‘लॉकडाउन कामगारांसाठी मृत्यूदंडासारखाचं सिद्ध झाला’; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

नवी दिल्ली । देशात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन करताना २१ दिवसांच्या काळात करोनाला नष्ट करू असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. मात्र, आधी २१ दिवस आणि नंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं लॉकडाउन वाढवावा लागला. त्याचा विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आणि लॉकडाउन शिथिल कार्यात आला. दरम्यान, देशात अजूनही … Read more

मोदींच्या ‘मन की बात’बाबतच्या महिलेच्या पोस्टवर अश्लील कॉमेंट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाबाबत एका महिलेनं सोशल मीडियावर लिहलेल्या पोस्टवर अश्लील कॉमेंट केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात हा प्रकार घडला. एका महिलेने तिघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.या प्रकरणी महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रुद्रा मराठे, अमोल बाग आणि सारंग चपळगावकर … Read more

नोटाबंदी, GST आणि लॉकडाऊन हे मोदींचे ‘मास्टरस्ट्रोक’ नाहीतर ‘डिझास्टर स्ट्रोक’ ठरलेत- काँग्रेस

नवी दिल्ली । काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ढासळती अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून मोदी सरकारवर टीका केलीय. गेल्या ७३ वर्षांत पहिल्यांदाच अर्थव्यवस्था आणि व्यक्ती या दोघांचंही कंबरडं मोडण्यात आलंय. आर्थिक उद्ध्वस्तता आणि आर्थिक आणीबाणीकडे देशाला ढकललं जात आहे. कोसळणारा जीडीपी याचा ढळढळीत पुरावा आहे. नोटाबंदी जीएसटी आणि लॉकडाऊन ‘मास्टरस्ट्रोक’ नाही तर ‘डिझास्टर स्ट्रोक’ ठरलेत असं … Read more

धक्कादायक! पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासगी वेबसाईट narendramodi_inचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलंय. पंतप्रधानांच्या या अकाऊंटला २५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकर्सने यावरुन ट्वीट देखील केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय रिलीय फंडमध्ये क्रिप्टो करंसीने दान देण्याची मागणी याद्वारे करण्यात आलीय. गुरुवारी सकाळी ३.१५ च्या सुमारास हॅकींगचा प्रकार घडला. बिटकॉईनद्वारे कोरोना सहाय्यता निधी द्यावा अशी … Read more

येत्या २६ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करणार

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीला संबोधित करू शकतात. उच्चस्तरीय बैठकीसाठी ग्लोबल बॉडीने जाहीर केलेल्या स्पीकर्सच्या तात्काळ यादीतून ही माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्राच्या ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच यावर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेचे अधिवेशन ऑनलाईन होत असून जागतिक महामारीमुळे देशाचे प्रमुख बैठकीत थेट सहभागी होता येणार नाहीये. या … Read more

नरेंद्र मोंदींच्या ‘त्या’ ट्विटवर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे झाले भावूक, म्हणाले..

नवी दिल्ली । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट आपल्या काळजाला भिडले असल्याचे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटले. प्रकृतीच्या कारणास्तव आबे यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यावेळी भारताचे पंतप्रधान मोदी यांनी आबे यांचे कौतुक करणारे ट्विट केले होते. शिंजो आबे यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांचे ट्विट काळजाला भिडले आहे. भविष्यातही भारत आणि जपान … Read more

‘NEET आणि JEE परीक्षा दिवाळीनंतर घ्या!’; सुब्रमण्यम स्वामींचा पंतप्रधान मोंदीना फोन

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयानं NEET आणि JEE परीक्षा घेण्याला परवानगी दिली. मात्र, NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी-पालक वर्तुळातून होत आहे. त्यामुळं भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. स्वामी यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. “NEET आणि JEE परीक्षा … Read more

…म्हणून जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी देशाची माफी मागत दिला पदाचा राजीनामा

टोकियो । जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. शिंजो आबे पंतप्रधान पदाचा राजीनामा देताना भावूक झाले. “दीर्घ आजारामुळे आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी जनतेची मनापासून माफी मागतो. कारण मी माझं कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नाही. मी काही उद्दिष्ट निश्चित केली होती. ती पूर्ण होण्याआधीच राजीनामा द्यावा लागत … Read more

सिंधुदुर्गातील ‘त्या’ मुलीच्या जिद्दीला सलाम ठोकत खुद्द पंतप्रधान कार्यालय आलं मदतीला धावत

नवी दिल्ली । सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एका मुलीला ऑनलाइन लेक्चर्सच्या माध्यमातून शिक्षण घेण्यात अडचणी येत असल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुलीची मदत केली आहे. या फोटोमध्ये एक मुलगी टेकडीवर नेटवर्क येत असल्याने झोपडीवजा शेडमध्ये ऑनलाइन लेक्चर्सला हजेरी लावताना दिसत होती. यासंदर्भातील बातम्या समोर आल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने या मुलीला मदत करण्यासंदर्भातील सूचना संबंधित … Read more

JEE Main आणि NEET UG परीक्षेवरून ग्रेटा थनबर्गची मोदी सरकारवर टीका, म्हणाली..

नवी दिल्ली । स्वीडनची १७ वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गने कोरोना संकटात भारतात JEE Main आणि NEET UG परीक्षा घेण्याच्या मोदी सरकाराच्या निर्णयावर टीका केली आहे. कोरोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं ग्रेटा थनबर्गने म्हटलं आहे. तिने ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. ग्रेटा थनबर्गने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “भारतातील विद्यार्थ्यांना करोना संकटात … Read more