चूक असेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करू पण भाजपला…; पुण्यातील घटनेवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल पुणे येथे भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. या कार्यक्रमात घडलेल्या घटनेवरून आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘कालच्या घटनेमध्ये चूक कोणाची आहे हे तपासले जाईल. त्यामध्ये जर राष्ट्रवादीची चूक असेल तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल … Read more

शरद पवारांकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन

Sharad Pawar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी निमित्त त्याच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मुंबईत शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा दौऱ्यात विशेष दक्षता … Read more

अनिल देशमुखांना क्लीन चिट? चांदिवाल आयोगाने मुख्यमंत्र्यांकडे सोपवला अहवाल

anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्य सरकार आणि तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. दरम्यान न्यायमूर्ती कैलास चांदीवाल आयोगाने त्यांच्या आरोपांच्या चौकशीचा तयार केलेला २०१ पानांचा अहवाल आज सादर केला आहे. तो राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. … Read more

राज्याला नवे गृहमंत्री मिळणार?? ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून राज्याच्या गृहमंत्री पदावरून दिलीप वळसे पाटील यांना हटवले जाणार असल्याची चर्चा आहे. गृहखाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हातात गृहखात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. १ मे पूर्वी हा बदल होऊ शकतो. TV9 मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे राज्यातील महाविकास … Read more

कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई करणार ; गृहराज्यमंत्री वळसे पाटील यांचे मोठे विधान

Dilip Walse Patil Loudspeaker

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशात कायदा व सुव्यवस्था योग्य प्रकारे राहावी याबाबत मुंबईचे पोलीस महासंचालक व अधिकाऱ्यांची गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली. “गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, अशावेळी कुणीही कायदा हातात घेऊ … Read more

धार्मिक स्थळांवर विनापरवाना भोंगा लावल्यास होणार कठोर कारवाई; मागर्दर्शक सूचना आज होणार जाहीर

Dilip Walse Patil Loudspeaker

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले नाहीत तर प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असा इशारा दिला आहे. त्याच्या इशाऱ्यानंतर आता राज्य सरकारकडून भोंग्यांबाबत नवीन मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून त्या आज जाहीर केल्या जाणार आहेत. सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार धार्मिक स्थळांवर विनापरवाना भोंगा लावल्यास … Read more

“प्रशासकीय यंत्रणा वसूलीचे षडयंत्र रचत असल्यास चौकशी करणार”; दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्रीय तपास यंत्रणेच्या नावाने प्रशासकीय यंत्रणा वसुलीचे षडयंत्र रचत आहे. याबाबत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाची घोषणा केली. भाजप आमदार आशिष शेलार यांनी सौरभ त्रिपाठी प्रकरणावर विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तसेच या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली. … Read more

शक्ती कायद्यावर अखेर राष्ट्रपतींची सही; विधानसभेत दिलीप वळसे-पाटलांची माहिती

Dilip Walse Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अत्याचाराच्या घटनांमुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने यावर निर्बध घालण्यात यावे म्हणून राज्य सरकारच्यावतीने शक्ती कायदा मंजूर करण्यात आला. या शक्ती कायद्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केली असल्याची माहिती आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली. या कायद्यामुळे स्त्रियांना अधिकाधिक संरक्षण देणाऱ्या शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा … Read more

“हा तर कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न”; ‘द काश्मीर फाईल्स’बाबत वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाबाबत आज मुंबईतील अधिवेशनात गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाचे विधान केले. ‘द काश्मीर फाईल्स’मुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे … Read more

पेनड्राइव्ह आरोपांची चौकशी सीआयडी करणार; गृहमंत्र्यांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या ‘पेनड्राइव्ह’ ची चौकशी सीआयडी करेल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत केली आहे. तसेच या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप आहे ते विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांनी राजीनामा दिला असल्याचे देखील त्यांनी सांगितले. प्रत्येक केस ही सीबीआयकडे द्या अशी मागणी करणे हे … Read more