पर्यटकांसाठी खुशखबर ! जिल्हा प्रशासनाने पर्यटन स्थळांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

tourist

औरंगाबाद – पर्यटनाची आवड असलेल्या व्यक्तींसाठी आनंदाची बातमी आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे शनिवार व रविवारी देखील खुली राहणार आहेत. म्हणजेच आता जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे पूर्णवेळ खुली करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरुळ लेणी, अजिंठा लेणी आणि दौलताबाद किल्ला आदी पर्यटनस्थळे सुर्योदय … Read more

गंगापूर जवळ ‘द बर्निंग ट्रक’चा थरार !

fire

औरंगाबाद – नाशिक येथून औरंगाबाद कडे ऊस घेऊन येणारा मालवाहू ट्रक अपघातग्रस्त होऊन उलटला. त्यानंतर अचानक ट्रक ने पेट घेतला. या आगीत ट्रकसह तब्बल पाच टन कापूस जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी औरंगाबाद गंगापूर महामार्गावर घडली. यामुळे गंगापूर जवळ ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार उडाला. विषयी अधिक माहिती अशी की, ट्रक चालक प्रमोद जाधव … Read more

उस्मानपुरा पोलिसांची मोठी कारवाई ! रेल्वे स्थानकावर तब्बल 39 किलो गांजा जप्त

ganja

औरंगाबाद – औरंगाबाद रेल्वे स्थानकावर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आलेला 39 किलो गांजा उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने काल सकाळच्या सुमारास पकडला. यासोबतच एक पुरुष व दोन महिलांना ही अटक करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एका दिवसाची कोठडी देण्यात आली. उस्मानपुरा पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक राहुल सूर्य तळ यांना रेल्वेस्थानकावर आंध्रप्रदेशातून … Read more

आता तर हद्दच झाली ! समोसा उशीरा दिल्याने दुकान मालकावर चाकू हल्ला

crime

औरंगाबाद – आज शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अतिशय क्षुल्लक कारणावरून हल्ला करण्याच्या घटना दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणावर वाढतच आहेत. अशीच एक घटना शहरातील मोंढा नाका उड्डाणपुलाजवळ घडली आहे. समोसा देण्यास उशीर होताच एकाने चाट भंडार मालकावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहरातील मोंढा नाका उड्डाणपुलाजवळ सात ऑक्टोबरला रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. … Read more

जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री सुभाष देसाई

subhash desai

औरंगाबाद – मागील  दीड वर्षांपासून कोविडच्या परिस्थितीचा आपण मुकाबला करत आहोत. आज कोविडची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे  सरसकट पंचनामे करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना  मदत देण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निधी मोठ्या … Read more

‘त्या’ आत्महत्येप्रकरणी आठ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

suicide

औरंगाबाद – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील एका तरुणाने 30 सप्टेंबर रोजी शहरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता त्या आत्महत्येचा उलगडा झाला असून, मानलेल्या बहिणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या किशाेर जाधव यास फसविल्यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गुन्हा क्रांती चौक पोलीस ठाण्यात मंगळवारी नोंदविण्यात आला. याप्रकरणी मानलेल्या बहिणीसह … Read more

गुलाब, शाहिननंतर आता येणार ‘जवाद’ चक्रीवादळ; मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका

औरंगाबाद – गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबादसह महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यावर तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून अतिवृष्टीने कहरच केला आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, 27 सप्टेंबरपासून राजस्थानमधून परतीच्या पावसाने सुरुवात केली आहे. औरंगाबाद आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये या पावसाचा जोर कायम आहे. महाराष्ट्रातील काही … Read more

नवीन प्रभाग रचनांमुळे बदलणार सीमा

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाने आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासन कामाला लागले असून, लोकसंख्या व मतदार संख्या विचारात घेऊन वॉर्डांची चतु:सीमा ठरविल्या जाणार आहेत. त्यामुळे जुन्या वॉर्डांच्या सीमांमध्ये 10 टक्के बदल अपेक्षित असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. महापालिकेची निवडणूक प्रभाग रचनेनुसार होणार असून, प्रभाग रचनेचा … Read more

खुल्या बाजारात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेली विदेशी दारू विक्री करण्याऱ्यांना अटक; लाखोंची विदेशी दारू जप्त

Excise

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्यात खुल्या बाजारात विक्री करिता प्रतिबंधित असलेल्या तसेच फॉर सेल डिफेन्स ओन्ली असे शिक्के असलेला तब्बल 2 लाख 19 हजार 610 रुपयांचा विदेशी दारूचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला आहे. ही कारवाई कडेगाव येथील फिरदोस गार्डन परिसरात करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. रमेश सुखदेव म्हैसमाळे (37) … Read more

घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करणारे पोलिसांच्या जाळ्यात; तब्बल 66 सिलेंडर जप्त

cylender

औरंगाबाद – घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या सेंटरवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारत दोघांना ताब्यात घेतले आहे ही कारवाई मंगळवारी मोती कारंजा भागात करण्यात आली. मुकीम करीमोद्दीन अंसारी (34) आणि शेख हाफिज शेख हबीब (45) असे गॅस रेफिल्लींग सेंटर मालकांचे नाव आहे. पोलिसांनी या कारवाईत 66 सिलेंडर जप्त केले आहेत. शहरातील मोतीकारंजा भागात घरगुती गॅस सिलेंडरचा … Read more