आंबा, द्राक्ष बागा भुईसपाट : माण तालुक्याला अवकाळीने झोडपले, शेतकऱ्यांची पंचनामा करण्याची मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण तालुक्यात मध्यरात्री अवकाळी वादीळवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. पळसावडे , देवापूर, शिरताव, वरकुटे- मलवडी परिसरात रात्री 10 च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह चक्रीवादळ व गारपीठासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, आबा बागायतदारांसह कारले, दोडका व टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. या चक्रीवादळात पळसावडे येथील द्राक्ष बागायतदार कुंडलिक यादव यांची … Read more

मुंबईत माणच्या पाणीदार गावांचे पुस्तक व फिल्मचे आज प्रकाशन

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी समन्यायी पाणी वाटपाची संकल्पना मांडणारे क्रांतीबा जोतीबा फुले यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत सातारा जिल्ह्यातील पाणीदार गावात राबविलेल्या पाणी व्यवस्थापन प्रक्रियेचे व्यापक सादरीकरण, पुस्तक अनावरण आणि फिल्मचे प्रकाशन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. कोरो इंडिया, मुंबई व ग्रासरुट व्हॉईस ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र यांच्या … Read more

सिल्वर ओक बंगला हल्ला प्रकरणी दहिवडी येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून निषेध मोर्चा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मुंबई येथील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर एस टी कर्मचाऱ्यांनी चप्पल व दगडफेक केली. या संपूर्ण परिस्थितीला आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या दयनीय स्थितीला शरद पवारांना जबाबदार धरत एस टी कर्मचाऱ्यांनी केलेल्या या हल्ल्याचे संपूर्ण राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने या हल्ल्याच्या निषेधार्थ जागोजागी … Read more

तहसिलदारांचे परिपत्रक : माण तालुक्यात वाळू, मुरूम व मातीसह गौण खनिज उत्खननास मनाई

दहिवडी | तहसील कार्यालय माण येथून प्रसिद्द झालेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार माण तालुक्यात तहसीलदार यांनी शासन निर्णयानुसार वाळू, मुरूम व माती यासह इतर गौण खनिजांचे विनापरवाना उत्खनन व वाहतूक केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशाचे परिपत्रक जारी केले आहे. माण तालुक्यात याआधी तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी खडी क्रशर आणि वाळू … Read more

हटके पण भारीच की राव : चक्क ! चप्पल 8 किलो वजनाची अन् 31 हजारांची

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके हौसेला मोल नसतं म्हणतात याची प्रचिती आपल्याला नेहमीच येत असते. अनेक हौशी माणसं आपली हौस पुर्ण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतात. सातारा जिल्ह्यात असेच एक हौशी व्यक्तीमत्व आहे जे चक्क 8 किलोची नागीण चप्पल वापरतात. सातारा जिल्ह्यातील असलेल्या माण तालुक्यातील जांभुळणी गावचे केराप्पा कोकरे या 60 वर्षांचे गृहस्थ चक्क 8 किलोची … Read more

परीविक्षाधीन तहसीलदारांचा दणका : माण तालुक्यात 11 स्टोन क्रशर सील

दहिवडी | माण तालुक्यात ठिकठिकाणी वर्षानुवर्षे डोंगर पोखरून खडी, क्रश सँड, डबर अशा गौण खनिजची लूट करणार्‍या खाणसम्राटांना माणचे परीविक्षाधीन तहसीलदार रिचर्ड यानथन यांनी दणका दिला. विविध ठिकाणी बेकायदेशीरपणे सुरू असलेले 11 स्टोन क्रशर त्यांनी सील केले तसेच गौण खनिजची अनधिकृत वाहतूक करणारी वाहने जप्‍त केली. माण तालुक्यात अनाधिकृत खाणी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर रिचर्ड … Read more

शरद पवारांनी 22 नेते कोट्यावधींना विकत घेतले होते : आ. जयकुमार गोरे

Jaykumar Gore

दहिवडी | माणच्या जयकुमार गोरेंनी मला माढा मतदार संघातून घालवून देशात माझी अब्रू घालवली. काहीही करून सगळे एकत्र या आणि त्यांना पाडा,’ असा आदेश पवार यांनी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत दिला होता. तसेच मतदारसंघातील 22 नेते कोट्यवधींना विकत घेण्यात आले होते, असा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवारांवर केला आहे. दिवड येथे विविध विकासकामांच्या … Read more

मृत्यूवेळी बापाचा टाहो मुलाला वाचवा : अपघातातील पिता- पुत्रावर एकाच सरणावर अंत्यविधी

म्हसवड | माण तालुक्यातील नरबटवाडी (ढाकणी) येथील पिता- पुत्राला भरधाव बोलेरो चारचाकी गाडीने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अपघातात वडिलांसोबत दुचाकीवरून निघालेला 13 वर्षाचा मुलगा ठार झाले आहे. ढाकणी फाट्यावर ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या घटनेची फिर्याद म्हसवड पोलिस ठाण्यात  मयत पोपट तातोबा नरबट याचा चुलत भाऊ सुरेश मारुती नरबट (वय- 38, रा. … Read more

आमच्यातील गद्दारांमुळे राष्ट्रवादीला निसटते यश मिळताच मस्तीची भाषा : आ. जयकुमार गोरे

MLA Jaykumar Gore

सातारा – एक दोन निवडणूकांमध्ये आमच्यातीलच काही गद्दारांमुळे राष्ट्रवादीला निसटते यश मिळताच हुरळून जात मस्तीची भाषा सुरु झालीय. पण मस्ती उतरविण्यात माझी पीएचडी झालीय हे विसरु नका. मी तीन वेळा आमदार होवूनही जमिनीवर आहे. माझ्या विरोधात अनेकांनी पैसा ओतलाय. पैसा संपेपर्यंत त्यांना मी बसू दिले नाही. मतदारसंघातील राष्ट्रवादीवालेही म्होरक्याला पैसा संपेपर्यंत खाली बसू देत नाहीत. … Read more

सातारच्या सुपुत्राचा केंद्रात गौरव : आसामचे मुख्य निवडणूक आयुक्त नितीन खाडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याचे व माणचे सुपुत्र व आसाम राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नितीन खाडे यांनी निवडणुकीसंबंधी राबविलेल्या नाविन्यपूर्ण यशस्वी उपक्रमांची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने माण तालुक्याच्या व सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राचा देशपातळीवर होणारा गौरव प्रत्येकासाठीच अभिमानास्पद वाटत आहे. कोव्हिड19चा प्रादुर्भाव लक्षात घेता आसाम राज्याच्या विधानसभा निवडणूका … Read more