लॉकडाऊन बळी! घरी चालत निघालेल्या मजुराने अर्ध्या रस्त्यातच गळफास लावून संपवला जीवनप्रवास

वर्धा । लॉकडाऊनमुळे हैद्रबादहून घरी चालत निघालेल्या एका स्थलांतरित मजुराने वर्ध्याजवळ पोहचताच शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरसिंह मडावी असं या मजुराचं नाव आहे. अमरसिंगने हैदराबादवरून चालत ४५० किमी अंतर कापलं होतं. मात्र, नागपूर-वर्धा सीमेवर गिरड येथे पोहोचल्यावर प्रचंड थकवा आणि हताश होत त्याने तिथेच एका शेतात झाडाला … Read more

गुड न्यूज! Amazon-Flipkart ची सर्व्हिस पुन्हा सुरु होणार

नवी दिल्ली । केंद्र सरकारने लॉकडाउन अजून दोन आठवड्यांसाठी वाढवला. लॉकडाउनचा तिसरा टप्पा 4 मे ते 17 मेपर्यंत असेल. या लॉकडाउनबाबतचं एक चांगलं वृत्त म्हणजे, अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या अत्यावश्यक नसलेल्या सामानांचीही डिलिव्हरी करु शकणार आहेत. केंद्रानं काही अटींसह यासाठीची परवानगी दिली आहे. अ‍ॅमझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना अनावश्यक सामानांची डिलिव्हरी करण्याचीही … Read more

इटलीत २ लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण, मृतांची संख्या २८ हजार पार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटलीमध्ये कोरोनाव्हायरस या साथीच्या आजारामुळे संक्रमित लोकांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे.येथील नागरी संरक्षण विभागाने शुक्रवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोविड -१९ च्या संसर्गाच्या एकूण २ लाख ७ हजार ४२८ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी २८ हजार २३६ लोकांचा मृत्यू झाला आहे. शिन्हुआने आपल्या अहवालात म्हटले आहे की गेल्या २४ … Read more

World Record । ‘रामायण’ ठरली जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिलेली मनोरंजन मालिका

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी । ऐंशीच्या दशकातील भारताचे महाकाव्य पौराणिक कथा ‘रामायण’ च्या पुनःप्रसारणाने जागतिक स्तरावर सर्वोच्च विक्रम नोंदवला आहे. 16 एप्रिल 2020 रोजी प्रसारीत केले गेलेले प्रसारण हे जगभरातील 7.7 कोटी प्रेक्षकांनी पाहिले आहे. लॉकडाउनच्या काळात सुरू झालेली ही मालिका TRP च्या बाबतीत सुरवातीपासून इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना मागे टाकत आहे. 16 एप्रिलच्या प्रसारणामुळे आता … Read more

आधार संबंधी केंद्राचा मोठा निर्णय! आधार कार्ड वरील माहिती अपडेट करणे आता ‘इतके’ सोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला आधार कार्डमध्ये काही अपडेट करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आहे.सध्या ही केंद्रे लॉकडाऊनमुळे बंद आहेत.ज्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.आता मात्र तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) च्या माध्यमातून आपले आधार कार्ड अपडेट करू शकाल.यूआयडीएआयने सुमारे २० हजार सामान्य सेवा केंद्रांना आधार अपडेट्स करण्याची परवानगी … Read more

देशात लॉकडाऊन पार्ट ३; लॉकडाउन 17 मे पर्यंत वाढवण्याची केंद्राची घोषणा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा दोन आठवड्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी 3 मे नंतरच्या परिस्थिती विषयी चर्चा केली. मोदी सरकारनं आणखी दोन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. एएनआय … Read more

आता लॉकडाऊनसुद्धा म्हणतंय..तारीख पें तारीख..!! देशभरातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला

नवी दिल्ली । तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हा सनी देओलचा डायलॉग आता भारतीयांना चांगलाच लक्षात राहणार आहे. कोरोनासारख्या महामारीने संपूर्ण जगभरातील लोकांना आपल्या तालावर नाचायला लावलेलं असताना भारतात सव्वा महिने वाढलेला लॉकडाऊन आणखी २ आठवडे वाढला आहे. ३ मे रोजी संपणारा दुसरा लॉकडाऊन आता १७ मे पर्यंत वाढवण्यात आला असून याची अधिकृत घोषणा … Read more

गृहमंत्रालयाचा आदेश म्हणजे तुघलकी फरमान; लोकांना बसने गावी पाठवायला लागतील ३ वर्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनमुळे इतर राज्यात मोठ्या संख्येने लोक अडकले आहेत.सध्या अस्तित्त्वात असलेल्या परिस्थितीचा विचार करता अडकलेल्या लोकांना घरी परत आणण्यासाठी गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना परवानगी दिलेली आहे. आतापर्यंत केवळ बसच्या माध्यमातून लोकांना परत आणण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयाचे वर्णन काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी तुघलकी फरमान म्हणून केले … Read more

आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लॉकडाउन १७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्याच्या वातावरणाचा थेट परिणाम सामान्यांच्या आर्थिकतेवर पडत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र ज्यांचे पोट तळहातावर आहे अशांना लॉकडाउनमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे देश लॉकडाउन असण्याला आता पाहता पाहता १ मी उजाडला … Read more

३ मे नंतर सरकारचा ‘हा’ प्लान; पहा तुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये आहे?

नवी दिल्ली । ३ मे रोजी देशातील लॉकडाऊन संपुष्टात येत असून त्यानंतर सरकार काय निर्णय घेते यावर अजूनही चर्चा होते आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना रेड, औरन्ग आणि ग्रीन अशा तीन झोन मध्ये विभागण्यात आले आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली असून सादर जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, … Read more