साऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कन्नड मधील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मेबीना मायकल हिचे वयाच्या २२ व्य वर्षी निधन झाले आहे. एका रस्तेअपघातात ही दुर्घटना घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी ती आपल्या गावी मैदिकरी येथे जाण्यास निघाली होती. पण तिच्या गाडीची आणि समोरून येणाऱ्या एका ट्रकची धडक झाल्याने हा अपघात झाला होता. अपघातात मेबीनाचे निधन झाल्यामुळे कन्नड चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली … Read more

लॉकडाऊनचा नियम मोडू नये, म्हणून ‘या’ देशाचे पंतप्रधान आपल्या मरणासन्न आईला भेटू शकले नाहीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नेदरलँड्सचे पंतप्रधान मार्क रुट्टे यांनी जगभरातील सर्व नेत्यांसाठी एक उदाहरण ठेवले आहे. ज्याची सध्या सगळीकडे खूप चर्चा होते आहे. पीएम मार्क यांची आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती आणि त्या जगणे शक्य नसल्याचे त्यांच्या डॉक्टरांनीही सांगितले होते. मात्र, कोरोनाव्हायरसमुळे देशात लागू असलेल्या लॉकडाउनमुळे मार्क यांना शेवटच्या क्षणीसुद्धा त्यांच्या आईला भेटता आले … Read more

पाणी भरण्यासाठी विरीरीवर गेलेल्या माय-लेकीचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी । शेतातील विहिरीवर पाणी भरताना चिमुकली पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी आईने विहिरीत उडी मारली. मात्र दुर्दैवाने दोन्ही मायलेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील विटेकरवाडीत घडली. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालय अंतर्गत असलेल्या फुलंब्री पोलीस ठाण्यात … Read more

तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या बलबीरसिंग सिनिअर यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन आठवड्यांपासून विविध आजारांशी झगडत असलेले तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या बलबीरसिंग सिनिअर यांचे सोमवारी निधन झाले. बलबीर यांच्या पश्चात त्यांची मुलगी सुशबीर आणि तीन मुले कंवलबीर, करणबीर आणि गुरबीर असा परिवार आहे. मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक अभिजीत सिंग यांनी प्रेस ट्रस्टला सांगितले की,” सकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. … Read more

सोलापूरात दिवसभरात ४९ नवे कोरोनाग्रस्त; ६ जणांचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सहा व्यक्तींचा कोरोना मुळे काल मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सहा व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या 46 झाली आहे. आज दिवसभरात 49 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधित व्यक्तींची संख्या 565 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. … Read more

कोरोना संक्रमणाच्या बाबतीत ब्राझील जगात २ ऱ्या क्रमांकावर; ३ लाख ३० जणांना बाधा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेनंतर आता ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या जगात सर्वाधिक झाली आहे. आदल्याच दिवशी रशिया जगातील दुसर्‍या क्रमांकावर होता. १९९६९ नवीन कोरोना प्रकरणांच्या वाढीनंतर आता ब्राझील दुसर्‍या स्थानावर आला आहे. ब्राझीलमध्ये ३ लाख ३० हजार ८९० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अमेरिका आणि रशियामध्ये अनुक्रमे १६ लाख ४५ हजार आणि ३ … Read more

गावाकडे जाण्याची मिळाली परवानगी पण हर्षवायुने गेला जीव

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे । लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे हाल होत आहे. विशेष करून परप्रांतीय मजूरांचे अवस्था फारच बिकट आहे. अशा भीषण परिस्थितीत … अन गावाकडे जाण्यासाठी परवानगी मिळाली पण एका परप्रांतीय यंत्रमाग कामगाराला मृत्यूनेच कवटाळल्याची धक्कादायक घडली. उत्तर प्रदेशातील रामसखा सत्तन मौर्य असे या दुुर्दैवी परप्रांतीय यंत्रमाग कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे … Read more

गोदावरीच्या पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू ; परभणीतील दुर्देवी घटना

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील गोदावरी पात्रात मध्ये आज झालेल्या एका दुर्दैवी घटनेमध्ये हे दोघा बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे . पाथरी तालुक्यातील मरडसगाव येथे ही दुर्घटना घडली आहे . मर्डसगाव येथील दोन बालके सकाळी अकराच्या सुमारास गोदावरी पात्रातील पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी कृषी पंपाच्या पाणी उपसण्यासाठी खोदण्यात आलेल्या नदीपात्रातील … Read more

दाट रहिवाशी वस्तीत कोसळलं पाकिस्तानी प्रवासी विमान; कराची जवळील घटना

वृत्तसंस्था । पाकिस्तानच्या कराची शहराजवळ प्रवासी विमान कोसळल्याची घटना घडली आहे. PK८३०३ हे पाकिस्तानी विमान लाहोरहुन कराचीला निघाले होते. दुपारी १ वाजता हे विमान लाहोरहून निघाले होते. मात्र कराचीच्या जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याआधीच हे विमान रहिवाशी भागात कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विमान कोसळले असता धुराचे लोट सर्वदूर पसरल्याचे दिसून आले. कराची विमानतळापासून जवळ असणाऱ्या … Read more

सोलापुरात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू, चौदा रुग्ण वाढले, एकूण बाधित 470

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहर परिसरातील तीन जणांचा आज कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासात 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 470 त्र एकूण मृत व्यक्तींची संख्या 33 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.  आज मयत झालेली पहिली व्यक्ती साई बाबा चौक परिसरातील 74 वर्षाचे पुरुष असून 18 मे रोजी … Read more