एमआयएमची दुसरी यादी जाहीर, सोलापूरमधून तीन उमेदवारांची नावे

सोलापूर प्रतिनिधी। वंचित बहुजन आघाडी कडून एमआयएम पक्षाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही तसेच विधानसभेसाठी आठच जागांची ऑफर दिल्याचे सांगत एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी युती तुटल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तातडीने त्याने ११ सप्टेंबर ला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर मधील काळात पुन्हा युती होणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली … Read more

 माजी आ.परिचारक निवडणूक लढणार ?

सोलापूर प्रतिनिधी। माजी आमदार सुधाकर परिचारक यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिलेआहेत. माजी आमदार सुधाकर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक आज सायंकाळी येथील टिळक स्मारक सभागृहत पार पडली. यावेळी शहरातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी  सुधाकर परिचारक यांनी निवडणूक लढवावी. असा सर्वानुमते ठराव नगराध्यक्षा साधना भोसले यांना दिला. सुधाकर परिचारक यांनी पंढरपूरचे सलग 20 … Read more

‘भाकप’ तर्फे कोल्हापूर उत्तरसाठी उमेदवार जाहीर

कोल्हापूर प्रतिनिधी। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून सतीशचंद्र कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार आज जाहीर करण्यात आला आहे. युती सरकारने शेतकरी, विद्यार्थी, अल्पसंख्यांक, दलित महिला आणि असंघटित कामगार यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केलं आहे. ‘विरोधी पक्ष कमकुवत ठरल्याने सक्षम पर्याय म्हणून भारतीय … Read more

कर्नाटक सीमा भागात १४ ठिकाणी नाकाबंदी, पोलीस दल निवडणुकांसाठी सज्ज

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील भांगात विशेष दक्षता घेणारी पाऊल उचलण्यात अली आहेत. त्यानुसार ‘ सीमावर्ती भांगातून रक्कम घेऊन जात असताना 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यासोबत पुरावा म्हणून आवश्यक ती कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अन्यथा अशी संशयीत रक्कम आयकर विभागाकडे वर्ग … Read more

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाला आणखी एक धक्का!!

सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला विधानसभेच्या तोंडावरच आणखी एक धक्का बसला आहे. चव्हाण यांचे खंदे समर्थक समजले जाणारे आमदार आनंदराव  पाटील यांनी भाजप प्रवेशाबाबत स्वतःची भूमिका कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये जाहीर केल्यानंतर आठच दिवसात त्यांचे पुत्र प्रताप पाटील व पुतणे शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील हे भाजपाच्या वाटेवर आहेत. … Read more

गोपीचंद पडळकर पुन्हा भाजपच्या वाटेवर ; वंचितच्या अडचणी वाढल्या

सांगली प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील कंबर कसली आहे . पण लोकसभा निवडणुकीत वंचितकडून सर्वाधिक मतं घेतलेल्या गोपीचंद पडळकर वंचितपासून काहीसे अलिप्त झाल्याची चर्चा आहे. पडळकर भाजपमध्ये जातील, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चित्र आहे . युती … Read more

इस्लामपूर मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मध्ये धुसफूस

सांगली प्रतिनिधी। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपमधून गौरव नायकवडी तर शिवसेनेतून आनंदराव पवार या दोन नावावर वाळवा तालुका समन्वय समितीचे एकमत झाले आहे. या दोघांपैकी एका उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील जो उमेदवार ठरवतील त्याचे प्रामाणिकपणे काम करू. आत-बाहेर करणार नसल्याची ग्वाही … Read more

सांगली विधानसभेसाठी काँग्रेसकडून जयश्री पाटील?

सांगली प्रतिनिधी। सांगली विधानसभा मतदारसंघातून जयश्री पाटील यांना कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विश्वजीत कदम यांच्याकडे केली. तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना देखील मागणीचे निवेदन पाठवून देण्यात आले. दरम्यान, मदनभाऊ गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक विष्णू अण्णा भवन येथे पार पडली. या बैठकीत विधानसभा मोठ्या ताकदीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला. सांगली … Read more

युती बाबत उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला

मुंबई प्रतिनिधी | युती बाबत अंतिम बोलणी झाली आहेत अशा बातम्या येऊ लागल्या नंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या भूमिकेत उद्धव ठाकरे यांनी युतीची बोलणी लोकसभा निवडणुकीसाठीच झाली आहेत. ५०-५० टक्के जाग्यांवर आम्ही लढणार आहे हि माध्यमांनी उठवलेली बातमी आहे. वास्तवात आमच्यात जे जागा वाटप झाले आहे. त्यासंदर्भात लवकरच … Read more

अखेर मनसे विधानसभा निवडणूक लढणार ; राज ठाकरेंनी मागवली इच्छुकांची यादी

मुंबई प्रतिनिधी | राज ठाकरे यांची मनसे आता विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे महाराष्ट्र विधानसभेच्या १०० जागा लढण्याची शक्यता आहे. त्या संदर्भात राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज’वर विभाग प्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यांनी या बैठकीत निवडणुकीला सामोरे जाण्यासंदर्भात बातचीत केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, हिंगोली, जळगाव आदी जिल्ह्यात … Read more