.. तेव्हा गडकरींना आली होती काँग्रेसची ऑफर; स्वतःच केला गौप्यस्फोट

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नितीन गडकरी देशभरातील राजकीय विषयांवर बेधडकपणे आपलं मत मांडताना आपण अनेकदा पाहिलं असेल. आता तर त्यांनी एकेकाळी आपल्याला काँग्रेस प्रवेशाची ऑफर आली होती असं म्हणत त्यासंदर्भातील एक किस्साही सांगितला आहे. नागपूर येथील एका आयोजित … Read more

संभाजी ब्रिगेडसोबत युती म्हणजे उद्धव ठाकरेंचा फुसका बार; बावनकुळेंची टीका

Bawankule Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी युती केल्यनानंतर भाजपने सडकून टीका केली आहे. संभाजी ब्रिगेड सोबत युती म्हणजे उद्धव ठाकरेंचा फुसका बार आहे, भाजपला याचा काहीही परिणाम होणार नाही अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना- संभाजी ब्रिगेड युतीवरून निशाणा साधला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संभाजी ब्रिगेडने मागील निवडणुकीत विधानसभेच्या 40 जागांवर … Read more

अपघात मुक्त भारत हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल : नितीन गडकरी

Nitin Gadkari Vinayak Mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. “विनायक मेटे हे माझ्या जवळचे मित्र होते. त्यांचे अपघाती निधन झाले हे महाराष्ट्राचे नुकसान आहे. रस्त्यावर अपघात होतात. त्यात लोक मृत्युमुखी पडतात. पण सर्वानी … Read more

फडणवीस दिल्लीला गेले तर .. ; नितीन गडकरींचे मोठं विधान

gadkari fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर काय होते हे मला माहित आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असे मी म्हणणार नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे, असे म्हणत त्यांनी बावनकुळे यांची राजकीय दिशा स्पष्ट केली. … Read more

बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात; नितीन गडकरी यांचे विधान

Nitin Gadkari Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपुरात आज भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री गडकरींनी बावनकुळे यांच्या कौशल्याची स्तुती केली. “एखाद्याकडून आपला काम कसे करवून घ्यायचे यामध्ये आमदार चंद्रशेखर बावनकुळे एक्स्पर्ट आहेत. कोणाचं पत्र, कोणाची फाईल आणि निधी कोणत्या गावात … Read more

कायदा तोडण्याचा आम्हाला अधिकार, कारण आम्ही मंत्री आहोत; नागपुरात नितीन गडकरींचे विधान

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच काहीना काही कारणांनी चर्चेत असतात. सध्या ते त्यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी काल नागपुरात मंत्रिपदाबाबत व कायद्याबाबत एक विधान केले आहे. “गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा एकदा नाही, तर दहावेळा तोडावा लागला तरी तोडला पाहिजे, असं महात्मा गांधींनी सांगितलं आहे. … Read more

नागपुरात स्कूल व्हॅनचा अपघात; 18 विद्यार्थी थोडक्यात बचावले

Nagpur School Van Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर जिल्ह्यातील बेसा घोगली रोडवर आज सकाळच्या सुमारास स्कूल व्हॅन नाल्यात पडल्याची घटना घडली. या अपघातावेळी व्हॅनमध्ये 18 शाळकरी विद्यार्थी होते. यामध्ये तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी पोद्दार स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल व्हॅन निघाली होती. व्हॅन नाल्याजवळ आली असता त्यातील चालकाचे नियंत्रण सुटले … Read more

भूतबाधा घालवण्यासाठी 6 वर्षीय मुलीला जीव जाईपर्यंत मारहाण; आई वडिलांचे निर्दयी कृत्य

crime

नागपूर । डोक्यात अंधश्रद्धेच भूत असेल तर माणूस काहीही करतो. असाच एक किळसवाणा प्रकार नागपूर येथे घडला आहे. एका सहा वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेने तिच्या आईवडिलांनी तिला भुतबाधेतून मुक्त करण्यासाठी इतकी जबर मारहाण केली या मारहाणीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भात प्रतापनगर पोलिस स्ठानकात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली … Read more

वॉकी-टॉकीवर बोलताना ग्राऊंड स्टाफला विजेचा धक्का; नागपूर विमानतळावरील घटना

electrocuted

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये इंडिगो फ्लाइट 6C7197 लखनौ-अहमदाबाद विमान नागपूर विमानतळावर उभे असताना, वॉकी-टॉकीवर बोलत असताना विजेचा धक्का (electrocuted) लागून विमानतळावरील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. काय घडले नेमके ? इंडिगो फ्लाइट 6C7197 लखनौ-अहमदाबाद विमानात नागपूर विमानतळावर उभे होते. यादरम्यान, वॉकी-टॉकीवर बोलत असताना विजेचा धक्का (electrocuted) … Read more

निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी गडकरींनी कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले की…

Nitin Gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या कार्यकारिणीची नागपुरात बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री गडकरी यांनी भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांना निवडणुकीत विजय मिळवण्याच्या व उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टीने एक सल्ला दिला आहे. “आगामी नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये चेहरा पाहून उमेदवारी मिळणार नाही. कुणाचीही-कुठलीही लॉबिंग चालणार नाही. निवडून येण्याची … Read more