राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती! ”हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपामध्ये नाराज”

मुंबई । येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले. यातच भाजपामध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे, अशी माहिती राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. गेल्या … Read more

महाविकास आघाडी सरकारने ६ व्यांदा केली कोरोना टेस्टच्या दरात कपात; ‘हा’ आहे नवीन दर

मुंबई । राज्यात कोरोना संसर्गावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सातत्याने महत्त्वाची पावले टाकत असून आज पुन्हा एकदा कोरोना चाचण्यांच्या दरात कपात करण्यात आली आहे. कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात केली असून आता चाचणीसाठी ९८० रुपयांऐवजी ७०० रुपये हा दर निश्चित करण्यात आला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत घोषणा … Read more

येत्या ४ महिन्यात अनेक आमदार महाविकास आघाडीत येणार; अजितदादांचा गौप्यस्फोट

मुंबई । तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्यामुळे तुमचा हातातोंडाशी आलेला घास गेला. हे सरकार सहा महिन्यात जाईल, असे भविष्य आपण सांगत होतात. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित, पदवीधर मतदार यांनीही भाजपला नाकारले असे सांगून, येत्या चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

‘हे सरकार धनगर विरोधी!’; पडळकरांचे विधिमंडळाबाहेर धनगरी वेषात ढोल वाजवत आंदोलन

मुंबई । विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानात धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांनी पोलिसांना रोखत पडळकरांना आपलं आंदोलन करु दिलं. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी महाविकास … Read more

‘सध्या काँग्रेस पक्ष कमकुवत; विरोधकांनी एकत्र येतUPAला मजबूत करण्याची गरज’; राऊतांच्या विधानाने संघर्षाची ठिणगी?

Sanjay Raut

मुंबई । यूपीएच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सेर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, त्याचवेळी ‘काँग्रेस पक्ष सध्या कमकुवत झाला आहे. त्यामुळं आता विरोधकांनी एकत्र येऊन यूपीएला मजबूत करण्याची गरज आहे,’ असं परखड मत संजय राऊत यांनी मांडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाआघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास … Read more

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले! तारखा जाहीर; आता गावपातळीवर भाजप-महाविकास आघाडीची पुन्हा टक्कर

मुंबई । राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली असून नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर आता गावागावातही राजकारण तापणार आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. ( Maharashtra Gram … Read more

शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवशी ‘ही’ योजना लागू करत ठाकरे सरकार देणार ‘बर्थ-डे गिफ्ट’

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष `शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी असतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य समजले जाणारे पवार यंदा वयाची ८० वर्ष पूर्ण करत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारांना श्रेय दिलं जातं. त्यामुळंच ठाकरे त्यांच्या नावानं ग्रामीण विकासासंबंधित एक योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. … Read more

आणखी एक पक्ष महायुतीकडून महाविकास आघाडीच्या वाटेवर? जानकारांनी घेतली पवारांची भेट

मुंबई । राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला दारूण पराभव आणि महाविकास आघाडीला मिळालेलं घवघवीत यश यामुळे भाजपच्या नेतृत्वातील महायुतीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे महायुतीत अडगळीत पडलेल्या मित्र पक्षांनी नवी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय … Read more

राज्यात एकट्याची सत्ता बसविण्याची संधी ३ पक्षांनी दिलीय! देवेंद्र फडणवीसांची ‘गिरे तो भी टांग उपर’ भूमिका

वाशीम । येत्या काळात महाराष्ट्रामध्ये एकट्याला सत्तेवर बसविण्याची संधी तिन्ही पक्षांनी दिली असून, त्याचा फायदा घेणार असल्याचं मोठं विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर जागा मिळविल्या आहेत, तसेच हैदराबाद इथं झालेल्या निवडणुकीत ही प्रचंड मोठं यश मिळालं आहे, असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी … Read more

”सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर…”; काँग्रेस नाराज, महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचक इशारा

मुंबई । राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा होती. पण आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या ट्विटमुळे काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे. “आघाडीमधील नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आल्या … Read more