सावधान ! जर वीज बिल भरले नसेल तर तुमचा वीज पुरवठा होऊ शकतो खंडित; महावितरणची मोहीम

mseb

औरंगाबाद – ज्या ग्राहकांनी आतापर्यंत थकलेले वीज बिल भरले नाही किंवा वारंवार सूचना करूनही त्यास पाठींबा दिला नाही, अशा वीज ग्राहकांवर महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे. महावितरणणे आता थकबाकी वसुली मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवणे सुरु केले असून आजपर्यंत मराठवाड्यातील तब्बल 16 हजार 260 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. ही कारवाई टाळण्यासाठी चालू बिलासह थकबाकीचा … Read more

जिल्ह्याला ‘गुलाबाचा’ तडाखा ! दोनच दिवसात तब्बल १४१ कोटीचे नुकसान

Heavy Rain

औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीचा जिल्ह्याला चांगलाच तडाखा बसला आहे. जिल्ह्यात तब्बल 141 कोटी 46 लाख 48 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरात अडकलेल्या साडेपाचशेहून अधिक लोकांची मदत करून सुटका करण्यात आलेली आहे तर 260 लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. सध्या पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टीमुळे पावसाने मोठ्या प्रमाणावर … Read more

सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – पालकमंत्री सुभाष देसाई

Sunil

औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यास शासन कटीबध्द असून शेतकऱ्यांच्या शासन सदैव पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात दुरदृष्य प्रणालीव्दारे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांचे नुकसान, जिवितहानी तसेच देण्यात येणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री … Read more

नुकसानीचे पंचनामे बांधावर जाऊन व्हावे; आमदार दानवेंची मुख्यमंत्रांकडे मागणी

Ambadas danave

औरंगाबाद – जिल्ह्यासह मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. अशातच अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची माहिती स्थानिक पातळीवर कार्यरत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशा यंत्रणेद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले जावेत, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी … Read more

शहर आणि परिसरात पुन्हा एकदा वीजांच्या कडकडाटासह बरसल्या सरी

Heavy Rain

औरंगाबाद – दोन दिवसांपासून औरंगाबाद शहर आणि परिसरात पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. मात्र आज 01 ऑक्टोबर रोजी दुपारपासून पुन्हा एकदा चार वाजता वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. औरंगाबद शहरासह दौलताबाद, खुलताबाद, पैठण, कन्नड भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले होते. दरम्यान पुढील तीन दिवस म्हणजे 04 … Read more

नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांचे शेतातल्या पाण्यात लोटांगण आंदोलन

andolan

औरंगाबाद – जिल्ह्यातील शेंदूरवादा (ता.गंगापूर) परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अनोतान नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना हेक्‍टरी दोन लाख रुपये तात्काळ मदत मिळावी म्हणून झोपलेल्या केंद्र व राज्य सरकारला जागे करण्यासाठी गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी खराब झालेल्या पिकांमध्ये अर्धनग्न लोटांगण आंदोलन केले. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचेही अतिवृष्टीतील पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पिकांची नुकसान भरपाई होण्यासाठी … Read more

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 845 कोटींचे नुकसान

Heavy Rain

औरंगाबाद – मराठवाड्यात गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या तुफानी पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. यापावसामुळ सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने दहा लाखापेक्षा अधिक हेक्टरवरील पीकांचे नुकसान केले आहे याशिवाय जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या नुकसानीतुन मराठवाड्याला सावरण्यासाठी सुमारे 845 कोटी 79 लाख रूपयांच्या मदतीची गरज असल्याचा प्राथमिक अहवाल तयार … Read more

आपत्तीकाळातील मदतीच्या घोषणा नुसत्या हवेतीलच; फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठवाडा येथे अतिवृष्टीचे संकट आले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांप्रमाणे भाजप नेतेही जाणार आहेत. तत्पूर्वी आज भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीची मदत, घोषणांवरून राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “यापूर्वीही राज्यात ज्या ज्या वेळी आपत्ती आली तेव्हा राज्य सरकारकडून ज्या घोषणा दिल्या … Read more

मराठवाड्यातील आठ धरणे शंभर टक्के भरली

Koyna Dam

औरंगाबाद – मराठवाड्यातील सिद्धेश्‍वर, विष्णुपुरी, निम्न दुधना, निम्न तेरणा, मांजरा, सीना कोळेगाव आणि मानार ही मोठी धरणे शंभर टक्के भरली असून जायकवाडी धरणाचीही शंभर टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. निम्न दुधना वगळता सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ‘दलघमी’ मध्ये अशी येलदरी 791.99, सिद्धेश्‍वर 80.96, मानार 138.21, विष्णुपुरी 80.79, निम्न दुधना 242.20, … Read more

मुख्यमंत्री ठाकरे शेतकरी सरणावर गेला तरी मदत करायला तयार नाही; सदाभाऊ खोतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यातील नुकसानीवरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. येथील नुकसानीवरून विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यानंतर आता रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आक्रमक झालेल्या खोतांनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. नुकसानीमुळे शेतकरी सरणावर गेला तरी त्याला मदत केली जात … Read more