‘हे सरकार धनगर विरोधी!’; पडळकरांचे विधिमंडळाबाहेर धनगरी वेषात ढोल वाजवत आंदोलन

मुंबई । विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानात धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज खास धनगरी वेष परिधान करुन आणि ढोल वाजवत आंदोलन केलं. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांनी पोलिसांना रोखत पडळकरांना आपलं आंदोलन करु दिलं. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी महाविकास … Read more

‘सध्या काँग्रेस पक्ष कमकुवत; विरोधकांनी एकत्र येतUPAला मजबूत करण्याची गरज’; राऊतांच्या विधानाने संघर्षाची ठिणगी?

Sanjay Raut

मुंबई । यूपीएच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे सेर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, त्याचवेळी ‘काँग्रेस पक्ष सध्या कमकुवत झाला आहे. त्यामुळं आता विरोधकांनी एकत्र येऊन यूपीएला मजबूत करण्याची गरज आहे,’ असं परखड मत संजय राऊत यांनी मांडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाआघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास … Read more

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले! तारखा जाहीर; आता गावपातळीवर भाजप-महाविकास आघाडीची पुन्हा टक्कर

मुंबई । राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली असून नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर आता गावागावातही राजकारण तापणार आहे. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत. ( Maharashtra Gram … Read more

शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवशी ‘ही’ योजना लागू करत ठाकरे सरकार देणार ‘बर्थ-डे गिफ्ट’

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष `शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी असतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य समजले जाणारे पवार यंदा वयाची ८० वर्ष पूर्ण करत आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारांना श्रेय दिलं जातं. त्यामुळंच ठाकरे त्यांच्या नावानं ग्रामीण विकासासंबंधित एक योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. … Read more

आणखी एक पक्ष महायुतीकडून महाविकास आघाडीच्या वाटेवर? जानकारांनी घेतली पवारांची भेट

मुंबई । राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला दारूण पराभव आणि महाविकास आघाडीला मिळालेलं घवघवीत यश यामुळे भाजपच्या नेतृत्वातील महायुतीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे महायुतीत अडगळीत पडलेल्या मित्र पक्षांनी नवी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय … Read more

राज्यात एकट्याची सत्ता बसविण्याची संधी ३ पक्षांनी दिलीय! देवेंद्र फडणवीसांची ‘गिरे तो भी टांग उपर’ भूमिका

वाशीम । येत्या काळात महाराष्ट्रामध्ये एकट्याला सत्तेवर बसविण्याची संधी तिन्ही पक्षांनी दिली असून, त्याचा फायदा घेणार असल्याचं मोठं विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आम्ही स्वतःच्या ताकदीवर जागा मिळविल्या आहेत, तसेच हैदराबाद इथं झालेल्या निवडणुकीत ही प्रचंड मोठं यश मिळालं आहे, असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी … Read more

”सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर…”; काँग्रेस नाराज, महाविकास आघाडीच्या नेत्यांना सूचक इशारा

मुंबई । राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा होती. पण आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या ट्विटमुळे काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे. “आघाडीमधील नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आल्या … Read more

आमचं सरकार भक्कम; राज्यावर राजकीय संकट येणार नाही, आणि आलंच तर… मुख्यमंत्री ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई । राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही, असं सांगतानाच राज्यावर राजकीय संकट येणार नाही. आणि राजकीय संकट आणणार असाल तर तसं होणारही नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने ‘महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही’ या आघाडी सरकारच्या कार्यपुस्तिकेचे आज प्रकाशन … Read more

१०५चे १५० आमदार होतील; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला ‘हा’ फॉर्म्युला

Devendra Fadanvis

मुंबई । ‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही. महाआघाडीचे सरकार अंतर्गत विरोधातूनच कोसळेल. त्यावेळी भाजप एक मजबूत सरकार देईल. आमच्याकडे सध्या १०५ आमदार असले तरी त्याचे १५० आमदार कसे होतात, हे मी सांगण्याची गरज नाही. तेव्हा तशी परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे हे सरकार पडले, की १०५ आमदारांचे १५० आमदार कसे होतील, … Read more

फडणवीसांना मुख्यमंत्री करा! ३ महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा

मुंबई । “इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलंत तर तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे यांनी राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. त्यांनी ठाकरे सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप … Read more