कराड- पाटण शिक्षक सोसायटी निवडणूक : पॅनेलचा उमेदवार व्हायचे तर पार्टी फंड कम्पलसरी

Karad-Patan Teachers Society

कराड प्रतिनिधी|विशाल वामनराव पाटील कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच लागली असून तब्बल 19 जागांसाठी 67 जण रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणात गुरूजन एकता पॅनेल आणि श्री. गुरूमाऊली पॅनेल आमनेसामने आहेत. परंतु या पॅनेलमधून अधिकृत उमेदवार ठरविण्यासाठी चक्क 3 ते 4 लाख रूपयांचा निधी (पार्टी फंड) पॅनेलकडे सोपवावा, असा आदेश दिला असल्याची चर्चा … Read more

दुर्देंवी घटना : आईचं दूध श्वसन नलिकेत अडकल्याने चिमुकलीचा मृत्यू

mother's milk

कराड | साताऱ्यात एका चिमुकलीच्या घशात चाॅकलेट अडकल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदरची घटना ताजी असताना आता कराड तालुक्यातील कवठे येथे आईच्या अंगावर दूध पिताना श्वसन नलिकेत दूध अडकून अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वाती कृष्णत यादव … Read more

टोल देणार नाही अन् पासही घेणार नाही : पुणे- बेंगलोर महामार्गावर स्थानिक आक्रमक

Taswade Toll Plaza

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तासवडे टोलनाका परिसरातील 10 गावांना टोल देणार नाही अन् पास घेणार नाही, अशा घोषणा स्थानिकांनी आज टोलनाक्यावर दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक जमा होवून त्यांनी निदर्शने केली. तसेच पूर्वीप्रमाणे आरसीबुकवरून गाड्यांना सोडावे व स्थानिक नागरिकांसाठी सेपरेट लेन राखीव ठेवावी अशी मागणी लोकांनी केली. पुणे- बेंगलोर महामार्गावर असलेल्या तासवडे टोलनाक्यावर आज … Read more

गाडी लावण्याच्या कारणावरून कोयत्याने वार

Karad Police

कराड | गाडी लावण्याच्या कारणावरुन झालेल्या वादावादीनंतर एकाने चुलत भावासह भावजयवर कोयत्याने वार केले. सदाशिवगड-वनवासमाची, ता. कराड येथे सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत रेखा मारुती कुंभार यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन रमेश भगवंत कुंभार याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिवगड-वनवासमाची येथील मारुती कुंभार यांचा … Read more

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या युवकास सश्रम कारावास

Karad Court

कराड | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत तीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी युवकाला एक वर्ष सश्रम कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी सोमवारी ही शिक्षा ठोठावली. दिनेश विलास देटके (वय- 22, रा. कार्वेनाका, कराड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन … Read more

मोटर सायकल चोरणारे 3 जण सातारा व सांगली जिल्ह्यातून तडीपार

Karad Tadipar

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल वाहन चोरी करणाऱ्या टोळीप्रमुखांसह तिघांना तडीपार करण्यात आले आहे. याबाबतची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी केली आहे. तिघांना सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव व शिराळा तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतची पोलिस प्रमुख समीर शेख यांनी दिलेली माहिती अशी, कराड … Read more

चोरट्यांनी काढला राग अन् दुकानातील कपडेच जाळली

Vadgaon Haveli

कराड | सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चादर टाकून वडगांव हवेली (ता. कराड) येथील चार दुकानांसह एका घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी हजारो रुपयांची रोकड लंपास केली. तसेच गावातीलच एका लाँड्री दुकानात चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे हताश झालेल्या चोरट्यांनी इस्त्रीसाठी आलेले सर्व कपडे एकत्र करून त्यावर इस्त्री चालू करुन ठेवली. त्यामुळे येथील सर्व कपडे जळून … Read more

पूर्ववैमन्स्यातून एकावर धारदार शस्त्राने वार : संशयित तीन आरोपी फरार

Karad Police

कराड |येथील भोई गल्ली येथे पूर्ववैमन्स्यातून चौघांनी एकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अन्य तिघेजण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. शंकर भानुदास नलवडे (वय 29 रा. भोईगल्ली रविवार पेठ, … Read more

कराडला उद्या परीट समाजाचा वधू- वर पालक मेळावा

Parit community

कराड | संत गाडगेबाबा यांच्या 66 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कराड तालुका परीट समाज सेवा मंडळाच्यावतीने रविवार दि.25 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कराड येथील शुक्रवार पेठेतील नामदेव मंदिरात परीट समाजाचा 28 वा वधू-वर पालक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.मधुकर कोथमिरे (बारामती) हे उपस्थित राहणार आहेत. … Read more

कराडकरांसाठी अभिमानाची गोष्ट! सायमा पठाणची राज्य किशोरी कबड्डी संघात निवड

Liberty Mazdoor Mandal Karad Player

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी लातूर येथे झालेल्या किशोरी गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कु. सायमा पठाण हिने नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन केल्याने तिची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएसनच्या किशोरी गटाच्या राज्य संघात निवड झाली आहे. बोकारो (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद किशोर – किशोरी कबड्डी स्पर्धेसाठी राज्य असोशिएसनचा संघ नुकताच रवाना झाला आहे. सायमा पठाण हिचा लिबर्टी … Read more