ऊस तोडणी सुरु असताना सापडली बिबट्याची 3 पिल्लं; जवळपासच होती मादी बिबट्या

 कराड : तारुख येथिल पांढरीची वाडी येथील धरे शिवारात शेतकरी शंकर तुकाराम ढेरे यांच्या शेतात आज सोमवार दि. 31 जानेवारी रोजी दुपारी ऊस तोडणी सुरू असताना ऊस शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत. बिबट्याचा वावर, मानवी वस्तीत शिरकाव, प्राणी व माणसांवर होत असलेले हल्ले यामुळे किरपे, येणके नंतर आता तारूख व कूसूरू भागात शेतकरी, … Read more

मादी बिबट्या आणि बछड्याची अनोखी भेट वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात झाली चित्रित

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे मादी बिबट्या आणि तिच्या बछड्याची अनोखी भेट झाली. वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा प्रसंग चित्रित झाला आहे. वाटेगाव येथील एका शेतात, बिबट्याचा बछडा भटकंती करत आला होता. वन विभागाने या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते. वन विभागाने ह्या परिसरातील ग्रामस्थाना मार्गदर्शन केले. या परिसरात शांतता ठेवण्यात … Read more

किरपेत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद : वनविभागाने गुपचूप हलविला

कराड | तालुक्यातील किरपे येथे आज बुधवारी दि. 26 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात सापडला आहे. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची माहिती न होता, वनविभागाने हा बिबट्या किरपे गावातून अन्य ठिकाणी नेला आहे. कराड तालुक्यातील येणके येथे बिबट्या दोन महिन्यांपूर्वी पिंजऱ्यात अडकला होता. त्यानंतर आज 26 जानेवारी रोजी दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. मात्र, किरपे, … Read more

किरपेत बिबट्याने पुन्हा पाडला शेळीचा फडशा, एकाचवेळी दोन बिबट्याचे दर्शन

Bibatya

कराड | कराड तालुक्यातील किरपे येथे गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात परिसरातील पाळीव कुत्रे तसेच शेळ्यावर मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तर शेतात जाणाऱ्या लोकांच्यात भीतीचे वातावरण वाढत चालले आहे. मंगळावारी दि. 25 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेळीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. किरपे येथे गेल्या … Read more

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील किरपे येथील धनाजी देवकर या शेतकऱ्याच्या मुलावर गुरूवारी 20 जानेवारी रोजी बिबट्याने हल्ला केल्यावर त्याच्या वडिलांनी बिबट्याशी झुंज देत आपल्या मुलाला वाचविले. या धाडसाबद्दल माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनवरून कौतुक करीत त्यांना धीरही दिला. आ. चव्हाण काही कामानिमित्त मुंबईला असल्याने त्यांनी फोनवरून त्या … Read more

वडीलांना शेतात मदत करत होता 5 वर्षांचा मुलगा; अचानक झुडपातून बिबट्यानं झडप मारली अन्..

कराड | वडीलांना शेतातील कामात मदत करत असलेल्या एका पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. कराड तालुक्यातील किरपे या गावात सदर घटना घडली. गेल्या काही दिवसापूर्वी किरपे गावाशेजारील येणके येथे बिबट्याने पाच वर्षाच्या मुलावर हल्ला करून ठार केले होते. आता पुन्हा याच परिसरात बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. … Read more

बहिण-भाऊ थोडक्यात बचावले… झाडीत दबा धरुन बसलेल्या बिबट्याने केला दुचाकीचा पाठलाग

सांगली । वाळवा तालुक्यात अनेक भागांमध्ये गवा दिसून आल्याने नागरिकात भितीदायक वातावरण आहे. दरम्यान काही दिवसांपासून गायब असलेला बिबटया नेर्ले व कापूसखेड परिसरात सक्रिय झाला आहे. गुरूवारी रात्री नेर्ले ते कापूसखेड दरम्यान मार्गावर मोटरसायकलवरून जाणाऱ्या बहिण-भावंडावर बिबटयाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून मोटरसायकल वेगाने पळवल्याने मोठा अनर्थ टळला. वाळवा तालुक्यातील महामार्गालगत असणाऱ्या डोंगर व … Read more

पुणे बंगलोर महामार्गावर सापडला मृत बिबट्या; वाहनाच्या धडकेत मृत्यू?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला. वाठार ता. कराड येथे आज रविवारी 26 रोजी सकाळी ही उघडकीस आली. वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या बिबट्या रविवारी मृतावस्थेत आढळला. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या पथकाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील … Read more

बिबट्या सापडला असता तर 100 टक्के शिवबंधनच : ना. शंभूराज देसाई

Shivsena

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील मरळी- दौलतनगर येथील कारखाना स्थळावरील निवासस्थानी बिबट्याचे शुक्रवारी दर्शन झाले. घराच्या बागेतून बिबट्या फेरफटका मारुन गेल्याचा सीसीटीव्हीतील व्हिडिअो व्हायरल झाला होता. सुरक्षा रक्षकाने बिबट्याचा पाठलागही केला. जर बिबट्या सापडला असता तर त्याला 100 टक्के शिवबंधन बांधले असते, अशी मिश्किल प्रतिक्रिया … Read more

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी बिबट्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील मरळी- दाैलतनगर गावातील बंगल्यामध्ये मंगळवारी दि. 7 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. अचानक आलेल्या या बिबट्यामुळे सर्वांचीच भांबेरी उडाली. शंभूराज देसाई हे या बंगल्यात काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत बसले असताना या बंगल्याच्या आवारात हा बिबट्या आला. त्या नंतर लोकांनी आरडा- … Read more