महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही, गडकरींची जोरदार टीका

नागपूर । ”महाविकास आघाडी सरकार बैलासारखं आहे. या सरकारला सतत टोचत राहावं लागतं. त्याशिवाय ते पुढेच नाही,” असा टोला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी लगावला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकासकामांना विलंब होत असल्याचं गडकरी म्हणाले. ‘नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची … Read more

राज्यात अनेक वर्षे सत्ता, तरी यांना मराठा आरक्षण देता आलं नाही; पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर घणाघात

परभणी । ”राज्यात अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही,” अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. विधानपरिषद पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी परभणीत आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या. (Maratha reservation) राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होत आहेत. औरंगाबाद मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या … Read more

कॉन्फिडन्स! ‘विरोधकांना दिवसातून 5 वेळा चंद्रकांत पाटील नावाची गोळी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही’

सोलापूर । ‘चंद्रकांत पाटील नावाची गोळी विरोधकांना दिवसातून ५ वेळा घेतल्याशिवाय झोपच लागत नाही असाही टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. याशिवाय शिवसेनेनं (Shivsena) धमकीची भाषा वापरू नये. मी सुद्धा चळवळीतील कार्यकर्ता आहे,’ असा इशारा पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेला दिलाय. सांगोला इथं चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा संपन्न … Read more

‘… तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही’; अजित पवारांचं महाविकास आघाडीबाबत मोठं विधान

Ajit Dada

सातारा । आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झालं की नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे महाविकास आघाडीच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. ते मजबुतीनं उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना ठणकावून … Read more

‘महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध धंद्यासाठी जिल्हे वाटून घेतलेत’; बावनकुळेंचा खळबळजनक आरोप

नागपूर । शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत असा खळबळजनक आरोप भाजपाचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ‘जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून वाळूचोरी, तस्करी या प्रकारचे धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या … Read more

‘रॉ’चा अनुभव असलेला पोलीस अधिकारी ठाकरे सरकारला कंटाळवूनचं केंद्रीय सेवेत; चंद्रकांत पाटलांचा दावा

मुंबई । राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारच्या बहिऱ्या आणि कुचकामी कारभाराला कंटाळूनच जयस्वाल यांनी केंद्रीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचा चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे. महाभकास आघाडीने सर्व धोरणांना बाजूला सारुन राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ही … Read more

राज्यपाल नियुक्त जागेवर महाविकास आघाडीनं दिली ‘या’ 12 जणांना संधी? राज्यपालांकडे यादी सुपूर्द

मुंबई । महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना सादर केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. या यादीतील काही नावं समोर आली आहेत. आज संध्याकाळी 6 च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण … Read more

राज्यपाल नियुक्त जागांसाठी महाविकास आघाडीने कसली कंबर; तिकिटासाठी ‘ही’ नाव चर्चेत

मुंबई । विधान परिषेदेत राज्यपाल नियुक्त जागांबाबत महाविकासआघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या १२ जागांबाबत प्रस्ताव आणला जाणार आहे. १२ नावांना मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन ती यादी मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिनही पक्ष प्रत्येकी चार नावं देणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल विरुद्ध महाविकासआघाडी … Read more

खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू – पृथ्वीराज चव्हाण

कराड । खडसेंसह महाविकास आघाडीतील सर्व पक्ष मिळून भाजपचे महाराष्ट्रातील वर्चस्व कमी करू, असा विश्वास कराड येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यावर रोष दाखवला. त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही. त्यांच्याबद्दल छळवाद झाला, असा त्यांनी आरोप केला. त्यांनी पक्षांतर केले आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, … Read more

महाविकासआघाडी विरोधात जावली भाजपाचे कुडाळ येथे आंदोलन

सातारा प्रतिनिधी | कुडाळ, ता.जावली येथील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ भारतीय जनता पार्टी जावली तालुका यांचे वतीने आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे यांच्या नेतृत्वाखाली जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांच्या नियोजनात आज आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने नुकतेच कृषी सुधारणा विधेयक २०२० पारित करून संपूर्ण देशातील समस्त शेतकरी … Read more