (वय- 19, दोघे रा. बेलवडे हवेली) अशी ताब्यात घेतलेल्याची नावे आहेत. त्यांच्याकडून चायना बनावटीचे 50 हजारांचे पिस्तूल जप्त केले आहे. तळबीड पोलिसांनी दिलेली … Read more

कामाचे बिल काढण्यासाठी 2 टक्के लाच घेताना अभियंता जाळ्यात सापडला

ACB

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके कामाचे बिल मंजूर करून ते वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी दोन टक्के लाच मागणाऱ्या जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी सतीश पंचप्पा लब्बा (वय- 48, मूळ रा. सिध्देश्वर पेठ, सोलापूर, सध्या रा.- सदरबझार) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. सतीश लब्बा यांच्या कार्यालयातच दुपारी पावणेतीन वाजता त्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात … Read more

पुणे- बेंगलोर महामार्गावर अपघातात पती- पत्नी ठार, 4 जखमी : वेगनार गाडीची उभ्या ट्रकला धडक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे- बंगलोर महामार्गावर सातारा जिल्ह्यातील नागठाणे वेगनार गाडीने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. मंगळवारी दि. 3 रोजी पहाटे 6 वाजण्यच्या सुमारास झालेल्या या अपघातात पती- पत्नी ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या लेनवरती हा अपघात झाला असून वेगनार गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. … Read more

फलटणला गोष्ट एकाच्या तिसऱ्या लग्नातील राडेबाजीची : नातेवाईंकाना मारहाण

Phaltan Police

फलटण | दुधेबावी (ता. फलटण) मंगळवारी येथे सुरू असलेल्या एकाच्या तिसऱ्या लग्नातील राडेबाजी गोष्ट जोरदार चर्चेत आलेली आहे. तिसरे लग्न करत असलेल्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने विरोध केल्याने मंदिरातच दोन गटात तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुधेबावी येथे गणेश वामन एकळ यांचे तिसरे … Read more