ठाकरे गटाच्या नेत्याकडून एकनाथ शिंदेंना भर सभेत शिवीगाळ; पोलिसांची कठोर कारवाई

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राजकिय वर्तुळात नवा वाद निर्माण करणारी नुकतीच एक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेत उद्धव ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विक्रोळीतील राहत्या घरातून त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घटनेमुळे आता शिंदे गट आणि … Read more

एकनाथ शिंदेची तुलना थेट बाळासाहेब ठाकरेंशी; राजकरणात नवा वाद पेटला

Eknath shinde balasaheb thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे गटात आणि ठाकरे गटात दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद निर्माण होत आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदय सम्राट असा केल्यामुळे राजकिय वर्तुळात नव्या वादाची ठिणगी पेटली आहे. गुरुवारी विधानसभेच्या निवडणुकांत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी एकनाथ शिंदे राजस्थानला गेले होते. याठिकाणी गेल्यावर प्रचारावेळी … Read more

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!! सरकारने घेतला मोठा निर्णय

Student

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना दुसरीकडे मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने मराठा तसेच कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात निवासी वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची बाहेर राहण्यासंबंधीत मोठी अडचण दूर होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने, खासगी संस्थांना स्वत:च्या मालकीच्या इमारतीत … Read more

“24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा…” जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा

Manoj Jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| “येत्या 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावे जाहीर करू” असा थेट इशारा मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. आज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारला धारेवर धरले. तसेच, ‘जे आमचं आहे, तेच सरकार आम्हाला देत आहे, आम्ही कोणाचाही … Read more

ग्रामपंचायत निकाल : भाजप नंबर 1 तर मविआला झटका; पहा कोणत्या पक्षाला किती जागा?

Gram Panchayat elections

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यांतील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यानुसार एक एक निकाल समोर येत आहेत. सध्या हाती आलेल्या निकालानुसार, यंदा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने बाजी मारली आहे. तर शिवसेनेतून बाजूला पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने देखील विजय मिळवला आहे. परंतु दुसऱ्या बाजूला, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या हाती निराशा आल्याचे दिसत आहे. … Read more

जरांगे पाटलांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज; रूग्णालयात उपचार सुरू

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी सर्वपक्षीयांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. मात्र उपोषणानंतर आता मनोज जरांगे यांची प्रकृती आणखीन खालावली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या 9 दिवसांपासून उपाशी असल्यामुळे जरांगे पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. पहिल्या … Read more

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!! सरकारकडून वेतनासाठी 378 कोटींची मदत

ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने दिवाळी मुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांना एक गोड बातमी दिली आहे. सरकारने दिवाळीपूर्वीच एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तब्बल 378 कोटींचा निधी वितरीत केला आहे. त्यामुळे आता दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने केलेल्या या आर्थिक मदतीमुळे यंदा एसटी कर्मचारी दिवाळी धुमधडाक्यात साजरी करू शकणार आहेत. गेल्या काही काळापासून … Read more

Breaking !! मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; आरक्षणासाठी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मुदत

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आज आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 2 जानेवारी पर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. हे उपोषण मागे घेत, “राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आम्हाला वेळ मागितला आहे. काही हरकत नाही. थोडा वेळ देऊ. … Read more

सरकार अँक्शन मोडमध्ये! मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलवली सर्व पक्षीय बैठक

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. राज्य सरकार आरक्षण देत नसल्यामुळे मराठा समाजाने त्यांच्या विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. अनेक आमदार आणि खासदारांनी मराठा आरक्षणासाठी पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच, मराठा आंदोलकांनी जाळपोळ करणे, गाड्या फोडणे, दगडफेक करणे असे प्रकार घडवून आणले आहेत. यामुळे बीड आणि धाराशिवमध्ये संचारबंदीचे … Read more

राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा राज्यातील अनेक ठिकाणी कमी पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पहिल्या टप्प्यात … Read more