सातारा जिल्ह्यात आज ४ नवे कोरोनाग्रस्त; 54 वर्षीय मृत व्यक्तीचा रिपोर्टही निगेटिव्ह

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारा कराड तालुक्यातील विंग येथील 50 वर्षीय पुरुष व तामिणी ता. पाटण येथील 7 वर्षीय मुलगी कोविड बाधित असल्याचा रिपोर्ट आला आहे. तसेच सातारा येथील खासगी प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आलेल्या परळी ता. सातारा येथील 21 व 48 वर्षीय पुरुषांचे रिपोर्टही बाधित आले असून असे … Read more

कराड तालुक्यातील हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोलीकरांना दिलासा; ८ कोरोना रूग्णांना डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात वनवासमाची आणि मलकापूरनंतर हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोली गावातील ८ कोरोनाबाधित रूग्ण आता कोरोनामुक्त झाले असून, त्यांना कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. एकाच दिवशी ८ रूग्णांना डिस्चार्ज दिला जात असल्याने, म्हासोलीकरांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. कराड तालुक्यात वनवासमाची आणि मलकापूर येथील कोरोनाग्रस्तांची साखळी आटोक्यात आल्याचे चित्र … Read more

विरोधी पक्ष नेत्यांनी प्रत्यक्ष खर्चाचे पॅकेज किती आणि कर्जाचे पॅकेज किती याची आकडेवारी सादर करावी – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याला केंद्राकडून २, ७०, ००० रु आल्याचा दावा केला तसेच त्याची आकडेनिहाय वर्गवारी ही सादर केली. यानंतर काँग्रेस नेते यांनी आपले मत मांडले आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व रक्कम थेट महाराष्ट्राच्या तिजोरीत येणार असल्याचे भासविले असून ते … Read more

धक्कादायक! पोलीस पाटलाची शेतकऱ्याला कुऱ्हाडीने मारहाण; कराड तालुक्यातील घटना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शेतातील घास गवतातून ट्रॅक्टर का नेला, असे विचारल्याच्या कारणावरून चिडून जावून पोलीस पाटील याने गावातीलच एकाच्या हातावर कुऱ्हाडीने मारहाण केल्याची तर इतरांनी शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना हवेलीवाडी-सवादे ता. कराड येथे शनिवार दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अनिल राजाराम एैर वय ४१ रा. हवेलीवाडी-सवादे ता. कराड … Read more

५ वर्षांच्या मुलाला भेटण्यासाठी पुण्याहून कोल्हापूरला निघालेल्या अभियंता पती पत्नीचा अपघातात मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील आशियाई महामार्गावर उब्रंज नजीक भोसलेवाडी येथे शनिवारी (दि.9) रोजी पहाटे 3.45 च्या सुमारास झालेल्या कार अपघातात पतीपत्नी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमित आपाजी गावडे वय (३८) व  डॉ. अनुजा अमित गावडे वय (३५) असे अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याचे … Read more

उपासमारीने बेशुद्ध पडली होती महिला…कराड पोलिसांनी जे केलं ते पाहून तुम्हीही म्हणाल..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी तीन-चार दिवस उपाशीपोटी कराडमध्ये फिरणाऱ्या एका वृद्ध महिलेला कराड शहर पोलीस ठाण्यातील हवालदार मारूती चव्हाण आणि सहकारी पोलिसांनी आज तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले. विमल बाबासाहेब आटोळे (वय ६५, रा. कोळे, ता. कराड), असे त्या महिलेचे नाव आहे. लॉकडाऊन मध्ये अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात कराड पोलिसांनी … Read more

कराड येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह; 134 जण विलगीकरण कक्षात दाखल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील एका निकट सहवासिताचा अहवाल कोरोना बाधित (कोविड-19 ) आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 13, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 83, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 145, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 3 असे एकूण … Read more

सातारा जिल्ह्यात संध्याकाळी पुन्हा 2 नवे कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या 114 वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सकाळी कराड येथे 2 आणि सातारा येथ 1 जण असे एकूण ३ कोरोना पोझिटीव्ह रुग्ण सापडले होते. त्यानंतर दुपारी कराड येथे 12 आणि सातारा येथे 5 असे 17 जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर आता संध्याकाळीही जिल्ह्यात दोन … Read more

कराड तालुक्यात पुन्हा 12 नवे कोरोनाग्रस्त, साताऱ्यातील 6 कैदीही पॉजिटीव्ह; जिल्ह्यातील रुग्णसंख्या 113 वर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नुकतेच कराड तालुक्यात पुन्हा 12 आणि सातारा येथे 6 अशा एकूण 12 जणांचे कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. यामध्ये सातारा येथील सहा कैद्यांचा समावेश असल्याचे समजत आहे. आज सकाळी कराड तालुक्यात 2 आणि … Read more

कराड तालुक्यात कोरोना कसा फोफावला? जाणून घ्या पहिल्या रुग्णापासून आज पर्यंतचा पूर्ण प्रवास

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्याने नेहमीच राज्याच्या राजकीय, सामाजिक, वैचारिक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावली आहे. या तालुक्याने आजपर्यंत महाराष्ट्राला दोन खंदे मुख्यमंत्री दिले आहेत. खाशाबा जाधवांसारखे ऑलंम्पिकवीर दिले आहेत. मात्र आज कराड तालुका राज्यभरात चर्चेत आहे तो वाढत्या कोरोना रुग्णांमुळे. कराड तालुक्यात कोरोना कसा फोफावला हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र … Read more