तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेतेपदी

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होऊन २४ तासही झालेले नसताना राज्यात सरकार कोण स्थापणार याविषयी वेगवेगळे तर्क लावले जाऊ लागले आहेत. शिवसेनेसोबत बोलणी फसली तर देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करावं लागण्याची नवी शक्यता समोर आली आहे. या परिस्थितीत शिवसेना राष्ट्रवादीच्या थेट तर काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर सरकार स्थापनेवर दावा करू शकते. भाजप-शिवसेना महायुतीचं एकूण बळ १५९ आमदारांचं आहे तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि काही अपक्ष मिळून हे संख्याबळ १७० पर्यंत पोहचत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं ‘मी पुन्हा येणार’ हे वक्तव्य ‘विरोधी’ पक्षनेतेपदासाठी होतं का? याची चर्चा रंग धरू लागली आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारने ९६ टक्के आश्वासने पूर्ण केली; ‘भाजपा’च्या लोकनीती केंद्राचा दावा

लोकनीती संशोधन केंद्राने अहवाल प्रसिद्ध करून २०१४ च्या जाहीरनाम्यातील ९६ टक्के आश्वासने पूर्ण केल्याचा दावा केला. जातसमूह आणि त्यांच्या अस्मितेचा प्रश्न सोडवतानाच विकासाचे राजकारण फडणवीस सरकारने केल्याचा युक्तिवाद ‘लोकनीती’चे संचालक आणि खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी गुरुवारी ‘वॉक द टॉक’ या अहवाल प्रकाशना वेळी केला.

भाजपच्या काळात विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागील सरकारच्या काळात उद्योगांसाठी वीजदर जास्त होती. मात्र आपल्या सरकारने विदर्भाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रापेक्षा वीजदर ३ रुपयांनी कमी दिली याचाच परिणाम म्हणून त्यांनी विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती मधील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.

२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही – मुख्यमंत्री

”२०२१ पर्यंत राज्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. प्रत्येकाला सरकारच्या माध्यमातून घर बांधुन देऊन त्याला सर्व सुविधा देणार” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिराळा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या भाजपाचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांच्या प्रचारार्थ काल वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलत होते.

“तुझी इच्छा असेल तर माझी तुझ्याशी लग्न करायची तयारी आहे.. !!” महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या आंतरजातीय लग्नाची रंजक गोष्ट

“मी तिच्याजवळ लग्नाचा विषय काढला त्यावेळी ती हलकेच हसली. तिला त्या वेळी मी लॅक्मे पावडरची डबी भेट दिली होती. त्यावेळी तिला मी दिलेली ही पहिली भेटवस्तू. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचा स्वभाव मला आवडायचा. ती कमी बोलायची. हातचं राखून बोलायची. पण तिला चांगल्या फुलांची, चांगल्या गाण्यांची आवड होती. तिच्या आणि माझी आवडीनिवडी सारख्याच होत्या. तिच्या भावाला मात्र आमचं असं एकत्र असणं पटत नव्हतं.”

‘मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा नाही’ – चंद्रकांत पाटील

‘निवडणुकीपूर्वी पक्षाने राज्यातील सर्व जागांचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणानुसार कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असे मला सांगण्यात आले. निवडणूक लढवीत असलो तरी मुख्यमंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा मला नाही,’ असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले.

अखेर..वडिलांच्या उपचारासाठी दूरदर्शनच्या टॉवर वर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद प्रतिनिधी। वडिलांचे यकृत खराब झाल्याने मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत होत नसल्याने तरुणाने सर्वांच्या पायऱ्या झिझवल्या, उपोषण केले मात्र दाखल घेतली जात नसल्याने आत्महत्येची धमकी देत तरुण थेट दूरदर्शनच्या टॉवरवर चढला त्यानंतर लोक प्रतिनिधी व नागरिकांनी त्यास आश्वस्त केल्यानंतवर तो खाली उतरला.नागरिकांनी उपचारासाठी तरुणाची आर्थिक मदत केली. मंगेश संजय साबळे या तरुणाच्या वडिलांना यकृताचे … Read more

महापुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘जागतिक बँक व आशियाई डेव्हलपमेंट बँक यांच्या सहकार्याने पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजना केली जाणार आहे. त्यामुळे महापूर असलेल्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळवले जाईल आणि महापुराचा कसल्याेही प्रकारचा फटका बसणार नाही. याच वेळी वीज, रस्ते , पाणी या मूलभूत सुविधा अव्याहतपणे कार्यरत राहणारे नियोजन केले जाणार आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी … Read more

नरेंद्र मोदींच्या फडणवीसांना जन्मदिनाच्या खास शुभेच्छा

नवी दिल्ली | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी त्यांना खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्विट करून देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राच्या उत्साही आणि गतिशील मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या पाच वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासाचा उच्चांक गाठला आहे. मुख्यमंत्री … Read more