रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीतील रेल्वे गेट क्रमांक एल सी 98 या ठिकाणी भुयारी मार्गाच्या कामात पाणी साचत आहे. त्यासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे रेल्वे पोलीसांना देण्यात आला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्याने बुधवारी पार्लेसह परिसरातील शेतकरी … Read more

सातारा तालुक्यातील गोजेगावमधील साठ एकर ऊसाला आग

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील धारकरा शिवारात अज्ञातांनी सुमारे साठ एकर उसाला आग लावल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे 100 हुन अधिक शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सातारा तालुक्यातील गोजेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी सुमारे साथ एकर क्षेत्रात … Read more

महावितरणचा अजब कारभार! जोडणी न देताच शेतकऱ्याला दिले 40 हजारांचे वीजबिल

औरंगाबाद – जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील घायगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कृष्णा रुस्तुम धने यांना कोटेशन भरून नऊ वर्ष झाले. मात्र वीज जोडणी मिळाली नाही. त्यात महावितरणचा कहर म्हणजे सदर शेतकऱ्याला 40 हजारांचे वीज बिल दिले आहे. महावितरणने हा प्रकार केवळ धने यांच्याबाबतीतच केलेला नसून तालुक्‍यातील सहा हजार जण या भोंगळ कारभाराचे चटके सहन करत असल्याचे समोर … Read more

शेतकऱ्यांना मोठा झटका ! खतांच्या किंमतीत मोठी वाढ; नेमकं कारण काय??

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम जगभर पाहायला मिळत आहे. कच्चे तेल, इलेक्ट्रिक उत्पादनांनंतर आता खतांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. खतांच्या किंमतीत वाढ होत असल्याने खतांच्या पुरवठ्यावरही परिणाम होतो आहे. रशिया हा जगातील प्रमुख खत पुरवठादार देश आहे. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियावर आर्थिक निर्बंध लादले जात आहेत, त्यामुळे खतांचा पुरवठा खंडित झाला … Read more

सातारा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत

Aurangabad Rain

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. कवठे (ता. वाई) परिसरात सायंकाळी तुफान पाऊस झाला. तर कराड शहरासह परिसरात हलक्या सरी कोसळल्या. शेतकरी वर्गाची ज्वारी गहु व हरभरा या पिकांची काढणी सुरु असल्याने आज झालेल्या पावसाने हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या भितिने शेतकरी धास्तावला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार … Read more

शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला : मस्करवाडीत वैरण काढताना बिबट्या व बछडा शेतात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील उंब्रज भागात असलेल्या मस्करवाडी येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यांना उपचारासाठी कराड येथे काॅटेज हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेतात कडबा कापताना मादीने हल्ला केला आहे, बिबट्या मादीसोबत एक बिबट्याचे पिल्लू (बछडा) असल्याने हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे ‘हे’ महत्त्वाचे काम अन्यथा पैसे मिळू शकणार नाहीत

PM Kisan

नवी दिल्ली I प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, सरकार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा 11 वा हप्ता ट्रान्सफर करू शकते. मात्र, पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्यात हे पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील जे eKYC करतील. जे शेतकरी ही अट पूर्ण करणार नाहीत, त्यांना पैसे मिळणार नाहीत. आतापर्यंत 10 हप्त्यांची रक्कम … Read more

विट्यात महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा, महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध शेतकरी आक्रमक

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट करणे तसेच मुख्य डीपी बंद करणे तसेच दिवसा वीजपुरवठा न करता रात्रीच्या वेळी वीजपुरवठा सुरू ठेवणे, असा महावितरणच्या अन्यायकारक भूमिकेविरोधात महावितरणच्या कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी धडक मोर्चा काढला. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या वीज कनेक्शन संदर्भात अनेक तक्रारी आहेत. शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट करणे … Read more

शेतकऱ्यांना स्वस्त खत देण्यासाठी सरकार उचलणार ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली I रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताचेही मोठे नुकसान होत आहे. विशेषत: भारताला रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसोबत व्यापारी तुटीचा सामना करावा लागत आहे. युद्धामुळे चालू आर्थिक वर्षात सरकारच्या खत अनुदान विधेयकात सुमारे 10,000 कोटी रुपयांची वाढ होऊ शकते. मात्र टॅक्स महसुलात वाढ झाल्यामुळे वित्तीय तूट अंदाजे 6.9 टक्क्यांच्या जवळ ठेवण्यास मदत होईल. पेरणीचा हंगाम … Read more

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा ! पिकांसह फळबागांचे नुकसान

Farmer waiting for Rain

  औरंगाबाद – जिल्ह्याला मंगळवारी मध्यरात्री आणि बुधवारी पहाटे अवकाळी पावसाने तडाखा दिला. अचानक वादळीवाऱ्यासह झालेल्या माध्यम स्वरूपाच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले रब्बी पिके आणि फळबागांना याचा फटका बसला आहे. सोयगावसह तालुक्यात पहाटे दोन वाजेपासून सुरू असलेल्या अवकाळीच्या रिपरिपीमुळे रब्बीसह फळबागांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या अवकाळी पावसाचा काही भागात जोर अधिक … Read more