या निवडणुकीत काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करा – स्मृति ईराणी

आपण सर्वजण दिवाळीच्या आगोदर घर स्वच्छ करतो त्याप्रमाणे येत्या विधानसभेला महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा. राष्ट्रवादीबद्दल मी बोलणार नाही कारण ”जिनका समय ही खराब हो वो दुसरों का क्या भला करेंगे’,क्योंकी उनकी घडी बंद पड चुकी है ”अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचा समाचार घेतला. सांगली विधानसभा निवडणुकीसाठीचे महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ मारुती चौक येथे घेण्यात आलेल्या जाहीरसभेत स्मृती ईराणी बोलत होत्या.

देशात काँग्रेसची अवस्था चाय पेक्षा किटली गरम असल्या सारखी – लक्ष्मण सौदी

‘राष्ट्रवादी व काँग्रेसला उमेदवार न मिळाल्यानेच त्यांना इतरांची मदत घ्यावी लागली. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीची चहापेक्षा किटली गरम झाली असल्या सारखी आहे. अशी टीका कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी सांगली येथील भाजपच्या प्रचार सभेत बोलताना केली. दरम्यान सौदी यांनी सांगलीतील व्यापाऱ्यांशी सुद्धा संवाद साधला.

‘तुबची-बबलेश्वर’चे पाणी देणारच अन्यथा जतमध्ये पाऊल देखील ठेवणार – विश्वजीत कदम

काँग्रेस  ही संकल्पना काँग्रेस उमेदवार विक्रम सावंत यांची असून या योजनेमुळे जतला पाणी मिळणार आहे. जतकरांना जर का हे पाणी मिळाले नाही तर मी जतमध्ये पाऊल देखील ठेवणार नसल्याचा निर्वाळा पलूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम यांनी केला. येत्या जानेवारीत आम्ही दोन कारखान्यांचे काम सुरू करणार असल्याचे हे त्यांनी यावेळी सांगितले. ते काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारार्थ बनाळी, शेगाव व कुंभारी येथील जाहीर सभेत बोलत होते.

जिरवा-जिरवीचे राजकारण करणे हा विरोधकांचा उद्योग – सदाशिव पाटील

खानापूर मतदारसंघात विकासाचा माइलस्टोन ठरणारे एकतरी काम विद्यमान आमदारांनी केलेले दाखवावे. अवैधधंद्यांना संरक्षण द्यायचे, कॉन्ट्रॅक्टदारांना पाठीशी घालून नकारात्मक राजकारण मतदारसंघात करत फक्त आडवा-आडवी जिरवा-जिरवीचे उद्योग करायचे, हा विरोधकांचा उद्योग आहे, अशी घणाघाती टीका अपक्ष उमेदवार माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या ‘पैलवान’ वक्तव्यावरून जयंत पाटलांना हसू आवरेना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार प्रचार सभेत आपण तेल लावून लढाईसाठी तयार आहोत असे सांगत आहेत, मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळूदेत कि तेल लावलेला मुख्यमंत्री कसा दिसतो. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.

आज ताकद दाखविली तरच पुढच्या निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

काँग्रेस-राष्ट्रवादीने आता एकत्र काम करून भाजपचा पाडाव करणे आवश्यक आहे. आज राजकीय ताकद दाखविली तरच पुढच्या महापालिका निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, त्यासाठी आता कामाला लागावे व काँग्रेसला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिल्या. महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार पाटील यांनी आघाडी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आ.पाटील बोलत होते. बैठकीला उमेदवार पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, मनिषा रोटे, उत्तम साखळकर, नामदेवराव मोहिते, संजय बजाज, कमलाकर पाटील, मैनुद्दीन बागवान, महेश खराडे आदी उपस्थित होते.

भारताला हिंदू राष्ट्र बनू देणार नाही; ओवेसींचे भागवत यांना आव्हान

भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. एका जाती धर्माचा हा देश नाही. भारत कधीही हिंदू राष्ट्र नव्हता आणि कधीही बनणार नाही. भारलाता हिंदू राष्ट्र बनू देणार नाही असे आव्हान एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदूद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना यांना दिले.

कागलमध्ये राजकीय वातावरण तापलं; नेत्यांच्या सभा, कार्यकर्त्यांच्या ‘फिल्डिंग’ला वेग

राज्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळख असलेल्या ‘कागल’चे राजकिय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. हसन मुश्रीफ गट, संजय घाटगे गट, मंडलिक गट, समरजित घाटगे गट यांच्यामध्ये चांगलेच राजकारण व रस्सीखेच दिसत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाकडून हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा विधानसभेसाठी अर्ज भरला आहे. मुश्रीफांना दुसरी हट्रिक करण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार असल्याची चर्चा सध्या जोरदार या विधानसभा मतदार संघात ऐकायला मिळत आहे.

बुलडाण्यातील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार; गावात लावले फलक

बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मोताळा तालुक्यातील वडगाव महाळुंगे या गावांमध्ये गेल्या पाच वर्षापासून गावात जाण्यासाठी रस्ता नाही. गावांमध्ये पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. गेल्या पाच वर्षापासून गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नसल्याने वडगाव महाळुंगे येथील गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून जोपर्यंत गावाचा विकास होणार नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. अशा आशयाचा फलक देखील गावात लावला आहे.

विदर्भात निवडणुकांचं रान तापवण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज; अकोल्यात आज भव्य सभा

पश्चिम विदर्भातील भाजप सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकोल्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.