किरपेत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद : वनविभागाने गुपचूप हलविला

कराड | तालुक्यातील किरपे येथे आज बुधवारी दि. 26 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात सापडला आहे. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची माहिती न होता, वनविभागाने हा बिबट्या किरपे गावातून अन्य ठिकाणी नेला आहे. कराड तालुक्यातील येणके येथे बिबट्या दोन महिन्यांपूर्वी पिंजऱ्यात अडकला होता. त्यानंतर आज 26 जानेवारी रोजी दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. मात्र, किरपे, … Read more

सागरेश्वर अभयारण्यासमोर शेतकऱ्यांचे आत्मदहन आंदोलन, वनविभागाच्या लेखी आश्वासन नंतर आंदोलन केले स्थगित

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सागरेश्वर अभयारण्यातील वन्यजीव अभयारण्या बाहेर पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करत आहेत. यातच या अभयारण्या परिसरात बिबट्याचा वावर देखील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करन्यासाठी वन विभागाला वारंवार तोंडी आणि लेखी तक्रार देऊनही यावर काहीही उपाय करण्यात आला नाही म्हणून शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचे आंदोलन … Read more

वनविभागाची कारवाई : कराडला शिकारीसाठी वाघरी लावणाऱ्या दोघांना अटक

कराड | जखिणवाडी (ता. कराड) येथे वनक्षेत्राच्या लगत शिकार करताना दोघांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. वनविभागाने शुक्रवारी (दि. 7) रात्री 10 च्या सुमारास ही कारवाई केली आहे. संशयितांनी शिकारीसाठी तीन वाघरी लावल्या होत्या. यापैकी एका वाघरीमध्ये मृतावस्थेत ससा आढळला आहे. संतोष शिवाजी बनसोडे (वय 21, रा. बाबाजीनगर, जखिणवाडी), पांडुरंग धोंडीराम नाईक (रा. भोसले … Read more

वनविभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी शिवसेनेचे गांधीगिरी पध्दतीने आंदोलन

सातारा | ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात 22/07/2021 रोजी पुराव्यासहित कागदपत्रे देण्यात आलेली आहेत. तरीही आज 2022 उजाडले तरी त्या कागदपत्रांवर कोणताही कारवाई होत नाही. संबधित अधिकाऱ्याला पाठिशी घातले जात आहे. तेव्हा या दोन्ही अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी, म्हणून शिवसेनेने गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली. सातारा … Read more

Video : महाबळेश्वरच्या बाजारपेठेत रानगव्याची थाटात एंन्ट्री, वनविभाग सतर्क

महाबळेश्वर | सांगली शहरात गेल्या आठवड्यात आलेल्या रानगव्याच्या एंन्ट्रीनंतर आता आता थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे मंगळवारी मध्यरात्री दि. 3 रोजी 1 वाजण्याच्या सुमारास घुसला होता.  सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत मध्यरात्री जंगली रानगव्याने फेरफटका मारला. मध्यरात्री गव्याने बाजारपेठेत आल्याने त्याचे चित्रीकरणही कैद झाले आहे. महाबळेश्वर बाजारपेठेत गवा हा सुमारे तासभर परिसरात फिरत होता. … Read more

वारूंजीत घुसीच्या पिंजऱ्यात सापडला वेगळाच प्राणी, वनविभागाने घेतला ताबा

कराड | वारुंजी फाटा येथे माजी प्राचार्य गुलाबराव रामचंद्र पाटील (तांबवेकर) यांच्या घरात घुशीसाठी लावलेल्या पिंजऱ्यात उद मांजर (इंडियन स्मॉल सिव्हेट) फसल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. पाटील कुटुंबियांनी यांनी तात्काळ मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर व घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सदर उदमांजर वनविभागाने ताब्यात घेतले. याबाबत मिळालेल्या माहिती अशी, वारुंजी … Read more

महाकाय गव्याच्या दर्शाने सांगलीकरांची उडाली तारांबळ; रस्ता ओलांडून उसाच्या शेतात गेला अन्…

सांगली | सांगलीवाडीतील बायपास रस्त्याच्या परिसरात शनिवारी रात्री महाकाय गव्याचे दर्शन झाले. कदमवाडीच्या दिशेने आलेला गवा कदमवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडून नदीकाठी असलेल्या उसाच्या शेतात गेल्याने एकच खळबळ उडाली. महाकाय गव्याच्या दर्शाने सांगलीकरांची तारांबळ उडाली. शनिवार रात्री उशिरापर्यंत वन विभाग, पोलिस आणि अग्निशमन दलाकडून गव्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होता. सांगलीवाडीतून कदमवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर रात्री सव्वानऊ … Read more

सरत्या वर्षअखेरीला 31 डिसेंबरला पार्टी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

सातारा | वन विभागाच्या हद्दीत सरत्या वर्षाअखेरीस 31 डिसेंबर रोजी पार्टी करताना आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सातारा वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. यावेळी यवतेश्वर, कास, उरमोडी धरण परिसर, ठोसेघर परिसरात गस्त घालण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकात म्हटले आहे की, सातारा तालुक्यातील काही भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोडला जातो. त्यामध्ये … Read more

पळापळा रानगवे : पुणे- सातारा महामार्गावर प्रवाशांसह वनविभागाची भांबेरी, पोलिसही घटनास्थळी

पुणे | भोर तालुक्याच्या पूर्व भागातील सारोळा गावच्या – हद्दीत पुणे बाजूकडे जाणाऱ्या महामार्गाच्या जवळ असलेल्या रान झुडपात रानगव्यांच्या दर्शन झाल्याने नागरीकांची पळापळ झाली. महामार्गावर रानगव्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती तर अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैदही केला. मात्र रानगव्यांच्या महामार्गावरील एंन्ट्रीने प्रवाश्यांसह वनविभागाचीही भांबेरी उडाली होती. पुणे सातारा महामार्गावर गव्यांचे दर्शन#hellomaharashtra pic.twitter.com/4B5OHu9N73 … Read more

पुन्हा येणकेत बिबट्या : एका बिबट्यास जेरबंद करताच दुसऱ्याच्या दर्शनाने लोकांच्यात घबराट

Leopard

कराड : तालुक्यातील येणके येथे शनिवार दिनांक 27 रोजी सकाळी 7.30 वाजता वन विभागाने एका बिबट्यास सापळ्यात जेरबंद करून ताब्यात घेतले आहे. तर त्यानंतर अवघ्या तासाभरात 8.30 वाजता याच गावात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने या गावात असणाऱ्या बिबट्याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांच्यातून केली आहे. येणके येथे … Read more