10 महिन्याच्या बाळाने आणि 78 वर्षीय वृद्धेने ‘कृष्णा’च्या सोबतीने जिंकली कोरोनाची लढाई..

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 3 कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज या तिन्ही कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सर्वात कमी वयाचा पेशंट म्हणजेच डेरवण येथील अवघे 10 महिन्याचे बाळ आणि सर्वात वयोवृध्द पेशंट म्हणजेच म्हारुगडेवाडी (ता. कराड) येथील 78 वर्षीय महिलेसह … Read more

कराडमध्ये कृष्णा हॉस्पिटलबाबत सोशल मिडियातून अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोनाच्या महाभयंकर साथीमध्येही काही विकृत प्रवृत्ती सोशल मिडियाचा घातक वापर करत, सातत्याने वेगवेगळ्या अफवा पसरवित आहेत. या अफवांमुळे समाजाचे स्वास्थ बिघडत असून, जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे कटकारस्थानही रचले जात आहे. मात्र आता अशा प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निश्चय कराड पोलिसांनी केला आहे. कोरोनाच्या लढाईत जिल्ह्यात आरोग्यसेवा बजाविण्यात अग्रेसर असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलची … Read more

आज रात्री १२ नंतर कराड, मलकापूरसह ‘ही’ ११ गावे संपुर्ण सील, कलम १४४ लागू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेशान्वये जिल्ह्यात क्रिमीनल कोडचे कलम 144 लागू करण्यात आले आहे.  सातारा जिल्हयात सध्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांपैकी 8 रुग्ण हे कराड तालुक्यातील असल्याने कराड शहर व नजीकचे नगरपरिषद व शहरानजीकच्या विविध ग्रामपंचायते क्षेत्र हे प्रतिबंधात्मक क्षेत्र करण्याकरीता उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर कराड यांनी प्रस्तावित … Read more

३२ दिवस घरी न जाता ‘या’ शिवसैनिकाने वाटले २२८ डाॅक्टरांना स्वखर्चाने PPE किट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात कोरोनामुळे सध्या भीषन परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकार कोरोनाशी उत्तमरित्या दोन हात करत आहे. मात्र तरिही राज्यात डाॅक्टरांना पुरेशा प्रमाणात पीपीई किट मिळालेल्या नाहीत. यापार्श्वभुमीवर ३२ दिवस घरी न जाता सातार्‍यातील एका शिवसैनिकाने तब्बल २२८ डाॅक्टरांना स्वखर्चाने PPE किटचे वाटप केले आहे. कोरोनासारख्या भीषण परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील ११ … Read more

कराडात लाॅकडाउननंतर जिल्हाबंदी झुगारुन आले तब्बल ६५० जण?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात २४ मार्चपासू सर्वत्र लाॅकडाउन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्वत्र कडेकोट नाकाबंदी आहे. मात्र तरिही अनेकजण आडमार्गाने जिल्हाबंदी तोडून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाबंदी, नाकाबंदी असतानाही कराडमध्ये तब्बल साडेसहाशे नागरीक शहरात आले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली … Read more

कराडमध्ये तिसर्‍या दिवशीही 300 अतिक्रमणावर हातोडा

कराड नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात सुरू केलेली शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी तिसर्‍या दिवशीही सुरु होती. या मोहिमेत नगरपालिकेने 300 अतिक्रमणावर हातोडा मारला.

कराड नगराध्यक्षाच्या दालनाला ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी ठोकलं टाळ; वेळ न दिल्यानं घेतला आक्रमक पवित्रा

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कराडच्या नगराध्यक्षा रोहिनी शिंदे यांच्या येथील पालिकेतील केबिनला टाळे ठोकल्याची घटना आज घडली आहे. नगराध्यक्षा जनतेच्या कामांना महत्व देत नाहीत असा ठपका ठेवत या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील नगराध्यक्षा शिंदे यांच्या पालिका केबिनला चक्क टाळे ठोकून त्यांना लोकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन घरी बसावे … Read more

जेव्हा शरद पवार कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना खुर्चीवर बसायला सांगतात..

सातारा | सकलेन मुलाणी सद्रक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्या कामातील तत्परतेमुळे नेहमीच नावाजलं जातं. प्रसंग बाका असेल तर डोळ्यांत तेल घालून हे लोक काम करत असतात. अशा परिस्थितीत अनावश्यक प्रसंगी त्यांच्यावर कामाचा बोजा वाढू नये म्हणून लक्ष देणं आवश्यक असल्याची गरज शरद पवार यांनी व्यक्त केली होती. राजकीय कार्यक्रमात तत्पर … Read more

कृष्णा हॉस्पिटलमध्ये पेसमेकरची रोपण प्रक्रिया यशस्वी;पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच उपचार पद्धतीचा अवलंब

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात अद्ययावत पेसमेकरची यशस्वी रोपण प्रक्रिया नुकतीच पार पडली. अतिशय गुंतागुंतीची समजली जाणारी ही रोपण प्रक्रिया पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आली असून, हृदयविकारग्रस्त रूग्णांसाठी ही उपचार प्रणाली वरदान ठरणार आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी हृदयाची कार्यक्षमता कमी होणे आणि ठोके कमी पडणे … Read more

कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे वर्चस्व

प्रतिनिधी सकलेन मुलाणी : कराड सभासदांनी सहकार्य केल्यानेच सह्याद्री सह. साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असुन एक तारखेपासून राज्यात लिंकिंग च्या साह्याने कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. कराडच्या सह्याद्री सह.साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असुन राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. एकवीस जागासाठी … Read more