राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे न्यायालयीन कोठडीतून थेट मतदान केंद्रावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खटाव : सोसायटी मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार माजी आमदार प्रभाकर घार्गे न्यायालयीन कोठडीतून पोलीस बंदोबस्तात वडूज येथील मतदान केंद्रावर सकाळी साडेआठ वाजता हजर झाले. सहकार पॅनलच्या नंदकुमार मोरे यांच्या विरूध्द घार्गे यांची हाय व्होल्टेज लढत होत आहे. गेले महिनाभर आऊट ऑफ कव्हरेज असलेले मतदार मतदानाला येवू लागल्याने मतदान केंद्रावर पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रभाकर घार्गे एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. मतदानादिवशी मतदान केंद्रावर हजर राहण्याची न्यायालयाने त्यांना परवानगी दिली आहे. साडेआठ वाजता पोलीस बंदोबस्तात घार्गे यांचे मतदान केंद्रावर आगमन झाले. त्यांच्या पत्नी इंदिराताई घार्गे आणि कन्या प्रिती घार्गे यांनी गेला महिनाभर निवडणूकीची खिंड लढवून सहकार पॅनलचा घामटा काढला आहे.

Prabhakar Gharge | Satara DCC Election | राष्ट्रवादीचे घार्गे न्यायालयीन कोठडीतून थेट मतदानवर

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नंदकुमार मोरेंची उमेदवारी फायनल केल्याने राष्ट्रवादीसाठी ही लढत प्रतिष्टेची झाली आहे. तालुक्याच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी आणि ओबीसी मतदारसंघाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते सकाळपासूनच वडूज मतदान केंद्रावर ठाण मांडून बसले आहेत. गेले महिनाभर आऊट ऑफ कव्हरेज असलेले मतदार समुहाने मतदानासाठी येवू लागल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Comment