फसवणूक : ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसवेकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

Phaltan Police

फलटण | बनावट व खोटे संमतीपत्र तयार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे, बरड तालुका फलटण गावच्या हद्दीतील दुकान गाळ्यांची बेकायदेशीर नोंद केल्याप्रकरणी बरड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह एकूण 15 जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि 15 जानेवारी 2018 रोजी … Read more

खासगी सावकारास अटक : शेतकऱ्यास 50 हजाराच्या बदली 16 लाखाची मागणी

Phaltan Police

फलटण | निंबळक येथील एका शेतकऱ्याला व्याजाने दिलेल्या पन्नास हजार रुपयांचे 3 लाख 50 हजार घेऊनही 16 लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्यास तारण जमिनीची विक्री करण्याची धमकी देत शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या एका खासगी सावकाराच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक केलेली असून न्यायालयात हजर केले … Read more

साताऱ्यात पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके फलटण येथील पत्रकार सुमित चोरमले यास साताऱ्यात येऊन एक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. या प्रकरणी सातारा जिल्हा पत्रकार संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच संबंधित गुंडावर पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन सातारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक … Read more

स्टोव्हचा पंप सापडत नसल्याने वडिलांचा खून; न्यायालयाने मुलाला ठोठावली ‘ही’ शिक्षा

सातारा | फलटण तालुक्यातील साठेफाटा येथे वडिलांचा खून करणाऱ्या मुलास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. स्टोव्हचा पंप सापडत नसल्याने मुलाने वडिलास फरशीच्या तुकड्याने 30 मे 2018 रोजी हल्ला केला होता. या प्रकरणात न्यायालयाने मुलगा शामसुंदर नारायण इंगळे (वय ४६, रा.साठेफाटा) याला शिक्षा सुनावली आहे. तर नारायण भिकू इंगळे (वय- … Read more

पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे वृद्धापकाळाने निधन

फलटण | येथील निंबकर अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक, प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री बनबिहारी निंबकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या माध्यमातून शेतीतील प्रगत संशोधनासाठी ते अविरत कार्यरत होते. त्यांच्या विविधांगी कार्याबद्दल सन 2006 साली भारत सरकारकडून त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले होते. बनबिहारी यांनी … Read more

पैशांच्या वाटणीवरून एकाचा धारदार शस्त्राने खून; तिघांविरोधात गुन्हा दाखल

फलटण | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात चोरीच्या मोटारी विकल्यानंतर आलेल्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून एकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत मृताची पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. राचुर्‍या एकनाथ काळे (वय 29) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून रोशनी राचुर्‍या काळे … Read more