भैरवनाथ संस्था निवडणुक : वारूंजीसह 6 गावातील राजकारण तापले

Kese Bhairavnath Sanstha

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील तालुक्यातील केसे येथील भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 21 रोजी होत आहे. या संस्थेच्या निवडणूकीमुळे वारूंजी पंचक्रोशीतील राजकारण चांगलेच तापले आहे. स्व. विलासराव पाटील (काका) आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या विरोधात सर्व समावेशक पॅनेल अशी लढत होत आहे. तब्बल 17 जागेसाठी 34 उमेदवार रिंगणात असून … Read more

मोरगिरीत सत्तांतर, राष्ट्रवादीला धक्का : आ. शंभूराज देसाई यांची 60 वर्षानंतर एकहाती सत्ता

Morgiri Gram Panchayat

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची असलेली मोरगिरी ग्रामपंचायतीत तब्बल 60 वर्षांनी सत्तांतर झाले आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने पाटणकर गटाला मोठा धक्का दिला. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का बसला असून शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई गटाने एकहाती 7-0 सत्ता व लोकनियुक्त सरपंच पदी साै. अर्चना किरण गुरव यांनी … Read more

प्राथमिक शिक्षक बँकेचा निवडणूकीचा बिगूल वाजला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील शिक्षकांसाठी महत्वाची अथवाहिनी असणाऱ्या प्राथमिक शिक्षण सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याचबरोबर 14 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील निवडणूक निर्णय अधिकारी शंकर महादेव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे 19 नोव्हेंबर रोजी मतदान तर 20 … Read more

राज्यातील 28 जिल्हा परिषदांचे आरक्षण जाहीर : आता वेध निवडणुकांचे

Satara ZP

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील राज्यातील 28 जिल्हा परिषदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीमुळे आता लवकर निवडणुका होतील अशी आशा निर्माण झाली आहे. राज्यातील केवळ 9 ठिकाणी खुल्या गटासाठी आरक्षण पडल्याने इच्छुकांच्या पदरी निराशाच पडली आहे. तर 11 ठिकाणी महिलासाठी राखीव प्रवर्ग राहिला आहे. आता पुढील अध्यादेश कधी निघणार याकडे झेडीपी, … Read more

राज्यातील 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; सरपंचपदासाठी थेट निवड!

मुंबई । राज्यातील ११६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीत थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 13 ऑक्टोबरला मतदान पार पडेल. ही निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर सरपंचपदाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय ओबीसींना राजकीय आरक्षण देखील लागू असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे … Read more

लोकसभा निवडणुकीत विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल : ना. सोम प्रकाश

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशाची अखंडता व एकता कायम ठेऊन, भारताला जगात शक्तिशाली बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्यासह देशातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी होतील आणि विजयाचा उत्तुंग इतिहास रचला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केले. भाजपा कराड … Read more

सातारा भाजपाचा, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिन्ही आमदाराचा पराभव होणार : आ. जयकुमार गोरे

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्वी बालेकिल्ला होता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. माढ्या लोकसभा मतदार संघातही असेच बोलले जायचे पण त्याठिकाणी निवडणूकीत भाजपाचा उमेदवार निवडून आला. सातारा जिल्ह्यात शरद पवार यांचे फक्त तीनच आमदार राहिले आहेत. त्यांचाही पराभव होणार असून यावेळी नक्की बदल दिसेल, असे भाजप जिल्हाध्यक्ष व माण- खटावचे आ. … Read more

डाॅ. अतुल भोसले गट हिरो… विरोधक झिरो : कोयना वसाहत ग्रामपंचायत भाजपाची सत्ता

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोयना वसाहत ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांच्या स्व. राजेंद्र पाटील कोयना वसाहत विकास आघाडी पॅनलने 10-1 असा विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, युवा नेते उदयसिंह पाटील- उंडाळकर आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती विकास आघाडीला एकही जागा … Read more

कार्वे गणातून टेंभूच्या सुहास बाबर यांच्या उमेदवारीची मतदारांमध्ये चर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी निवडणूक आयोगाकडून आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट आणि गण आरक्षण जाहिर झाले आहे. कराड तालुक्यातील कार्वे प. स गणासाठी सर्वसाधारण आरक्षण आहे. या निवडणुकीसाठी केवळ राजकीय पार्श्वभूमी न पाहता कार्वे गणाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सामाजिक कार्यकर्त्यालाच द्यावी, अशी अपेक्षा मतदारांच्याकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टेंभू येथील … Read more

ZP आरक्षणात OBC आरक्षणामुळे अनेकांचा गाशा गुंडाळला : फलटण, माण, खटावला खूशी तर कराड, पाटणला हिरमोड

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज (गुरुवार) आरक्षण साेडत काढण्यात आली. ही साेडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या उपस्थिती आरक्षण सोडत पार पडली. सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण 73 जागांपैकी 37 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. फलटण तालुक्याला लाॅटरी लागली असून सर्वच जिल्हा परिषदेच्या जागा … Read more