‘विरोधकांची टीका म्हणजे, उचलली जीभ लावली कि टाळ्याला’; अशोक चव्हाणांचा पलटवार

मुंबई । मराठा आरक्षणासारख्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मुद्यावर विरोधी पक्षातले अनेक नेते बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत. या मुद्यावर त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे. त्यांच्या हाताला सध्या काहीच काम नाही. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना राज्याचे सार्वजनिक … Read more

‘गोपीनाथरावांनी मला एक राजकीय मंत्र दिला, तो म्हणजे’… ; फडणवीसांनी जागवल्या गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी

मुंबई । भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. राज्यभरातील नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या कार्याची आणि विचारांची पेरणी सोशल मीडियावर करताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरुन गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलंय. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ क्लीप शेअर केली आहे. त्यामध्ये, गोपीनाथ मुंडेंनीच माझ्यासारख्या … Read more

जलयुक्त शिवार घोटाळाप्रकरणी अजून दोन अधिकारी निलंबित; घोटाळ्याची व्याप्ती वाढतेय

बीड । माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प राहिलेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्याची व्याप्ती वाढताना पाहायला मिळत आहे. या घोटाळ्या प्रकरणात अजून दोन अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 4 डिसेंबरला ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय. निलंबित करण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांमध्ये अंबाजोगाई आणि बीड उपविभागीत कृषी अधिकारी व्ही. एम. मिसाळ आणइ तालुका … Read more

‘मी फडणवीसांवर नाराज असलो तरी…’; ‘पवार’ भेटीनंतर जानकरांची खदखद

बारामती । राज्यातील महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. ‘माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार,’ असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. जानकर आज बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

राज्यात एकट्याची सत्ता बसविण्याची संधी ३ पक्षांनी दिलीय! देवेंद्र फडणवीसांची ‘गिरे तो भी टांग उपर’ भूमिका

वाशीम । येत्या काळात महाराष्ट्रामध्ये एकट्याला सत्तेवर बसविण्याची संधी तिन्ही पक्षांनी दिली असून, त्याचा फायदा घेणार असल्याचं मोठं विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर जागा मिळविल्या आहेत, तसेच हैदराबाद इथं झालेल्या निवडणुकीत ही प्रचंड मोठं यश मिळालं आहे, असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी … Read more

एखाद्यानं पक्ष सोडला तर काय फरक पडतो ते आता कळेल; खडसेंचा हल्लाबोल

Khadse Fadanvis

जळगाव। विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कुणी पक्षातून बाहेर पडले म्हणजे पक्षाला काय फरक पडतो हे आता चंद्रकांत पाटील यांना कळेल. ते म्हणाले होते की हिमालयात निघून जाईन, आता मी तेच बघतोय ते हिमालयात … Read more

भाजपचा पराभव फाजिल नेतृत्वामुळे, ‘मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही’, एकनाथ खडसेंचा घणाघात

Khadse Fadanvis

जळगाव । विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाचपैकी एकाही जागेवर भाजपला वर्चस्व मिळवता आलं नाही. यानंतर महाविकास आघाडीचे नेते भाजपवर निशाणा साधत आहेत. “विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव हा फाजिल नेतृत्वामुळे झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही” अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) … Read more

फडणवीसांनी निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून पराभूत होतील; जयंत पाटलांचा टोला

मुंबई । राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. “फडणवीस यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून त्यांचा पराभव होईल”, असा खोचक टोला जयंत … Read more

फडणवीसांना मुख्यमंत्री करा! ३ महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा

मुंबई । “इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलंत तर तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे यांनी राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. त्यांनी ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप … Read more

‘मी मुख्यमंत्री पदावर असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झालीय’- देवेंद्र फडणवीस

पुणे । मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली असं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ”आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं,” असंही ते म्हणाले आहेत. आम्ही शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून ते भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत. मात्र, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या … Read more