शिवसेनेला धक्का : तब्बल 35 वर्षांनी राष्ट्रवादीकडून सणबूर सोसायटीत सत्तांतर

पाटण | पाटण तालुक्यातील सणबूर येथील विकास सेवा सोसायटी निवडणुकीत माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या सणबूर सोसायटी बचाव पॅनेलने सत्ताधारी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या 35 वर्षांच्या सत्तेचा अक्षरशः धुव्वा उडवून 13 पैकी 11 जागा जिंकून सत्तांतर घडवले. सणबूर विकास सेवा सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी … Read more

युवक काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष : निवडणूकीत कुणाल राऊत, शिवराज मोरे शर्यतीत

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. वरिष्ठाच्याकडून मुलाखत झाल्यानंतर युवक प्रदेशाध्यक्ष यांची निवड जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या निकालानुसार कुणाल राऊत यांना सर्वाधिक 5 लाख 48 हजार 267 यांनी नंबर एकची मते … Read more

प्रतापगड कारखान्याचा निवडणूक प्रचाराचा कुडाळमध्ये शुभारंभ

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराचा शुभारंभ कुडाळ येथे आज सकाळी झाला. संस्थापक- सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी श्री गणेश व श्री पिंपळेश्वर-वाकडेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुरुवात केली आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी महिगाव याठिकणी कार्यकर्त्यांनी सभा आयोजित केली होती. सभेला मार्गदर्शन … Read more

आगामी निवडणुकात काॅंग्रेसकडून ओबीसींना 27 टक्के आरक्षण : भानुदास माळी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपने आरक्षण घालवले तर आमच्याच सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना हे ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. आगामी निवडणुकांसाठी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही हे जवळजवळ निश्चित झालेले आहे. अशा परिस्थितीत काही दिवसात पालिकाच्या निवडणुका होत आहेत, अशावेळी पालिका, स्थानिका स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत आमच्या काॅंग्रेस पक्षाने पक्षाअंतर्गत 27 … Read more

औरंगाबाद मनपा निवडणूकीचा मार्ग मोकळा; राजकीय वर्तुळात आनंदाला उधाण 

  औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाला काही निर्देश देऊन सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेविषयीची याचिका (एसएलपी) आज निकाली काढली. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश व्ही रामण्णा, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना व न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यामुळे महापालिका निवडणुकीचा मार्ग खुला झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. … Read more

एकहाती सत्ता : कोळे विकास सेवा सोसायटीत उंडाळकर गटाचा 13-0 ने विजय

कराड | कोळे विविध विकास सेवा सोसायटी निवडणूकीत 13-0 ने श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनेलने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. सोसायटीचे सर्व विजयी उमेदवार हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस, जिल्हा परिषद सदस्य, अँड. उदयसिंह विलासराव पाटील – उंडाळकर यांचे नेतृत्व मानणारे आहेत. दरम्यान श्री घाडगेनाथ ग्रामविकास पॅनेलने  एकहाती सत्ता मिळवली आहे. कोळे विविध विकास सेवा … Read more

मनपा निवडणूक; सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’

औरंगाबाद – राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकांचे प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभाग जाहीर झाले, सुनावणी, हरकती ही झाल्या प्रभागानुसार इच्छुक कामालाही लागले. मात्र, औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरूच आहे. अगोदर संगणकात तर्फे जनरेट होणारी तारीख 3 मार्च होती. आता 30 मार्च करण्यात आल्याचे याचिकाकर्ते समीर राजूरकर यांनी सांगितले. जानेवारी 2020 मध्ये राज्य … Read more

“ताकाला जाऊन मला भांड लपवायची सवय नाही, मी मतांची भिक मागायला आलोय” – चंद्रकांत पाटील

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. अनेक ठिकाणी जाऊन भाजप नेत्यांकडून महत्वाचं विधाने केली जात आहेत. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक विधान केले. “मी पुणे महानगरपालिकेसाठी मतांची भीक मागायला आलोय आणि तुमची मतं बुक करायला आलेलो आहे. ताकाला जाऊन मला भांड लपवायची सवय नाही,” … Read more

विंगमध्ये तब्बल 25 वर्षानंतर सत्तांतर : काॅंग्रेसला नाराजीचा फटका

कराड | विंग येथील विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत काॅंग्रेसच्या नाराज गटाच्या मदतीने जय हनुमान सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी 11- 2 असा विजय मिळवित सत्तांतर घडविले. विंग येथील सोसायटीत तब्बल 25 वर्षानंतर संत्तापालट झाली. जय हनुमान सहकार पॅनेलने विजय मिळवल्यानंतर गुलालाच्या उधळणीत मिरवणुक काढत विजयोत्सव साजरा केला. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे कराड दक्षिण व कराड उत्तर … Read more

किरपे विकास सेवा सोसायटीत दादा- बाबा गटाची सत्ता

कराड | तालुक्यातील किरपे येथील विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दादा- बाबा गटाने 9-3 असा विजय मिळविला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील यांच्या लक्ष्मी नारायण ग्रामविकास पॅनेलने विरोधी लक्ष्मी नारायण परिवर्तन ग्रामविकास पॅनेलचा पराभव केला. किरपे सोसायटीत नवनिर्वाचित संचालकांची नांवे व मते पुढीलप्रमाणे सर्वसाधारण मतदारसंघ ः रामानंद बाबासो देवकर … Read more