दारू न दिल्यामुळे काऊंटरवर चढून बार मॅनेजरला टोळक्याची मारहाण

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालनामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दारूच्या बाटलीसाठी बारचालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. धुळवडीच्या दिवशी ड्राय डे असल्यामुळे दारू न दिल्यानं संतापलेल्या टोळक्याने काउंटरमध्ये घुसून बारचालकाला पायाखाली तुडवत बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. pic.twitter.com/7VnBzlqxn5 — Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) … Read more

“एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय…”; राजेश टोपे यांचे महत्वाचे विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी सोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. त्या संदर्भात आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याशी चर्चा झाल्याचे,”असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे. जलील यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत मंत्री टोपे यांनी माहिती दिली. “जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला, त्यांच्या एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की … Read more

“समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देताय तर मग अर्धी रक्कम द्या”; रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात राज्य सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे समृद्धी महामार्गाचे नाव बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे ठेवले आहे. यावरून भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. “आम्ही समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव … Read more

बॅनरवर नाव टाकण्यावरुन दोन गटात तुफान हाणामारी आणि गोळीबार

Crime Gun

जालना – तालुक्यातील रामनगर येथे दोन गटांमध्ये वाद होऊन तुफान हाणामारी झाली. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान दोन गटांत झालेल्या तुफान हाणामारीत गोळीबार होऊन एक जण गंभीर जखमी झाला. मौजपुरी ठाण्याच्या पोलिसांनी वेळीच बंदोबस्त मागून परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला. रामनगर येथून जाणाऱ्या जालना-नांदेड या राज्य महामार्गावर मुख्य … Read more

पीटलाईन पाठोपाठ जालन्यात ‘लोको शेड’ची तयारी

Railway

औरंगाबाद – जालन्यात पिटलाईन सोबतच ‘लोको शेड’ तयार करण्याची तयारी सुरू आहे. लोको शेड म्हणजे रेल्वे इंजिन ची देखभाल दुरुस्ती करणारी जागा. पीटलाईनचे काम करतानाच प्रस्तावित लोको शेडचे डिझाईन तयार होणार आहे. लोको शेड झाल्यास मराठवाड्याला त्याचा फायदा होणार असून भंगार रेल्वे इंजिन पासून कायमची सुटका होईल अशी आशा व्यक्त होत आहे. अनेक वर्षापासून मराठवाड्यात … Read more

मराठवाड्यातील 91 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये

औरंगाबाद – रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यात मराठवाड्यातील 91 जणांचा समावेश आहे. ते भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांकासह मेल आयडी दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसह पालकांच्या माहितीसाठी संबंधित जिल्ह्यांमध्ये मदत कक्ष सुरू केले आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण अधिकाऱ्याशी पालकांनी संपर्क साधावा, … Read more

जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिले मोदींना पत्र

bullet train

औरंगाबाद – नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला जालना-नांदेड समृद्धी महामार्गाने कनेक्ट करण्यात आले आहे. त्याचे भू-संपादन वेगवान पद्धतीने सुरू आहे. आता याच मार्गावर नागपूर- मुंबई बुलेट ट्रेनचा प्रयत्न हाेताे आहे. ताेच पॅटर्न बुलेट ट्रेनसाठी जालना- नांदेड मार्गावरही वापरावा, अशी मागणी आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना नुकतेच रीतसर पत्र … Read more

रस्ता ओलांडताना दुचाकीच्या धडकेत प्राचार्य ठार

जालना – शहरातील अंबड मार्गावरील यशवंत नगर येथील निवासस्थान आवरून मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयाकडे जात असताना, एटीएम मधून पैसे काढून रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिल्याने प्राध्यापकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात काल सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडला. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी औरंगाबादेत हलवण्यात आले आहे. मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव … Read more

तब्बल 13 दिवसांनी शोध : बेशुध्द अवस्थेत सापडले बेपत्ता पोलिस अधिकारी संग्राम ताटे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील मारूल मधील असलेले व जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताटे हे दि. 2 फेब्रुवारीच्या रात्रीपासून बेपत्ता झाले होते. त्यांच्या गायब झाल्याने पोलिस तसेच संबंधित विभागाकडूनही त्यांची शोधाशोध केली जात होती. दरम्यान, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे तब्बल तेरा दिवसानंतर संग्राम ताटे हे बेशुद्ध अवस्थेत सापडले असून त्यांना … Read more

जिल्हा रुग्णालयातून एका दिवसाचे बाळ चोरीला

baby

जालना – शहरातील गांधी चमन येथील जिल्हा स्त्री व बाल रूग्णालयातून आज सकाळी एक दिवसांचे बाळ एका महिलेने लंपास केले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सीसीटीव्ह फुटेजची तपासणी करून शोध सुरू केला आहे. दरम्यान या घटनेनंतर रूग्णालयातील सुरक्षेबाबत प्रश्न चिन्हं निर्माण झाले आहे. जालना तालुक्यातील पारेगाव येथील रूकसाना अहमद शेख ही महिल … Read more