ठाकरे vs शिंदे सत्तासंघर्षाचे प्रकरण घटनापीठाकडे; निकाल लांबण्याची शक्यता

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने ही सुनावणी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. येत्या 25 ऑगस्टला घटनापीठाकडे या प्रकरणावर पहिली सुनावणी पार पडेल. यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीलाही 2 दिवसांची स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापूर्वी … Read more

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षावरील उद्या होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  24 तासांत दुसऱ्यांदा सुनावणी लांबणीवर पडणार आहे. खरं तर आजच यावर सुनावणी पार पडणार होती. पण आजची सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आणि आता उद्या होणारी सुनावणी अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सुप्रीम … Read more

नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून; विधानसभेत विधेयक मंजूर

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यासंदर्भातील विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मंजूर करून घेतले. तसेच जनतेचं मत जाणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. या विधेकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला. मात्र, सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड जनतेतूनच व्हावी … Read more

मग मुख्यमंत्रीही जनतेतूनच निवडा; अजितदादांचा सरकारवर निशाणा

ajit pawar shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे- फडणवीस सरकारने नगराध्यक्ष आणि सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. नगराध्यक्ष आणि सरपंच निवड ही थेट जनतेतून होणार असेल तर मुख्यमंत्र्यांची निवडही थेट जनतेतून का करत नाही ? असा थेट सवाल त्यांनी सभागृहात केला. तसेच या … Read more

50 थरांची हंडी दीड महिन्यांपूर्वी आम्ही फोडली; मुख्यमंत्री शिंदेंची फटकेबाजी

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सर्वात मोठी हंडी दीड महिन्यांपूर्वी आम्ही फोडली, आम्ही ५० थर लावले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला. ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर,खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासहित अनेक दिग्गज उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव … Read more

दहीहंडीला खेळाचा दर्जा, गोविंदांना सरकारी नोकरीत 5 टक्के आरक्षण; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच गोविदांना नोकरीत आरक्षण, तसेच गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य आणि जखमीस 5 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल असेही त्यांनी सांगितले. गोविंदांना यापुढे 5 टक्के कोट्यातून सरकारी नोकऱ्या देण्यात … Read more

दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय

Eknath Shinde Dahi Handi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदा दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या सणाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंहीहंडीबाबत आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्या … Read more

विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूची होणार CID चौकशी; मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश

Eknath Shinde CID

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे पक्षाचे संस्थापक विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. मेटे यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच त्याच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्याच्या पत्नीसह राजकीय नेत्यांनी केली. यानंतर विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस महासंचालकांना … Read more

राज्यातील ‘या’ नागरिकांना एसटी प्रवास मोफत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जेष्ठ नागरिकांना खुशखबर दिली आहे. वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल,अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे . त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ज्या नागरिकांनी आपली वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, … Read more

बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण शेवटी ती गुलामीच; शिवसेनेचा शिंदेंवर निशाणा

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून तत्पूर्वीच मंत्रिमंडळ खातेवाटपावरून शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे. बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण शेवटी ती गुलामीच… गुलामांना कधीच प्रतिष्ठा मिळत नाही अशी जोरदार टीका शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. विधानसभेचे पावसाळी … Read more