लोकांचा शिवसेनेवर आता विश्वास राहिलेला नाही ; निकालावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवला. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांचा भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी दारुण प्रभाव केला. यावरून केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. राज्यात धोका देऊन सरकार बनवल्याने सेनेला पराभव पत्करावा लागला आहे. लोकांचा आता शिवसेनेवर … Read more

निवडणुकीत पडले फक्त एकच मत; पराभवानंतर छोटू भोयर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे गेल्या काही दिवसापासून अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. आज या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला. तर भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या छोटू भोयर यांना केवळ एकच मत पडले. या निकालावर भोयर यांनी प्रतिक्रिया दिली असून आज बावनकुळेंनी चाळीस कोटी … Read more

ज्यांचे मंत्रीच त्यांचं ऐकत नाही ते कसले प्रदेशाध्यक्ष; बावनकुळेंची पटोलेंवर घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आहे. या निवडणूकीत नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. दरम्यान या विजयानंतर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. या निवडणुकीत जो प्रभाव झाला आहे तो नाना पटोलेंचा झाला आहे, ज्याचे मंत्रीच … Read more

नागपूरमधून चंद्रशेखर बावनकुळे विजयी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आहे. निवडणूक आयोगाने सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.दरम्यान या निवडणुकीत अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली यामध्ये भाजपच्या उमदेवाराचा विजय झाला. तर नागपूरमध्ये भाजपकडून … Read more

 ‘त्या’ तीन मजली उड्डाणपुलाचा डीपीआर तयार

nitin gadkari

औरंगाबाद – वाळूज ते चिकलठाणा असा २० किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे सूतोवाच केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लातूर येथील कार्यक्रमात केले. अंदाजे दोन हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या या प्रकल्पाच्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यासाठी केंद्रीय दळणवळण खात्याकडे नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या स्थानिक प्रकल्प कार्यालयाकडून ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्यावर … Read more

अनिल देशमुखला तुम्ही आत टाकलं त्या प्रत्येक दिवसाची, त्या दिवसातल्या प्रत्येक तासाची किंमत वसूल झाल्याशिवाय राहणार नाही

नागपूर । अनिल देशमुखला तुम्ही आत टाकलं त्या प्रत्येक दिवसाची, त्या दिवसातल्या प्रत्येक तासाची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला इशारा दिला आहे. पवार हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला संबोधित करताना पवार यांनी सत्ताधारी … Read more

नागपुरात जिल्हा परिषद गटावर महाविकास आघाडीची सरशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर, वाशिम, धुळे, अकोला, नंदुरबार आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांतील 84 जागा आणि त्या अंतर्गत 38 पंचायत समित्यांतील 141 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणात मतदान झाले. त्यानंतर आता मतमोजणी केली जात आहे. येथील नागपूर जिल्हा परिषदेतील 16 व पंचायत समितीच्या 31 जागांसाठी पोटनिवडणूतिचे निकाल हाती येत असून या ठिकाणी पंचायत समिती … Read more

मुंबईत आली आहे कोरोनाची तिसरी लाट, महापौर किशोरी पेडणेकर यांचा इशारा

मुंबई । मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी लोकांना इशारा दिला आहे की,”कोरोनाची तिसरी लाट आली आहे.”त्या माध्यमांशी झालेल्या संभाषणात म्हणाल्या,”आता गणपती बाप्पा येणार आहेत, म्हणून मी जाहीर केले की ‘माझे घर माझा बाप्पा.’ ‘मी माझा बाप्पा सोडून कुठेही जाणार नाही. याशिवाय ‘माझे मंडळ, माझा बाप्पा’ चा जयघोष आहे. मंडळामधील दहा कामगार त्याची काळजी … Read more

धक्कादायक ! मेव्हणीचे अपहरण करून मित्रांसह केला बलात्कार

Rape

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या मेव्हणीला दारू पाजून तिच्यावर मित्रांसह सामूहिक बलात्कार केला. इतकच नाही तर तिचं अपहरण करून 3 लाखांची रक्कम मागितली. जेव्हा मेव्हणीने पैसे देण्यास नकार दिला, तर तिला सिगारेटचे चटके दिले. हि घटना नागपूर शहरातील … Read more

बापाची युक्ती अन् लेकाची मुक्ती; हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्या मुलाला वडिलांनी अशा प्रकारे काढले बाहेर

Honey Trap

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – मागील काही काळापासून नागपूरसह देशात हॅनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग, सेक्सटॉर्शनच्या अनेक घटना घडत आहेत. हे गुन्हेगार सोशल मीडियावरील भोळ्या लोकांना अलगद आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळतात. बदनामीच्या भीतीनं अनेकजण ते द्यायलादेखील तयार होतात. नागपूरात देखील हनीट्रॅपची नुकतीच एक घटना समोर आली आहे. पण या घटनेत हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या लेकाची वडिलांनी युक्तीनं … Read more