तलाठ्याच्या भावावर वाळू चोरीची कारवाई; 3 लाख 36 हजाराचा दंड

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्या माण व खटाव तालुक्यात वाळू चोरी प्रकरणी रविवारी रात्री माण – खटावचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्यावतीने वाळू वाहतूक प्रकरणी नुकतीच कारवाई करण्यात आली. यामध्ये तानाजी अंकुश भोसले, (रा. दिवड, ता. माण) यास ताब्यात घेण्यात आले आहे. हिंगणी, ता. माण येथील तलाठी मालोजी अंकुश भोसले यांचा सख्या भाऊ आहे. यावेळी पथकाने चार … Read more

वडी विकास सेवा सोसायटी बिनविरोध; राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खटाव तालुक्यातील वडी येथील वडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया बिनविरोधपणे पार पडली. निवडणूक प्रक्रिया सुरु असतानाच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तेरा जागेसाठी बारा अर्ज आल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली. खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाणारी वडी गावची स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक … Read more

खटावला अवैध वाळूवर कारवाई : सातारा पोलिसांकडून जेसीबी, ट्रक्टर ट्राॅलीसह 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खटाव गांवचे हद्दीत भराडे वस्ती येथील येरळा नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन चालु असताना सातारा गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत जेसीबी व वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉलीसह 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुसेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या कारवाईत 26,14,000/- (रूपये सव्हीस लाख चौदा हजार) इतक्या किंमतीचा मुद्देमाल … Read more

तुरुंगातून निवडणूक लढवून प्रभाकर घार्गेंनी मारली बाजी : राष्ट्रवादीला धक्का

Prabhakar Gharge

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीप्रणित सहकार पॅनेलची पहिली उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटावमध्ये येऊन जाहीर केली होती. ‘मी जिल्हा लेव्हलचे काही पाहत नाही. मी फक्त राज्यातच पाहतो,’ असे सांगून अजित पवारांनी राष्ट्रवादीकडून नंदकुमार मोरे यांच्या नावाची घोषणा केली होती. वास्तविक राष्ट्रवादीचा निर्णय माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि त्यांच्या गटाला रुचला नव्हता. … Read more

जिल्हा बँकेच्या निवडणूक ठरावानंतर डॉक्टरचे अपहरण; गाडी जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ

माण | पानवन (ता. माण) येथे अज्ञातांनी डॉक्टरचे अपहरण करून गाडीची जाळपोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडला आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अपहरण झालेल्या डॉक्टरांचा ठराव घेतल्यानंतर घटना घडल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. डॉक्टरांचे अपहरण झाल्याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. नानासाहेब शिंदे (रा. पानवन ता. माण) … Read more

साताऱ्यात आहात, नोकरी नाहीये? मग हजार नोकऱ्यांची ही संधी तुमच्यासाठीच..!! त्वरा करा..!!

साताऱ्यातील औद्योगिक क्षेत्रात अशाच पद्धतीने काम उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योजकांनी आणि जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी पुढाकार घेतला आहे. साताऱ्यात कामासाठी असणारे इतर जिल्ह्यातील तसेच राज्यांतील हजारो मजूर आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

सातारकरांची चिंता वाढली; दिवसभरात २० नवीन कोरोनाग्रस्त, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २०१ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे २० नवीन कोरोनाग्रस्त सापडले असल्याचे समाजत आहे. संध्याकाळी ८ वाजता जिल्ह्यातील कराड, पाटण आणि खटाव तालुक्यात ४ कोरोना बाधित सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा आणखी १६ कोरोनाग्रस्तांचे सापडले असून त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे. … Read more

कराड, खटाव येथे २ नवीन कोरोनाग्रस्त; सातारा जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १२१ वर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यात एक आणि खटाव येथे एक असे एकूण २ जणांचे कोरोना अहवाल आज पॉजिटीव्ह आले असल्याचे बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे यांनी कळवले आहे. अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. कराड मध्ये एका रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून त्याला बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा … Read more

जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत मुलाने केला निर्घृण खून

जिल्हयातील खटाव तालुक्यातील मोराळे गावात मुलाने आपल्या जन्मदात्या आईच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरण शहाजी शिंदे असं वडूज पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मुलाचं नाव आहे. तर कांताबाई शहाजी शिंदे असं मयत महिलेचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. एका क्षुल्लक कारणावरून मुलगा किरण याने आपली आई कांताबाई हिच्याशी वाद घालत हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

पोपट बनसोडे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहिर

म्हसवड प्रतिनिधी | माण-खटाव पोलीस पाटील संघटनेचा आदर्श पत्रकार पुरस्कार आपल्या परखड लेखणीच्या माध्यमातून दुष्काळी माण तालुक्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे दै पुढारीचे पत्रकार पोपट बनसोडे यांना जाहीर झाला आहे. माण – खटाव पोलीस पाटील संघटनेचा पहिला वर्धापनदिना निमित्त स्नेहमेळावा 2 मार्च रोजी दहिवडी येथे साजरा करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या … Read more