Twitter India आणि कंपनीचे MD मनीष माहेश्वरी विरोधात हिंदु देवीचा अपमान केल्याप्रकरणी FIR दाखल

नवी दिल्ली । नव्या आयटी नियमांवरून भारत सरकारबरोबर गोंधळ घालणारी मायक्रोब्लॉगिंग साइट Twitter चा त्रास काही कमी होत नाही. आता Twitter इंडियावर आपल्या प्लॅटफॉर्मवरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्लीत कंपनीविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. वकील आदित्य सिंद देशवाल यांनी ट्विटर इंडिया, त्याचे एमडी मनीष माहेश्वरी आणि Atheist Republic नावाच्या NGO … Read more

धक्कादायक ! मैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

Rape

बरेली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या मैत्रिणींसोबत स्कूटीवर फिरायला गेलेल्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. तसेच आरोपींनी पीडित तरुणीला आणि तिच्या मैत्रिणीला बेदम मारहाणदेखील केली. यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला एका अज्ञातस्थळी नेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी इज्जतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता, गोव्याच्या सेशन कोर्टाचा निर्णय

Tarun Tejpal

पणजी : वृत्तसंस्था – तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना गोव्यातील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यांच्यावर 2013 मध्ये गोव्यातील लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. नोव्हेंबर 2013 मध्ये गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून त्यांना अटक केली होती. मे 2014 त्यांना जामीन मंजूर झाला … Read more

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्यामुळे 22 वर्षीय महिलेची आत्महत्या; प्रियकरावर FIR दाखल

Sucide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – प्रियकराने दिलेले लग्नाचे वचन न पाळल्याने एका 22 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. हि घटना 10 मे रोजी शामरावनगर या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या प्रियकराविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सरोजा गजानन आवळे असे आहे. सरोजा आवळे यांच्या आई शेवंती … Read more

तुमच्या बाबतीत गुन्हेगारी गोष्ट घडलीय अन् पोलिस FIR नोंदवून घेत नाहीयेत? तर त्यांना ‘हे’ सांगा

FIR

कायद्याचं बोला #9 | स्नेहल जाधव गुन्हा झाल्यावर तो कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवावा यावरून बऱ्याच लोकांना माहित नसतं त्यामुळे बऱ्याचदा लोकांची तारांबळ उडते. गुन्हा घडलेली जागा आमच्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येत नाही असे सांगून काही पोलीस गुन्ह्याची नोंद घेणं टाळतात. पीडित व्यक्तीला तर ह्या गोष्टीचा मनस्ताप होऊच शकतो शिवाय चौकशी करण्याचा महत्वाचा वेळ निघून गेला … Read more

गनीमीकाव्यानं अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण आलं गोपीचंद पडळकरांच्या अंगाशी; गुन्हा दाखल

पुणे । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं जाऊन भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलंय. मात्र, हे प्रकरण पाडळकरांच्या चांगलाच अंगाशी आलं आहे. जेजुरी पोलीस ठाण्यात … Read more

मोदींच्या मतदारसंघात गुगलचे CEO सुंदर पिचई यांच्याविरोधात FIR दाखल; ‘हे’ आहे कारण

वाराणसी । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात एक कमालीची घटना समोर आली आहे. वाराणसीमधील भेलूपूर पोलीस ठाण्यात थेट गुगलचे CEO सुंदर पिचई यांच्याविरोधात दाखल एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सुंदर पिचई यांच्याविरोधात आयटी अ‍ॅक्ट आणि कटकारस्थान रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुंदर पिचई यांच्यासह या एफआयआरमध्ये एकूण १८ जणांविरोधात आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा … Read more

या ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित नियम मोडले

मुंबई | बॉलिवूड अभिनेता अरबाज खान, निर्वान खान आणि सोहेल खान यांच्याविरोधात सोमवारी (4 जानेवारी 2021) कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या तक्रारीनंतर मुंबईतील खार पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि कलम 269 अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. An FIR has been registered against actors … Read more

क्रिकेटर सुरेश रैनासह ३४ बॉलिवूड सेलिब्रिटींवर गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनासह बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील पबमध्ये पार्टीदरम्यान कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात आहे.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच असलेल्या ड्रॅग्नोफ्लाय पबमध्ये सुरेश रैनासह उपस्थित असलेल्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या पबवर पोलिसांनी धाड टाकली. त्यानंतर रैनासह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश … Read more

जळगाव जिल्ह्यात माजी सरपंचावर थरारक खुनी हल्ला, 8 जणांवर FIR दाखल

जळगाव । शेतजमिनीच्या वादातून पाचोरा तालुक्यातील तारखेडा खु येथील माजी सरपंचावर 8 जणांनी हल्ला केला. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना बुधवारी (दि.9) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेत माजी सरपंच मधुकर दौलत पाटील (वय-57 रा. … Read more