जुलै मध्ये लॉन्च होणार सरकारची हि नवी स्कीम; लाखो रुपये कमावण्याची संधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत ईटीएफ बाँड जुलैमध्ये पुन्हा आपले दार उघडणार आहे. म्युच्युअल फंडासहित बऱ्याच गुंतवणूकदारांना ईटीएफ बद्दल फारसे समजत नाही. ईटीएफ किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंड हे शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. हे सहसा एका विशिष्ट इंडेक्सचा ट्रॅक ठेवतात.  ईटीएफ हे म्युच्युअल फंडासारखेच असतात. मात्र, या दोघांमधील मुख्य फरक हा आहे की, ईटीएफ हे केवळ स्टॉक … Read more

मोदी सरकारचे २० लाखांचे पॅकेज म्हणजे देशवासियांची क्रूर चेष्टा- सोनिया गांधी

नवी दिल्ली । कोरोना व्हायरस आणि देशातल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी सगळ्या विरोधी पक्षांसोबत आज बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने २० लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज म्हणजे देशाची देशवासियांची चेष्टा आहे. देशभरातल्या स्थलांतरित मजुरांच्या १३ कोटी कुटुंबीयांकडे केंद्र … Read more

नुकसान १ लाख कोटींचं मदत १ हजार कोटींची; मोदींच्या पॅकेजवर ममता संतापल्या

कोलकाता । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अम्फान महाचक्रीवादळानं प्रचंड तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालला १ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याचं सांगत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवरचा आपला राग व्यक्त केला. अम्फान महाचक्रीवादळाचा तडाखा झेललेल्या पश्चिम बंगालची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याच्या … Read more

पंतप्रधान मोदींनी तरी कुठे घराबाहेर पाऊल टाकलं? भाजपच्या टीकेला जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

मुंबई । कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आज आंदोलन केलं. सरकारच्या अपयशाच्या निषेधार्थ भाजपनं आज राज्यभरात ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ हे आंदोलन केलं. ‘काळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध केला. महाराष्ट्र भाजपच्या या सरकारविरोधी आंदोलनाचा समाचार घेतानाच या आंदोलनापासून जनतेनं सावध राहावं, असं आवाहन … Read more

‘अम्फानग्रस्त’ पश्चिम बंगालसाठी मोदींनी जाहीर केलं १ हजार कोटींचं पॅकेज

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्फान महाचक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या पश्चिम बंगाल आणि ओडिशा दौऱ्यासाठी दिल्लीहून कोलकाताला दाखल झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची  हॅलिकॉप्टरमध्ये बसून  हवाई पाहणी केली. या पाहणीनंतर पंतप्रधान मोदींनी ‘अम्फान’मुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालसाठी १ हजार कोटींचं आर्थिक मदत पॅकेज जाहीर केलं … Read more

पंतप्रधान मोदी ‘अम्फान’मुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी पश्चिम बंगाल-ओडिशा दौऱ्यावर

कोलकाता । पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्फान महाचक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या पश्चिम बंगाल आणि ओडिशा दौऱ्यासाठी दिल्लीहून कोलकाताला दाखल झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळे बंगालचं झालेलं नुकसान पाहण्याचं आव्हान पंतप्रधान मोदींना दिलं होतं. त्यानंतर पंतप्रधान आज कोलकाता येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल धनकर कोलकाता विमानतळावर उपस्थित झाले … Read more

प्रधानमंत्री वय वंदन योजनेचा विस्तार, जाणून घ्या गुंतवणूक आणि पेंशनचे नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धापकाळातील उत्पन्नाच्या सुरक्षिततेसाठी पंतप्रधान वय वंदना योजना किंवा पीएमव्हीव्हीवायची मुदत ही पुढील ३ वर्षांसाठी वाढविण्यात आलेली आहे. ही योजना आता ३१ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने नुकताच हा निर्णय घेतला आहे. पीएमव्हीव्हीवाय ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे … Read more

केंद्र सरकारचा घुमजाव! लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याचा आदेश मागे

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग कंपन्यांनी कामगारांना पूर्ण वेतन देण्याचं आवाहन केलं होतं. पण अवघ्या २ महिन्यांच्या आत केंद्र सरकारवर आपला आदेश मागे घेण्याची वेळ आली आहे. मोदींनी दिलेला शब्द त्यांच्याच सरकारच्या एका नोटिफिकेशनमध्ये ३६० अंशाच्या कोनात फिरवला गेला आहे. त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात युनिट बंद असलं तरी कर्मचाऱ्यांना त्यांचा … Read more

”जमलं तर एक पत्र राज्य सरकारला पण लिहा!” फडणवीसांनी हाणला पवारांना उपरोधक टोला

मुंबई  । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अन्य क्षेत्रांबरोबरच शेती आणि ग्रामीण अर्थव्यस्थेलामोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना निवदेन देत केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारलाही एखादं पत्र लिहून मदतीची मागणी करावी, असा टोला देवेंद्र … Read more

बळीराजाला वाचावा! शरद पवारांनी केली मोदींकडे पत्रातून मागणी

मुंबई । कोरोना आणि लॉकडाउनमध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचं आवाहन करणार एक पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे. लॉकडाउनचा आर्थिक फटका शेती क्षेत्राला सुद्धा बसला आहे. अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही आवश्यक पावलं उचलावीत असंही शरद पवार यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. २० लाख कोटींचं पॅकेज … Read more