कोरोना इम्पॅक्ट | आशा सेविकांना टाळ्या आणि इन्शुरन्सपेक्षा ‘योग्य’ पगाराची ‘जास्त’ गरज आहे.

आशा सेविकांनी सरकारचं काम हलकं केलं असलं तरी सरकार मात्र आशा सेविकांच्या समस्या सोडविण्यात पुन्हा एकदा चुकलं आहे. कोरोना विषाणूने पुन्हा एकदा आपलं लक्ष आशा कर्मचाऱ्यांच्या विभागाकडे आणि असमानतेकडे वेधले आहे.

कोरोनाने भारताचा ‘खरा विकास’ उघडा पाडलाय – तवलीन सिंग

आपल्याला लवकरात लवकर अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याची गरज आहे, पण भारत सरकार कोणतेच नियम बनवून स्वतः काहीच करत नसल्याचे निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे. जेव्हापासून अचानक हा साथीचा रोग अति संवेदनशील झाला आहे, तेव्हापासून गृह मंत्रालय अत्यंत कनवाळुरीत्या शांत झाले आहे.

तब्लिगी जमातीतील २०० कोरोनामुक्तांचा प्लाझ्मा उपचारासाठी पुढाकार

१०८० तब्लिगिंपैकी ८७० पेशंट कोरोनामुक्त झाले आहेत. यातील २०० पेशंटनी बाकी कोरोनाग्रस्तांसाठी आवश्यक असणाऱ्या अँटीबॉडीज देण्याचा निर्धार केल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजलं आहे.

कोरोना संकटात शेतकऱ्यांचं योगदान लाखमोलाचं..!! बळीराजानं आपल्याला उपाशी मरण्यापासून वाचवलंय..!!

प्रतिकूल परिस्थिती असूनही संकटकाळात शेतकरी उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. शेतकऱ्यांना आता सरकारची गरज आहे.

प्रत्येकाला कोरोना होऊ द्या, आणि मग कोरोनावरच अटॅक करुया..!! काय आहे ‘हर्ड इम्युनिटी’चा हटके पर्याय..??

“वयस्कर लोकांना आणि आजारी असलेल्या लोकसंख्येला संसर्ग न होता आपण समूह रोगप्रतिकारशक्तीपर्यंत पोहोचू शकतो. जेव्हा समूह रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि ती पुरेशा लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा रोगाचा उद्रेकही थांबतो. वृद्ध लोकसंख्या वाचवण्यासाठी हा प्रयोग जास्त उपयोगी ठरु शकतो.”

संचारबंदीतून भारत कसा पुढे येईल?

संचारबंदी उठण्यासाठी १२ दिवसांपेक्षा कमी काळ उरला आहे, अशावेळी समूह क्रिया कमी करणे आणि आर्थिक क्रिया पुन्हा सुरु करणे या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी करणे आवश्यक आहेत.

केरळने कोरोनाला झोडपून काढलंय, आपण त्यांच्याकडून काय शिकणार..??

मजबूत आरोग्य सुविधा आणि कोरोना विषाणूविरुद्धची प्रभावी रणनीती यामुळे केरळने कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाजी मारली आहे. मृत्यूंची संख्या मर्यादित ठेवण्यात केरळने मिळवलेलं यश इतर राज्यांसाठीही मार्गदर्शक आहे.

संकुचित झालेल्या लोकशाहीत, एकमेकांतील अंतर वाढवण्यासोबतच गरिबांना झिडकारणं हेच नव्या भारताचं चित्र असेल?

संचारबंदीनंतर देश लोकशाही संकुचित होणे, एकमेकांतील अंतर वाढणे, गरिबांपासूनची अलिप्तता कायम ठेवणे – कदाचित ही नवीन सामान्य स्थिती असू शकते. – सुहास पळशीकर 

घाबरु नका, जनतेसाठी सरकारी तिजोरी नेहमीच उपलब्ध – नितीन गडकरींचा देशवासीयांना दिलासा

देशातील लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसलेला असताना ती भरुन काढण्यासाठीच्या सर्व उपाययोजना हळूहळू अंमलात आणणं सुरु असून महिना अखेरपर्यंत आपण कोरोनाला हरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

गरवारे बेस्ट्रेचची स्थानिक यंत्रणांप्रती दृढ कृतज्ञता

जगभरात पसरलेल्या कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, कंपनीचे जगभरातील कर्मचारी वैद्यकीय व्यावसायिकांना आवश्यक ती उत्पादने पुरवण्याचे काम करण्यासाठी अपार कष्ट घेत आहेत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे जगभरात लोकांचे प्रमाण वाचवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, असे गरवारे बेस्ट्रेचने जाहीर केले आहे.