लॉकडाऊननंतर उद्योगांना संघर्षासोबत नवीन संधीही उपलब्ध
कोसळलेल्या अर्थव्यवस्थेच्या बांधणीसाठी सरकारने आधीच अनेक उपाय जाहीर केले आहेत. त्या उपायांना मजबूत करणे आणि दिलेली रक्कम उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी वापरणे गरजेचं आहे. या मदतीनंतर आता मोठया प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्थेला विविध प्रकारच्या वेळेत तीन टप्प्यांमध्ये मदत लागेल. कमी काळ, मध्यम काळ आणि दीर्घ काळ.