प्रेमप्रकरणातून कराडात तरुण-तरुणीची आत्महत्या ; अल्पवयीन तरुणीचा घातपात झाल्याची शक्यता

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेल्या पाच ते सहा दिवसापासून बेपत्ता असणार्‍या अल्पवयीन मुलीचा मृतदेह डिचोली ता. कराड गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी आढळून आला. मृतदेहाच्या गळ्याला गंभीर जखम असल्याने पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मागील पाच दिवसापूर्वी आत्महत्या केलेला युवकाचे व अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण होते. बुधवारी दि. 9 रोजी … Read more

RBI ने ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द, आता बँकेच्या ठेवीदारांचे काय होईल आणि किती पैसे परत मिळतील हे जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महाराष्ट्रातील कराडमधील अडचणीत आलेल्या ‘कराड जनता सहकारी बँक’ चा परवाना रद्द केला आहे. पुरेसे भांडवल नसणे आणि भविष्यातील बँकेच्या उत्पन्नाची कमकुवत शक्यता लक्षात घेता केंद्रीय बँकेने हा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर 2017 पूर्वी रिझर्व्ह बँकेने कराड जनता सहकारी बँकेवर काही निर्बंध घातले होते. परवाना रद्द झाल्यानंतर आता … Read more

‘कृष्णा’च्या शेतकऱ्यांने घेतले 80 गुंठ्यात 211 टनाचे विक्रमी ऊस उत्पादन

कराड ।  रेठरे बुद्रुक गतवर्षी आलेला महापूर आणि यंदाचा कोरोना संकट काळ या स्थितीत शेतीक्षेत्रासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. या काळात पीकांची मोठ्या प्रमाणात नासाडीही झाली. पण शेतकऱ्याकडे मेहनत करायची जिद्द असेल आणि त्याला कारखान्याचे भक्कम पाठबळ मिळाले, तर संकटाच्या काळातही शेतीत विक्रमी उत्पादन घेणे शक्य आहे, हे शेरे (ता. कराड) येथील एका युवा शेतकऱ्याने … Read more

कौतुकास्पद !! कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचा आकडा 3000 पार

Krushna Hospital Karad

सकलेन मुलाणी । कराड कराड । पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आज कोरोनामुक्तीचे तिसरे सहस्त्रक पूर्ण झाले. कृष्णा हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या 2 कोरोनामुक्त रूग्णांमुळे येथील कोरोनामुक्तीचा आकडा 3000 पार झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा मोठा … Read more

वाहतूक पोलीस महिलेची अभिमानास्पद कामगिरी ; हरवलेल्या चिमुकलीची आणि पालकांची करून दिली भेट

सकलेन मुलाणी । कराड सातारा दीपावलीच्या खरेदीसाठी आई-वडिलांबरोबर आलेली पाच वर्षांची चिमुकली कराडच्या मुख्य बाजारपेठेत हरवली. त्यामुळे तिचे जोरात रडणे सुरु झाले. तर कावरेबावरे झालेले आई-वडील बाजारपेठेत तिचा शोध घेऊ लागले. चिमुकलीचे रडणे एकूण ड्युटीवर असणाऱ्या महिला पोलिसांनी तिला जवळ बोलून शांत केले. ती हरवली असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन चिमुकलीला त्यांच्या … Read more

खासदार श्रीनिवास पाटील भात काढणीत व्यस्त ; कुटुंबीयांसमवेत केली भाताची कापणी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज भात कापणी केली. खासदार श्रीनिवास पाटील यांचे शेतीवर प्रेम कायमच आहे. त्यांच्या शेतात सध्या भाताचे चांगले पीक आले आहे. या कामात त्यांच्या सर्व कुटुंबीयांनी मदत केली. सर्व कुटुंबीयांचे फोटो सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहेत. श्रीनिवास पाटील यांच्या गोटे कराड येथील शेतात उत्तम … Read more

कराडातील सिग्नल यंत्रणेचा खेळखंडोबा ; नगरपालिका प्रशासन मात्र सुस्त

Traffic Signal

सकलेन मुलाणी | कराड कराड शहरात वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. अशावेळी शहरातील सिग्नल यंत्रणेचा खेळखंडोबा झाल्याचे दिसून येत आहे. कायम सिग्नल यंत्रणा बंद पडत असल्याने वाहनधारक सुसाट वेगाने धावत आहेत. अनेक चौकातील सिग्नल यंत्रणा केवळ नावापुरती असल्याचे दिसून येत आहे. कराड शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यात नगरपालिकेसह वाहतूक पोलीस प्रशासन सुस्त पडल्याचे चित्र प्रवाशांना पाहायला … Read more

कोणत्याही समस्येवर रामबाण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण ; बाळासाहेब थोरातांनी केले तोंड भरून कौतुक

Balasaheb Thorat

कराड | कोणत्याही समस्येवर रामबाण उपाय हवा असेल तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिवाय पर्याय नाही अस म्हणत बाळासाहेब थोरात यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुक केले आहे. पृथ्वीराज चव्हाण कधीही खोट बोलत नाहीत जे खर आहे तेच ते बोलणार आणि ते खोट आश्वासन कधीही देत नाही, बनवाबनवीचा कार्यक्रम नाही अस बाळासाहेब थोरात यांनी म्हंटल. कराड येथे … Read more

महाविकास आघाडी सरकार सुडबुध्दीने प्रत्येक गोष्ट करते – सदाभाऊ खोत यांचा आरोप

sadabhau

कराड | मिडीयामधला किंवा सामाजिक क्षेत्रातील एखादी व्यक्ती तुमच्या वर्मावर बोट ठेवून बोलत असेल तर त्याच तोंड बंद ठेवण्यासाठी जुनं प्रकरण काढून तुम्ही त्याला अटक केली. तुम्हांला अटक करायची होती तर एक वर्षे का थांबला? असा सवाल करत हे सरकार सूडबुद्धीने प्रत्येक गोष्ट करण्याच्या दृष्टीकोनातुन भूमिका बजावत आहे. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर … Read more

सोशल मीडियावर उद्धव ठाकरे, शरद पवारांची बदनामी ; दोन जणांवर गुन्हा दाखल

सकलेन मुलाणी । कराड कराड सोशल मिडीयावर महाविकास आघाडी सरकार तसेच मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याच्या आरोपावरून दोघांवर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा संघटक अक्षय तुलसीदास शिंदे यांनी याबाबतची तक्रार दाखल केली आहे. आकाश ठाकूर (रा. अमरावती) व रणजीतसिंग राणा अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी … Read more