मुस्लीम आरक्षणासाठी ओवेसी मैदानात; 11 डिसेंबरला ‘चलो मुंबई’ची दिली हाक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आधीच वातावरण तापलं असताना च  एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील आघाडी सरकारला धारेवर धरले. येत्या 11 डिसेंबर रोजी मुंबईत आरक्षणासाठी आणि वक्फच्या जमिनी वाचवण्यासाठी जाणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी ठाकरे सरकार वर सडकून टीका केली. मुस्लिमांच्या … Read more

महाराष्ट्र पोलिसांनी केला MIM च्या ओवेसींना 200 रुपयांचा दंड; ‘हे’ आहे कारण

सोलापुर – एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सोलापूर वाहतूक पोलिसांनी 200 रुपयांचा दंड केला. ओवेसी यांची गाडी विनानंबर प्लेट होती. यामुळे पोलिसांकडून ओवेसींना दंड ठोठावण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृहाबाहेर शहर वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विना नंबर प्लेटच्या गाडीतून प्रवास केल्यामुळे ओवेसींना वाहतूक शाखेने दंड ठोठावला. शासकीय विश्रामगृहावर गेल्यानंतर त्यांनी वाहतूक शाखेच्या दंडाची … Read more

एमआयएम मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या ‘त्या’ नगरसेवकांची अखेर हकालपट्टी

NCP

औरंगाबाद – एमआयएम मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या नव्या दोन नगरसेवकांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे नगरसेवक दाखल झाले होते. नगरसेवकांच्या गुन्हेगारी कारवाया माहित असतानाही पक्षाने त्यांना प्रवेश दिला. यामुळे पक्षाची बदनामी होऊ लागली, असा पक्ष सदस्यांचा आरोप होता.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष … Read more

मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मैदानात, मुंबईपर्यंत काढणार तिरंगा रॅली

mim

औरंगाबाद – राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएमने जोरदार तयारी सुरु केली आहे. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत खासदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबादेत मोठी घोषणा केली आहे. मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढणार आहे. तिरंगा … Read more

पाकिस्तान काश्मीरमध्ये भारतीयांच्या जीवाशी टी 20 खेळत असताना तुम्ही काय करत आहात?; ओवेसींचा मोदींना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमकडून नेहमी मोदी सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काश्मीरमध्ये बाहेरील लोकांच्या हत्या आणि चीनकडून घुसखोरीच्या घटनांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “मोदी सध्या दोन गोष्टींबद्दल तोंड उघडत नाही. एक म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची महागाई आणि दुसरी चीनची घुसखोरी. नऊ सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही टी … Read more

वरच्यांच्या परवानगीशिवाय लखीमपूरची घटना शक्य नाही; ओवेसींचा भाजपवर घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लखीमपूर हिंसाप्रकरणी एमआयएम चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपला जबाबदार धरत केंद्र सरकारवर टीका केली आहे. वरच्यांच्या परवानगीशिवाय हे कृत्य शक्य नाही असे ओवेसी यांनी म्हंटल. तसेच त्यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले आहेत ओवेसी म्हणाले, या प्रकरणाला घटना म्हणता येणार नाही. ही पूर्णपणे नियोजनासह केलेली हत्या आहे. पूर्णपणे नियोजनाद्वारे हे … Read more

“आली आता खरी वेळ आली…”; ओवेसींचा मोदी सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील तीन कृषी कायदे तयार केले आहेत. या कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून आता आंदोलने केली जात आहेत. या शेतकरी आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे काल हिंसाचाराची घटना घडली. यावरून एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर … Read more

शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय, ओला दुष्काळ जाहीर करा; खासदार जलीलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अगोदरच कोरोना व लॉकडाऊनमुळे सराज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. आता औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने अक्षरश: हाहाकार माजवत काढणीला आलेली पीकं उध्वस्त केली. यात शेतकऱ्याचे हजारो-लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याना तातडीने मदत द्यावी तसेच औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जलील … Read more

‘मुस्लिमांची अवस्था लग्नातल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी’ – असदुद्दीन ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात असलेल्या पक्षातील काही पक्षांची अवस्था हि बिकट बनली आहे. अशात पक्षांतील श्रेष्टींकडून पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे. देशातील महत्वाचा पक्ष असलेल्या एमआयएम पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. देशात सध्या मुस्लिमांची अवस्था हि लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी झाली आहे. उत्तर प्रदेशात प्रत्येक जातीकडे … Read more

भाजपच्या यशस्वी वाटचालीमागील सूत्रधार ओवेसीच; सामनातून घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली सुरुवात केली असून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून एमआयएम आणि भाजपवर घणाघात केला. ‘फोडा-झोडा व जिंका’ या मथळ्याखाली सामनातील अग्रलेखामधून ओवेसी यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित करण्यात आलीय. भाजपच्या यशस्वी वाटचालीमागील सूत्रधार ओवेसीच अशी टीका शिवसेनेने केली. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत काय काय पाहावे लागेल, … Read more