कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागर कोल्हापूरच्या नेटकाऱ्यांकडून ट्रोल

प्रचाराच्या वेगात शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षिरसागर यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात झालेल्या चुकांमुळे कोल्हापूरच्या नेटकाऱ्यांमधून चांगलेच ट्रोल होत आहेत. आज दिवसभर या जहिरनाम्यातील चुकीमुळे सोशल मिडिया मध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे.

गडकिल्यांवर लग्न सोहळ्याप्रकरणी उदयनराजेंचा खुलासा

‘मला काय वेड लागले आहे का गड किल्यावर डांन्सबार सुरु करा असं सांगायला. असा विचार करण्यापेक्षा मला मेलेले परवडले. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे आणि यातून माझे चारित्र्यहनन केले’ असा आरोप सातारा लोकसभा पोटनिवडणूकीच्या रिंगणात उभे असलेले उदयनराजे भोसले यांनी केला.

भाजपच्या काळात विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागील सरकारच्या काळात उद्योगांसाठी वीजदर जास्त होती. मात्र आपल्या सरकारने विदर्भाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रापेक्षा वीजदर ३ रुपयांनी कमी दिली याचाच परिणाम म्हणून त्यांनी विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती मधील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.

रविकांत तुपकर परतले ‘स्वगृही’

‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ सोडून ‘रयत क्रांती संघटने’त गेलेल्या रविकांत तुपकर यांनी अवघ्या १९ दिवसात यु टर्न घेत पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांच्या छातीवर बिल्ला लावून त्यांना पुन्हा प्रवेश दिला. ‘स्वभिमानी संघटने’त असलेल्या अंतर्गत मतभेदातून संघटना सोडल्या’चं रविकांत तुपकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

गावकऱ्यांनी केली भाजप आमदाराला ‘गावबंदी’ बैलगाड्या आडव्या लावून अडवली गाडी

निवडणूक प्रचारासाठी गावात येत असलेल्या भाजप उमेदवार आणि विद्यमान आमदाराची गाडी गावात येण्यापूर्वीच गावकऱ्यांनी बैलगाड्या आडव्या करून अडवली. तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे हा प्रकार घडला. अकोट मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि भाजप उमेदवार प्रकाश भारसाकळे यांना वान प्रकल्पाच्या मुद्द्यावरून परिसरातील काही गावांनी गावबंदी केली आहे.

धनंजय मुंडेंनी ‘हटके ट्वीट’ करत दिल्या मोदींना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या परळीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मोदींचे हटके स्वरुपात स्वागत करणारे ट्विट केले आहे. धनंजय मुंडे ट्वीटमध्ये म्हणतात, “मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत!, पण एकच इच्छा आहे. परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास’ दिसेल. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान तुम्ही ४ तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी-अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या. शुभेच्छा!”

‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ नाऱ्याचा आदित्य ठाकरेंना विसर, विडिओ वायरल

निवडणुकीच्या काळात मतदारांची मने जिकंण्यासाठी उमेदवार वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात. मात्र, असाच काहीसा प्रयन्त करत असताना नातवाला आजोबांच्या विचारांचा विसर पडावा हे आश्चर्यच आहे. मुंबई स्थित दक्षिण भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी चक्क लुंगी घातल्याचा विडिओ वायरल झाला आहे. ७० च्या दशकात मराठी माणसांच्या हितासाठी दाक्षिणात्य विरोधी भूमिका घेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ अशी ऐतिहासिक घोषणा दिली होती. परंतु आता वरळीतून निवडणूक लढवणारे लुंगीधारी आदित्य ठाकरे बहुभाषिक राजकारणाचा नारा देताना दिसत आहे.

कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही? – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवाजी महाराजांच्या भुमीवरुन राजकीय स्वार्थासाठी आजकल महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कलम ३७० चं काय घेणंदेणं असे सवाल विचारले जात आहेत. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नसेल जिथल्या जवानांनी काश्मीरमधील शांततेसाठी बलिदान दिले आहे. मग, याच शांततेसाठी हटवलेल्या कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला आहे. राज्यात कलम ३७०वरुन विरोधकांनी भाजपाला टार्गेट केल्यानंतर मोदी या मुद्दावरुन आक्रमक झाले आहेत. अकोला येथे महायुतीच्या प्रचारा दरम्यान ते बोलत होते.

नथुराम गोडसेंच्या भक्तांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये – भूपेश बघेल

भाजप आरएसएसचा राष्ट्रवाद मुसोलिनी, हिटलरच्या विचाराने प्रेरित दुटप्पी राष्ट्रवाद असून नथुराम गोडसेंना मानणाऱ्यांनी आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी भाजपावर केली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार यशोमती ठाकूर यांच्यासाठी नांदगाव पेठ येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागणं म्हणजे जनतेत भाजपबद्दल नाराजी आहे- शरद पवार

जनतेची भाजपाबद्दलची नाराजी मुख्यामंत्र्यांना कळाली आहे. त्यामुळं तर त्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागत आहे. असा टोला राष्ट्रवादीचे सेर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस लगावला. पवार राहुरी मतदारसंघात प्रचार सभेसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केल.