शेतकऱ्यानं फिरवला कांद्यावर ट्रॅक्टर; रोहित पवारांनी भेट घेत केली Facebook Post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घाम गाळून पिकवलेल्या पिकाला योग्य किंमत मिळाली नाही तर जगणं कठीण होऊन जात. अशीच अवस्था सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. त्यांच्या काढायला भाव मिळत नसल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. निर्यातबंदीमुळं शेतकऱ्यांना मातीमोल भावात कांदा विकावा लागत आहे. त्यामुळे नाशिकमधील नैताळे (ता. निफाड) येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांद्यात … Read more

कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले पाऊल

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याने आता केंद्र सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. कांद्याच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अशा राज्यांना बफर स्टॉक देण्यास सुरुवात केली आहे, जिथे कांद्याचे भाव वाढत आहेत. बाजारात बफर स्टॉकची झपाट्याने आवक झाल्यामुळे कांद्याचे भाव स्थिर होताना दिसत आहेत. अनेक वेळा कांद्याचे भाव वाढणे सरकारसाठी अडचणीचे ठरते. … Read more

लोणंदला कांद्याच्या भावावरून व्यापारी- शेतकऱ्यांच्यात हमरीतुमरी, काही काळ लिलाव बंद

Loanand Maraket Kanda

लोणंद | कांद्याच्या भावावरून लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिलावा दरम्यान शेतकरी आणि व्यापारी यांच्यात हमरीतुमरी झाली. त्यामुळे कांद्याचे लिलाव दीड ते दोन तास बंद पडले होते. बाजार समितीचे उपसभापती दत्तात्रय बिचुकले, सचिव विठ्ठल सपकाळ आणि लोणंद पोलिसांनी मध्यस्थी करत व्यापारी व शेतकरी यांचा समेट घडवून आणल्याने कांद्याचे लिलाव पुर्ववत सुरू झाले. लोणंद कृषी … Read more

दीड एकरवरील कांद्याचे पीक चोरट्यानी केले लंपास

औरंगाबाद | पावसाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकरी संकटात सापडलेला आहे. कसेबसे पिकांना वाढविले, मात्र तोंडी आलेले पीक आता चोरटे लंपास करीत असल्याने निसर्ग पिकू देईनात आणि चोरटे विकू देईनात, अशी अवस्था शेतक-यांची झाली आहे. अशीच घटना गंगापूर तालुक्यात घडली आली आहे. दीड ते दोन लाख रुपये किंमत असलेल्या शेतातील दीड एकरवरील कांद्याचे उभे पीक रातोरात चोरट्यानी … Read more

कांदा पुन्हा होऊ लागला महाग, किंमत 50 रुपयांपर्यंत पोहोचली, नवीन दर जाणून घ्या

नवी दिल्ली । कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Govt) घेतला आहे. ही बंदी 1 जानेवारी 2021 पासून काढली जाईल. या वृत्तानंतर कांद्याच्या दरात (Onion price increase) वाढ झाली आहे. नाशिकच्या लासलगाव घाऊक बाजारात (lasalgaon mandi) कांद्याचे दर अवघ्या दोन दिवसांत 28 टक्क्यांनी वाढून 2500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. त्याचबरोबर कांद्याचे दर मंगळवारी … Read more

खरीप हंगामात झाली धान्याची विक्रमी खरेदी, सरकारने घातली कांद्याच्या बियाण्यांच्या निर्यातीवर बंदी

नवी दिल्ली । अन्नमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारतीय खाद्य महामंडळाने खरीप हंगामात किमान आधारभूत किंमतीवर (MSP) 742 लाख मेट्रिक टन धान्य खरेदी केले आहे. मागील हंगामापेक्षा ते 18 टक्के जास्त आहे. त्यांनी सांगितले की सन 2019-20 या आर्थिक वर्षात सरकारने 627 लाख मेट्रिक टन धान्य खरेदी केले होते. त्याचबरोबर अन्नमंत्री पीयूष गोयल यांच्या मते … Read more

शेतकऱ्यांची कांदा बियाणांसाठी लगभग

onion seed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली असून शेतकऱ्यांची बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी ओढाताण सुरु आहे. सध्या कांदा बियाणे मिळत नसल्याने शेतकरी सर्वत्र शोधाशोध करीत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाकडे उपलब्ध असलेले तीन-चार क्विंटल बियाणे केंव्हाचेच विकून झाले आहे. बाजारपेठेत कांद्याला मिळत असलेले दर तसेच आगामी काळातील भावाचा कल लक्षात घेत … Read more

कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांदाचाळ उभारणीसाठी सरकारने मंजूर केले ६० कोटी अनुदान

Kanda Chal Anudan Yojana 2020

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. कांदा चाळ उभारणीसाठी राज्यसरकारने ६० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २७ व्या राज्यस्तरीय प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण रू. १५० कोटींचा कार्यक्रम राबविण्यात येणार असून राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत अर्थसहाय्याच्या स्वरुपात ६० कोटी रुपयांचा … Read more

कांदा आता रडवणार नाही, Tata Steel ने काढला नवीन तोडगा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आता कांद्याची कमतरता भासणार नाही. देशातील नामांकित स्टील कंपनी असलेली टाटा स्टील कांद्याच्या साठवणुकीसाठी एक नवी पद्धत घेऊन आली आहे. टाटा स्टीलच्या कंस्ट्रक्शन सोल्यूशन्स ब्रँड नेस्ट-इनने कांद्याच्या साठवणुकीसाठी अ‍ॅग्रोनेस्ट बाजारात आणला आहे ज्याचा हेतू सध्याच्या पातळीपेक्षा कांद्याचा अपव्यय निम्म्याने कमी करणे हा आहे. नेस्ट-इन आणि इनोव्हेंट टीम्सने हे अ‍ॅग्रोनेस्ट विकसित … Read more

शेतकऱ्यांनी केले कांद्याला क्वारंटाईन, अपेक्षित भाव मिळत नसल्यानं निर्णय

सोलापूर प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच शेतमालाला चांगला उठाव होऊन त्याला चांगला दरही मिळेल, या भाबड्या आशेने शेतकऱ्यांनी सध्या रब्बी हंगामातील कांदा आपल्या शेतातच क्वारंटाईन करून ठेवने पसंद केले आहे . सध्या सगळीकडे रब्बी उन्हाळी कांद्याची काढणी सुरू आहे . सोलापूर जिल्ह्यातील रोपळे येथील शेतकरीही कांदा काढणीत व्यस्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रोपळे येथील सेवानिवृत्त … Read more