अमेरिकन सैन्याने सोडलेली शस्त्रे पाकिस्तानला पाठवतो आहे तालिबान

काबूल । अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून पाकिस्तानला शस्त्रे पुरवल्याचा आरोप केला जात आहे. ज्या शस्त्रास्त्रांची तस्करी केली जात आहे, ती भारताविरुद्ध सीमापार चकमकींमध्ये वापरली जाऊ शकतात. मात्र, तालिबानने सातत्याने ते चांगले तालिबान असल्याचा आग्रह धरला आहे. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर अमेरिकेची बरीच शस्त्रे तिथेच शिल्लक होती. यातील बहुतांश शस्त्रे डिसेबल करण्यात आली आहेत. मात्र काही … Read more

इम्रान खान आऊट!! पंतप्रधान पदावरुन हकालपट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अखेर गुडघे टेकायला लागले. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ सरकारने नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्ताव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही त्यांना सत्तेतून बाहेर पडावे लागले. अविश्वास प्रस्ताव ठरावात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत पाकिस्तानमधील … Read more

पाकिस्तानात मशिदीत मोठा स्फोट; 30 जणांचा मृत्यू तर 50 जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानातील एका मशिदीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच 50 जण जखमी झाले आहेत. जिओ न्यूज, नुसार पेशावरच्या मशिदीत नमाजाच्या वेळी हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कोचा रिसालदार भागातील किस्सा ख्वानी बाजारातील मशिदीमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच बचाव पथक तेथे … Read more

हिजाब प्रकरणावरून ओवेसींनी पाकिस्तानला सुनावले; म्हणाले की तुम्ही…..

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात हिजाब मुद्द्यावरून वातावरण तापलं असून पाकिस्तानने याच पार्श्वभूमीवर भारतावर टीका केली होती. मुस्लिम मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे मूलभूत मानवी हक्कांचे घोर उल्लंघन आहे. असे म्हणत पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांनी भारतावर टीका केल्यानंतर आता एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तान ला खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानने आम्हाला शिक्षणाबद्दल शिकवू नये असं … Read more

भारताला छेडण्याचा प्रयत्न केल्यास सोडणार नाही; राजनाथ सिंह यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतावर विरोधकांकडून हल्ल्याचे अनेकवेळा प्रयत्न केले गेले. अनेकवेळा लष्करावर गोळीबार झाला. याबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. “भारताने आजवर आक्रमण केलेले नाही किंवा कब्जा केलेला नाही. भारताला जो छेडेल त्याला भारत सोडणार नाही. आम्ही इकडंच नाही तर तिकडं जाऊनही मारु शकतो, अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री … Read more

50 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कारवाई सुरू करत पुढील 13 दिवसांत भारतीय सैन्याने केले होते पाकिस्तानचे दोन तुकडे

भारत-पाकिस्तान युद्ध 1971 | पूर्व पाकिस्तानातील परिस्थिती अत्यंत खराब होत चालली होती. दररोज हजारो निर्वासित लोकं सीमा ओलांडून भारतात येत होते. ज्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढू लागला. 03 डिसेंबरच्या संध्याकाळी जेव्हा पाकिस्तानने भारताच्या हवाई पट्टीवर विमानांनी हल्ला केला, तेव्हा भारताने त्यांच्याविरोधात युद्ध घोषित केले. त्यानंतर पुढील 13 दिवसात भारताने ही लढाई नुसती जिंकलीच नाही … Read more

ICC ने भारताकडे दिली 3 मोठ्या स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी, पाकिस्तानमध्ये होणार चॅम्पियन्स ट्रॉफी

दुबई । ICC ने 2024 ते 2031 दरम्यान होणाऱ्या 8 मोठ्या स्पर्धांच्या यजमानांची घोषणा केली आहे. भारताकडे 3 मोठ्या स्पर्धांची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतात 2026 टी-20 विश्वचषक, 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. 2023 चा एकदिवसीय विश्वचषकही भारतात होणार असल्याची माहिती आहे. दीर्घ काळानंतर पाकिस्तानला ICC स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. तिथे … Read more

इम्रान खानला लवकरच बाहेरचा रस्ता दाखवणार लष्कर, नवाझ शरीफचे करणार स्वागत

इस्लामाबाद । पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानच्या अडचणी वाढतच आहेत. कारण पाकिस्तानच्या लष्कराने माजी पंतप्रधान नवाझ शरीफला देशात परतण्याचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानला तुमची गरज असल्याचे नवाझ शरीफला सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे हे घडले. याअंतर्गत आता नवाझ शरीफला बोलावून इम्रान खानला बाहेरचा रस्ता दाखविण्याची … Read more

आता पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर असणार बारीक नजर, भारत अमेरिकेकडून खरेदी करणार 30 ड्रोन

नवी दिल्ली । पाकिस्तान आणि चीनवर बारीक नजर ठेवण्यासाठी भारत आता अमेरिकेकडून 30 प्रीडेटर ड्रोन खरेदी करणार आहे. हे ड्रोन अमेरिकेकडून मिळण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. 21 हजार कोटी रुपयांच्या या ड्रोनसाठी आज संरक्षण मंत्रालयात बैठक होणार असल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत संरक्षण करार मंजूर झाल्यास तो संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण … Read more

Exclusive: पाकिस्तानातील सरकार आणि लष्करातील वाद शिगेला, इम्रान खानची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी निश्चित ?

नवी दिल्ली । पाकिस्तानमध्ये ISI या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाच्या नियुक्तीवरून सरकार आणि लष्कर यांच्यातील वाद आणखी तीव्र झाला आहे. आता पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याला पदावरून हटवण्याच्या तयारीत लष्कर असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. 20 नोव्हेंबर रोजी लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम ISI चा डीजी म्हणून पदभार स्वीकारणार आहे. यावरूनक इम्रान खान आणि लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा … Read more