पाचगणी | महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याबाबप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड (वय -30) व आशुतोष मोहन बिरामणे (वय -22 रा मुन्नवर हौ.सोसा,महाबळेश्वर) याना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर गुरुवारी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाबळेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांचे दोन सुपुत्र सनी बावळेकर व योगेश बावळेकर यांचादेखील समावेश असल्यामुळे महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे.
BREAKING NEWS : साताऱ्यात दगडाने ठेचून एकाचा खून, आरोपी फरार
सातारा | शहरातील शाहुपुरी येथील दिव्यनगरी परिसरात एकाचा आज शुक्रवारी दि. 8 रोजी सकाळी खून केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. संतोष उर्फ विठ्ठल सुळ (वय- 45 वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टोळक्याने दिव्य नगरी परिसरात रस्त्यात अडवून … Read more