एक हजाराहून अधिक हिंदूंचे धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली UP ATS कडून दोन मौलवींना अटक

लखनऊ । लखनऊमध्ये धर्मांतर करुन घेणार्‍या दोन मौलवींना यूपी एटीएस (UP ATS) ने अटक केली आहे. या दोघांवर आतापर्यंत एक हजाराहून अधिक गरीब हिंदूंचे धर्मांतर (Conversion) केल्याचा आरोप आहे. या संदर्भात, यूपीचे एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार (Prashant Kumar) म्हणाले की,”एक मोठी टोळी धर्मांतर करून घेत होती. ते पैसा आणि इतर आमिषे दाखवून धर्मांतर … Read more

मलेशियामध्ये आता बिगर मुस्लिमही बोलू आणि लिहू शकतील ‘अल्लाह’, कोर्टाने दिला ऐतिहासिक निकाल

Theft by wearing a Burkha

क्वालालंपूर । मलेशियातील कोर्टाने बुधवारी असा निर्णय दिला की, गैर-मुस्लिमसुद्धा देवाला संबोधित करण्यासाठी ‘अल्लाह’ हा शब्द वापरू शकतात. मुस्लिम बहुसंख्य देशातील धार्मिक स्वातंत्र्याच्या विभाजनात्मक प्रश्नावरील हा महत्त्वाचा निर्णय आहे. यासंदर्भात सरकारच्या बंदीला आव्हान देणारे या समुदायाचे वकील ए जेव्हियर म्हणाले की,”ख्रिश्चन प्रकाशनांनी ‘अल्लाह’ आणि अरबी भाषेच्या अन्य तीन शब्दांच्या वापरावरील-35 वर्षांपासूनची बंदी हायकोर्टाने रद्द केली … Read more

तिसऱ्यांदा लग्न करण्यासाठी गेला युवक, मारून मारून बायकोने केलं जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराची मधील एका युवकाने पहिले दोन लग्न केले आणि पुन्हा तिसऱ्या लग्नाची तयारी करताना लग्नमंडपात त्याच्या पहिल्या बायकोने त्याला लग्नाच्या वऱ्हाडी मंडळाच्या समोरच तिने त्याला खूप मारले कि तो तिसऱ्या लग्नासाठी उभा पण राहू शकत नाही. त्या पहिल्या बायकोच्या विरोधात जाऊन त्याने पोलीस स्टेशन मध्ये तिची तक्रार दाखल केली. जबरदस्तीने घुसून … Read more

इस्लामविरोधी असल्याचा आरोप करत इम्रान सरकारने घातली PUBG वर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने लोकप्रिय मोबाइल गेम PUBG वर बंदी घातली आहे. हा खेळ इस्लामविरोधी असल्याचा आरोपही सरकारने केला आहे. सरकारने या गेमचे आरोग्यास हानिकारक असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की, हे एक अत्यन्त वाईट असे व्यसन आहे. सरकारने याबाबत म्हटले आहे की, या गेमच्या व्यसनामुळे तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर … Read more

जगासोबत संघर्ष करताना आपल्याच देशातील मुस्लिम लोकसंख्येवर अत्याचार करतो आहे चीन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीन सध्या विविध कारणांनी सर्व जगभर चर्चेत आहे. कोरोना विषाणूचे उगमस्थान असणारा देश, भारत चीन सीमेवरील तणाव, जगावर राज्य करू पाहणारा चीन अशा विविध नावांनी सध्या चीन जगभर गाजतो आहे. अमेरिका, ब्रिटन सारख्या बडया राष्ट्रांबरोबर चीन संघर्ष करतोच आहे. पण आपल्याच देशातील मुस्लिमांवर देखील अत्याचार करतो आहे. उइगर मुस्लिम आणि अन्य … Read more

काँग्रेस कार्यकर्त्याचे सोनिया गांधींना पत्र; जाकिर पठाण यांची विधानपरिषदेची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुस्लिम समाजाकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर संधी मिळावी. म्हणून माझ्या नावाची शिफारस कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. राज्यपाल निवडीसाठी जे नियम आहेत, त्या सहकार क्षेत्रात मी गेली 10 वर्ष काम करत आहे. त्यामुळे माझ्या नावाचा विचार व्हावा अशी मागणी सातारा जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष जाकिर पठाण यांनी केली आहे. जाकिर पठाण … Read more

कौतुकास्पद! हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार करत मुस्लिम बांधवानी जपली सामाजिक बांधिलकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्व धर्म, जाती, वंश, वेशभूषा, प्रदेश असा कोणताच भेद इथे केला जात नाही अशी महती सर्वत्र भारताची सांगितली जाते. अलीकडे काही घटनांमुळे भारताच्या महतीला गालबोट लागले असले तरी आजही अशा अनेक घटना पाहावयास मिळतात ज्यामुळे देशातील बंधुभावाचे दर्शन घडते. सोलापूर शहरात अशाच एका घटनेचा प्रत्यय … Read more

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खडखडीत सवाल; म्हणाले…

मुंबई । राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मुंबईत निदान होते आहे. तसेच अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. या रुग्णांच्या मुतदेहांना पीएफआय या संघटनेला देण्याचा निर्णय १८ मे रोजी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशविरोधी कृत्य करणाऱ्या पीएफआय ला काम देणे कितपत योग्य? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना विचारला आहे. १८ मे रोजी काढण्यात … Read more

कौतुकास्पद! मस्जिदीची जागा दिली कोरोना संशयित रुग्णांच्या अलगाव साठी

पुणे | दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढते आहे. पुणे, मुंबई या शहरांमध्ये अधिकाधिक रुग्ण सापडत आहेत. प्रशासन आपल्यापरीने संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या धर्तीवर भारतभर असंतोष वाढला होता. एक विशिष्ट जमात जाणीवपूर्वक हा आजार पसरवण्यासाठी कार्यरत असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. पण पुणे शहरात या सगळ्याच्या विरुद्ध … Read more

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुस्लिमांचे मृतदेह श्रीलंकेत जाळले जातायत, मुस्लिम धार्मिक नेते म्हणाले हे तर इस्लामविरूद्ध..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । श्रीलंकेतील मुस्लिम धार्मिक नेत्यांनी कोरोना व्हायरसमुळे प्राण गमावलेल्या मुस्लिमांच्या अंत्यसंस्काराबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.या मुस्लिम धर्मगुरूंचे असे म्हणणे आहे की सुधारित नियम हा इस्लामिक परंपरेच्या विरोधात असून आम्ही सरकारच्या या निर्णयाशी सहमत नाही आहोत. विशेष म्हणजे, श्रीलंकेने देशातील मुस्लिमांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून अंत्यसंस्कारावेळी कोरोनामुळे मृत पावलेल्यांना जाळणे हे सक्तीचे … Read more