जेट एअरवेजने लाँच केली पुणे ते सिंगापूर खास विमान सेवा

Pune to Singapur Jet Airways Flight

पुणे | खासगी वाहतूक सेवा पुरविणाऱ्या जेट एअरवेज कंपनीने १ डिसेंबारपासून पुणे ते सिंगापूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेची अंमलबजावणी यापूर्वी मुंबई, दिल्ली, बंगळूरु शहरात सुरु आहे. लवकरच देशातील अनेक शहरात ही सेवा नेण्याचा निर्णय घेणार असल्याचं एअरलाईनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी सांगितलं. जेट एअरवेयजच्या तिकिटाचा दर २१००० ते ६५००० … Read more

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

Crime Story

पुणे प्रतिनिधी । स्वप्निल हिंगे पती पत्नीत किरकोळ कलह होतच असतात. परंतू जर या कालहाच रूपांतर मोठ्या वादात झालं तर गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊ शकते. अशीच माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट थेरगाव येथे घडली आहे. घटस्पोट मिळवण्यासाठी डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात एच.आय.व्ही. चे विषाणू सोडल्याची धक्कादायक घटना थेरगाव येथे घडल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीसांनी … Read more

पुण्यातील पाटील इस्टेट आगीच्या लोटात

झोपडपट्टी

पुणे | स्वप्निल हिंगे शहराच्या मध्यवर्ती भागात असणार्या पाटील इस्टेट झोपडपट्टी परिसरात आज दुपारी अचानक आग लागली. आगीने घेतलेल्या रौद्र रुपाने आतापर्यंत 100 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या 40 गाड्यांचा ताफा आग विझविण्यासाठी तैनात करण्यात आल्या असून त्या आग विझवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. सहा ते सात … Read more

शरद पवारांच्या गुगली समोर पृथ्वीराज चव्हाण क्लीन बोल्ड

Sharad Pawar

पुणे बीसीसीआय चे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. शरद पवार यांच्या गोलंदाजी समोर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण क्लीन बोल्ड झाले आहेत. सदु शिंदे ओपन स्टेडीयम च्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार यांनी गोलंदाजी केली तर चव्हाण फलंदाजी करत होते. पुणे येथील तळजाई टेकडीवर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. … Read more

बीएनसीएच्या तीन विद्यार्थिनींना देशपातळीवर तिसरा पुरस्कार

Pune

पुणे | लहान मुलांसाठी तयार करण्यात येणार्‍या रूग्णालयाच्या आराखड्यासाठी अखिल भारतीय पातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धेत महर्षी स्त्री संस्थेच्या डॉ.भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील तीन विद्यार्थिनींना तिसरा पुरस्कार मिळाला. सोनाली इंदलकर,वृंदा पानसे आणि ऐश्‍वर्या शेंडगे असी या विद्यार्थिनींचे नावे असून त्या बीएनसीएच्या पर्यावरण वास्तूरचना अभ्यासक्रमातील दुसर्‍या वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत. याशिवाय स्पर्धेत सहभागी … Read more

राधिकाचा ब्लेंडर्स प्राइड मॅजिकल नाइट मधे जलवा

Radhika Apte

पुणे | ब्लेंडर्स प्राइड मॅजिकल नाइट्स या फॅशन सोहळ्याच्या निमित्ताने पुण्याचा आसमंत कधी नव्हे इतक्या दिमाखदार स्टाइलने झळाळून निघाला. या कार्यक्रमात अरुणजाकृत स्वरमेळाच्या अनवट ठेक्यावर गौरी आणि नयनिका यांच्या विविधरंगी स्टायलिश डिझाइन्स प्रेक्षकांसमोर सादर झाल्या. या प्रसंगी गौरी आणि नयनिका यांचे डिझाइन परिधान केलेल्या राधिका आपटे हिने आपल्या स्तिमित करणाऱ्या व्यक्तिमत्वाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. ही … Read more

ट्वीलाईट कॅफे, आजी आजोबांसाठीचं हक्काचं डे केअर सेंटर

Cafe Tweelight

पुणे | सुनिल शेवरे लहान मुलांचे पाळणाघर असतात, डे केअर सेंटर असतात. तसेच वद्धांसाठीचे केअर सेंटर तुम्ही ऐकलत काय? होय अनिकेत पाटील आणि आेंकार अडकीने या दोन तरूणांनी ही वेगळी कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. पुणं तिथं काय उणं या उक्तिप्रमाणे महाराष्ट्रातील पहिले आोल्डीज डे केअर सेंटर कॅफे ट्वीलाईट या नावाने पुण्यात कोथरूड भागात सुरू झाले … Read more

शिष्या स्कुल तर्फे वार्षिक कला प्रदर्शन

Shishya School

पुणे | वाकड येथील द शिष्या स्कुल तर्फे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ.मिलिंद पांडे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी शिष्या स्कुलचे संचालक सिध्दार्थ माहेश्‍वरीजी, मुख्याध्यापिका प्रियम गुंजाल,वरिष्ठ समन्वयक सौ.चॅटर्जी व इरा वाधवा आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनाकरिता भारतातील वेगवेगळी राज्ये आणि त्यांची संस्कृती ही संकल्पना होती. शिष्या स्कुल … Read more

सिटी – एनसीपीए आदी अनंत संगीत महोत्सवाच्या 8 व्या पर्वाची घोषणा

Pune

पुणे | नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) आणि सिटी इंडियाने आज त्यांच्या बहुप्रतिक्षित सिटी-एनसीपीए आदी अनंत: इथून ते अनंतापर्यंत या भारतीय संगीत महोत्सवाच्या 8व्या पर्वाची घोषणा केली. विविध शहरांमध्ये रंगणारा हा महोत्सव 18 नोव्हेंबर रोजी पुण्यातून आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. ख्यातनाम बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि त्यांचे ज्येष्ठ शिष्य रुपक कुलकर्णी यांच्या सुरांनी हा प्रवास … Read more

‘पीएमपी’त होणार घट

PMP

पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे आगामी येत्या नव्या वर्षांत पीएमपीत ४०० गाड्या समाविष्ट होणार असुन ज्यांचे आयुर्माण संपले आहे. अशा शंभर ते दीडशे गाड्या बंद करण्यात येणार आहे. यामुळे संख्येत पुन्हा कमतरता जाणवनार आहे. त्यामुळे नव्या गाड्या मिळूनही पीएमपीत घट राहण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकसंख्या पाहता आठ ते नऊ लाख प्रवाशांना पीएमपी’कडून … Read more