संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर तो लांबविण्यासाठी होती – सुजय विखे पाटील 

अहमदनगर । देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काही नियम शिथिल करून देशातील संचारबंदी ३० जूनपर्यंत  आली आहे. गेल्या २ महिन्यापेक्षा अधिक काळातील संचारबंदीमध्ये हळूहळू नियम शिथिल केल्यामुळे रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.  मात्र भाजपाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या एका विधानाने  ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी ही संचारबंदी कोरोना थांबविण्यासाठी नाही तर कोरोना लांबविण्यासाठी करण्यात आली असल्याचे … Read more

अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत निर्णय जवळपास झाला; उदय सामंत यांची माहिती

मुंबई । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा जून महिन्यातही बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असताना उच्च शिक्षण खात्या अंतर्गत येणाऱ्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार का याबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १२:३० वाजता सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा चर्चा केली. या चर्चेत … Read more

शाळा, महाविद्यालयं सुरु झाल्यास कसं असणार त्यांचं कामकाज? घ्या जाणून..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटकाळात शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने बैठका घेतल्या होत्या त्याचप्रमाणे या आपत्कालीन परिस्थितीत शैक्षणिक सत्राबाबत शासनाने राज्य शिक्षक परिषदेकडे काही सूचना मागितल्या होत्या. त्यानुसार परिषदेने नियोजन प्रारूप आराखडा सादर केला आहे. अशी माहिती या परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव गवळे व उपाध्यक्ष मोहन ओमासे यांनी दिली आहे. हे प्रारूप तयार करण्यासाठी … Read more

१ जून नंतर काय? मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३० जानेवारीला देशात पहिला कोरोना रुग्ण सापडला. मार्च मध्ये जगातील आणि देशातील रुग्णसंख्या पाहून सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. देशातील परिस्थिती बिकट होत असल्याचे लक्षात घेऊन सरकारने संचारबंदीची मुदत वाढवत नेली. आता ३१ मे पर्यंत वाढविलेली संचारबंदी १ जूनला हटवली जाणार की संचारबंदी अशीच सुरु राहणार आणि नियम शिथिल … Read more

पानपट्टी चोर काम कर जा; निलेश राणेंनी पाणीपुरवठा मंत्र्यांना सुनावले 

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । नारायण राणे यांचे सेनेशी पूर्वीपासूनच नाते आहे. सेनेमुळेच ते मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावर आले. असे विधान पाणीपुरवठा मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राणेंनी भेट घेतली त्यावेळी गुलाबरावांनी हे विधान केले होते. या विधानाला उत्तर देत आपल्या … Read more

उद्धव ठाकरेंचा ‘हा’ फोटो शेअर करून नितेश राणेंनी उडवली खिल्ली 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट मुळे नितेश राणे सतत चर्चेत असतात. आपल्या ट्विटर अकॉउंट सतत काहीतरी शेअर करून ते वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. आता आणखी एका पोस्टमुळे ते चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सार्वजनिक रित्या खिल्ली उडवली आहे. त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून एक संपादित फोटो शेअर केला … Read more

‘रेल्वे बुलाती हैं’ पण महाराष्ट्र सरकार म्हणतंय ‘जाने का नहीं’.. कारण ?

वृत्तसंस्था । १ जून पासून रेल्वेची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्याचे ऑनलाईन बुकिंग ही सुरु करण्यात आले होते. बुकिंग सुरु केल्यावर दोन तासातच दीड लाख प्रवाशांनी बुकिंग बुकिंग केल्याची माहिती रेल्वेने दिली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने राज्यातील आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातली आहे. तसे आदेश त्यांनी रेल्वेला पत्राद्वारे दिले आहेत. रेल्वेकडून १०० विशेष रेल्वेची यादी … Read more

आता अंतिम आदेश माझाचं! प्रशासकीय गोंधळ टाळण्यासाठी ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई । लॉकडाऊन आणि कोरोनाच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील आदेशांमध्ये राज्य पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून आले होते. अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाने परस्पर आदेश काढल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रशासकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून सोमवारी यासंदर्भतील निर्देश जारी करण्यात आले. आज राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी … Read more

मुख्यमंत्री ठाकरे आज काय बोलणार? रात्री ८.३० वाजता साधणार जनतेशी संवाद

मुंबई । महाराष्ट्र करोना विरुद्ध लढा देत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी राज्यातील जनतेशी संवाद साधत असून आज रात्री ८.३० वाजता मुख्यमंत्री पुन्हा एकदा राज्याला संबोधित करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री राज्याला कोणता संदेश देतात?, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. काही लॉकडाऊन-४ जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज प्रथमच जनतेला संबोधित करत असून करोनाची साथ आणि … Read more

‘या’ गोष्टींवर मंत्र्यांनी दर्शवली तीव्र नाराजी; मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

मुंबई । आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासन बऱ्याच मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासनाविरोधात तक्रार केली. ज्या पद्धतीने प्रशासनातील अधिकारीवर्ग परस्पर निर्णय घेत आहे आणि राबवताना घोळ घालत आहे, याबाबत मंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनात नसलेले समनव्य, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडून परस्पर निघत असलेले आदेश आणि निर्णय … Read more