शशिकांत शिंदेंचे मोठे अन अगदी सूचक वक्तव्य; राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा झाल्यानंतर ऑनस्पॉट दाखल

सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतदानास आज सकाळी मेढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारतीत सुरुवात झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषीकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने सामने भिडले. … Read more

जावळीत दिवसभर हाय व्होल्टेज ड्रामा : शशिकांत शिंदेंना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच खिंडीत गाठले

सातारा : राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार व शरद पवार, अजित पवार यांचे विश्वासू असणारे शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच जिल्हा बँकेसाठी खिंडीत पकडले आहे. भाजपचे आ. शिवेंद्रराजे यांचे विश्वासू सहकारी ज्ञानदेव रांजणे हे आहेत. येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेऊन असे सूचक वक्तव्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कराड येथे केले होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती … Read more

एमआयएम मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या ‘त्या’ नगरसेवकांची अखेर हकालपट्टी

NCP

औरंगाबाद – एमआयएम मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या नव्या दोन नगरसेवकांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे नगरसेवक दाखल झाले होते. नगरसेवकांच्या गुन्हेगारी कारवाया माहित असतानाही पक्षाने त्यांना प्रवेश दिला. यामुळे पक्षाची बदनामी होऊ लागली, असा पक्ष सदस्यांचा आरोप होता.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष … Read more

मनपा निवडणुकीसाठी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीने थोपटले दंड; ‘इतक्या’ वॉर्डांत देणार उमेदवार

औरंगाबाद – महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तशी तशी राजकीय पक्षांमधील खलबतं मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अशातच आता मनपा निवडणुकीसाठी प्रथमच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) ने दंड थोपटले आहेत. एसडीपीआय 20 ते 25 जागांवर उमेदवार देणार आहेत. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांसोबत कोणतीही आघाडी करणार नाही, असा निर्णय या पक्षाने … Read more

कपबशीला मत देऊन सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करा : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीमधील सहकार पॅनेल मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यासाठीचा जाहीर मेळावा समर्थ मल्टीपर्पज हॉल, गजानन हौसिंग सोसायटी कराड येथे आज संपन्न झाला. यावेळी कपबशी या चिन्हाला मत देऊन सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब … Read more

सातारा जिल्हा बॅंक : कराडला सहकार पॅनेलच्या मेळाव्यात तीन्ही बाबांची अनुपस्थिती

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषगाने कराड सोसायटी गटातील सहकार पॅनेलचे उमेदवार सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तीन्ही बाबांच्या अनुपस्थितीचा विषय चर्चेत राहिला. कराड सोसायटी गटातून सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा उमेदवारी अर्ज सहकार पॅनेलमधून दाखल करण्यात आला आहे. तर विरोधात कै. विलासराव … Read more

प्रभागरचनेच्या कच्च्या आराखड्यासाठी मागितला दहा दिवसांचा वेळ

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करून तो 18 नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने कच्चा आराखडा तयार केला आहे; पण महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय सध्या दौऱ्यावर असल्याने कच्चा आराखडा पाठविण्यासाठी दहा दिवसांचा वेळ मिळावा, असे पत्र महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पाठवले आहे. कोरोना संसर्गामुळे महापालिकेची निवडणूक … Read more

प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा उद्या होणार सादर

औरंगाबाद – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाला कच्चा आराखडा सादर केला जाणार आहे. कोरोना संसर्गामुळे महापालिकेची लांबणीवर पडलेली निवडणूक आगामी काही महिन्यांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार राज्य शासनाने पावले उचलली आहेत. महापालिकेची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग … Read more

सातारा जिल्हा बॅंक : राष्ट्रवादीचा भाजपशी तह तर काॅंग्रेस, शिवसेनेशी पंगा

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतच धुसफूस सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. बॅंकेच्या 21 संचालकापैकी 11 बिनविरोध निवडूण आल्यानंतर 10 जण निवडूण आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलने चक्क महाविकास आघाडीतील काॅंग्रेस व शिवसेना पक्षांशी पंगा घेतला असून भाजपाशी तह केल्याचे पहायला मिळत आहे. सातारा जिल्हा बॅंकेत सर्वसामावेशक पॅनेल असल्याचे वारंवारं … Read more

शिवसेनेचे यापुढे स्वतंत्र धोरण : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा राष्ट्रवादीला इशारा

Untitled deShamburaj Deasi Satarasign - 2021-09-24T163640.869

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेना म्हणून आम्ही भूमिका जाहीर केली होती, त्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे प्रतिबिंब जिल्हा बॅंकेत दिसावे, तसे संकेत राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी दिले होते. मात्र ऐनवेळी काय झाले ते माहित नाही. यापुढे शिवसेना आपली भूमिका स्वतंत्रपणे घेणार आहे. केवळ बहुमत आहे, जास्त मतदार आहे म्हणून एकतर्फा निर्णय … Read more