सावधान ! औरंगाबादेत पुढील चार दिवस विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

Aurangabad Rain

औरंगाबाद – परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला मुसळधार पावसाला अजूनही सामोरे जावे लागत आहे . मराठवाड्यातील विविध भागात सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश दिसतो. काही काळ ऊन राहते. पण दुपारनंतर ऊन-पावसाचा खेळ सुरु होतोय. वातावरण पूर्णपणे स्वच्छ असतानाच अचानक झाकोळून येतं आणि ढगांचा प्रचंड गडगडाट ऐकू येतो. क्षणात पावसाला सुरुवात होते. त्या पाठोपाठ वीजांचा कडकडाट सुरु होतो. … Read more

मुलगा की मुलगी कळेना ! घाटातील डॉक्टरांनाही पडले कोडे

Ghati hospital

औरंगाबाद – शहरातील एका दाम्पत्याला लग्नानंतर दोन वर्षांनी बाळ झाले, मात्र रुग्णालयात जन्मलेले हे बाळ मुलगा आहे की मुलगी, हे कोडं डॉक्टरांनाही पडलं आहे. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात या मातेची सिझेरियन पद्धतीने नुकतीच प्रसूती झाली. पहिल्याच बाळाच्या आगमनाने या दाम्पत्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मात्र या बाळाच्या लिंगावरून झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. … Read more

औरंगाबादेत सलग 75 तास पोहण्याचा विक्रम

manpa

औरंगाबाद – औरंगाबाद महापालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतास स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण झाल्याने आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (ता.तीन ) या उपक्रमाचा समारोप झाला. यात आझादी का अमृत महोत्सवानिमित्त देशाला सलाम करण्यासाठी सलग ७५ तास पोहण्याचा जलतरणपटूंनी विक्रम … Read more

खासदार जलील यांच्या हस्ते 53 नवीन चार्टर्ड अकाउंट्सचा सत्कार

औरंगाबाद – आईसीएआयच्या औरंगाबाद शाखा आणि औरंगाबाद विकासातर्फे नव्याने झालेल्या 53 चार्टर्ड अकाऊंटट्सचा रविवारी (ता.३) खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सातारा परिसरात असलेल्या आईसीएआय भवनात हा कार्यक्रम घेण्यात आला. खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. औरंगाबादमधून 21 जुलैच्या 2021 परीक्षेत एकूण 53 विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून पात्र ठरले, असे औरंगाबाद … Read more

मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘मौन सत्याग्रह’

Jitendra Awhad on Mahatma Gandhi

औरंगाबाद – मराठा समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्या साठी गांधी जयंती चे औचित्य साधुन ‘मौन सत्याग्रह’ 2 आक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत राज्यभर अत्यन्त शांततेत पार पडला. या मौन सत्याग्रहाच्या माध्यमातून केंद्राचे घटनात्मक आरक्षण, शेतकरी विरोधी कायदे रद्द करणे, महागाईवर नियंत्रण आणणे, युवकाची प्रलंबित नियुक्ती पत्रे मिळणे, आंदोलका वरील कारवाई बिनशर्त … Read more

विद्यार्थ्यांसाठी खासदार जलील यांचे ‘मिशन तालीम’

imtiaz jalil

औरंगाबाद – आधी कोरोना प्रादुर्भाव आणि आता अतिवृष्टी यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. यावर शाश्वत उपाययोजना म्हणून खासदार इम्तियाज जलील यांनी ‘मिशन तालीम’ हा एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या मिशन तालीम अंतर्गत सर्व प्रकारचे शैक्षणिक, शालेय … Read more

खुशखबर ! आता दिल्ली- मुंबईसाठी रोज घेता येणार ‘उड्डाण’

औरंगाबाद – एअर इंडियाच्या माध्यमातून औरंगाबादहुन दिल्ली व मुंबईसाठी आता रोज विमान सेवा उपलब्ध राहणार आहे. विमानाचे दिल्ली-मुंबई साठी रोज उड्डाण करण्यास काल पासून सुरुवात झाली असल्याची माहिती उद्योजक आणि औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सूनित कोठारी यांनी दिली आहे. पर्यटन, औद्योगिक आणि राजकीयदृष्‍ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरातून … Read more

पोलीस दलात खळबळ ! हजारोंची लाच घेताना सहायक पोलिस निरीक्षक रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

Lach

जालना – गुन्ह्यात आरोपी न करता तपासात मदत करण्यासाठी एका व्यक्तीकडून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहात पकडले. मागील काही दिवसापासून पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये लाच घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, एसीबी ची कारवाई देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे पोलिस दलात सध्या खळबळीचे … Read more

धक्कादायक ! मद्यपी मुलाने केली आपल्या पीत्याची हत्या

Murder

औरंगाबाद – मागील काही महिन्यांपासून औरंगाबाद शहर व परिसरात खुनांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यातच आता दारू पिऊन आलेल्या मुलाला घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न केल्याचा राग अनावर झाल्याने आपल्या वृद्ध बापाला बेवड्या मुलाने बेदम मारहाण केली. त्याने बापाचे डोके भिंतीवर आपटले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वृद्ध बापाचा शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान … Read more

डिजिटल पध्दतीमुळे शेतकऱ्यांना अचुक सातबारा मिळणार – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

sattar

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सामान्य खातेदार व नागरिकांसाठी महाभूमी संकेतस्थळावर डिजिटल सातबारा उपलब्ध करुन दिला आहे. यापुर्वीचा सातबारा थोडासा किचकट स्वरुपाचा होता परंतू आताच्या डिजिटल सातबारामुळे शेतकऱ्यांना अधिक अचूक सातबारा मिळणार असल्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम ई-महाभूमी अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महसूल … Read more