ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारांजवळ ‘या’ अर्जाची पोचपावती असणे गरजेची; राज्य निवडणूक आयोगाची स्पष्ट सूचना

मुंबई । राज्यातील 34 जिल्ह्यांमधील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सवलत देण्यात आली आहे. जात वैधता प्रमाणपत्राऐवजी पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत अथवा पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मूभा उमेदवारांना देण्यात आलीय. राज्य निवडणूक आयुक्त … Read more

सरपंचाची निवड सदस्यातूनच होणार; आधी निवडणुका मग आरक्षण सोडत- हसन मुश्रीफ

Hasan mushrif

कोल्हापूर । गामपंचायत सरपंचाची निवड सदस्यातूनच करण्यात येणार आहे. त्याबाबत गोंधळ नको, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. याशिवाय भाजपच्या काळात लोकनियुक्त सरपंच निवडण्याची पद्धत चुकीची होती. करायचंच असेल तर मग सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांची निवड लोकांमधूनच केली पाहिजे, असंही ते म्हणाले. मार्च महिन्यापासून अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. डिसेंबर अखेर 14 हजारपेक्षा … Read more

नांदेडमध्ये लोकशाहीची ऐशी-तैशी; उपसरपंचपदाचा लिलाव करत साडे १० लाखात विक्री

नांदेड । नांदेडमध्ये सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकशाही व्यवस्थेची ऐशी-तैशी करणारा प्रकार या व्हिडिओमध्ये घडताना दिसत आहे. नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वी सरपंच आणि उपसरपंचपदाचा जाहीर लिलाव करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुदखेड तालुक्यातील महाटी गावातील हा व्हिडीओ असून यात गावातील उपसरपंचपदासाठी चक्क बोली लावण्यात आली आहे. महाटी या गावातील सरपंचपद … Read more