पाचगणीच्या बसस्थानकात पाण्याचे तळे : आगार प्रमुखाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांचे हाल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाचगणी बस स्थानकात पावसाचे पाणी साचत असल्याने पाण्याचे तळे बनल्याने शालेय विद्यार्थी या पाण्यात मनसोक्त खेळताना दिसत आहेत. तर बसस्थानकात पाणी साचत असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी जागा नसल्याने ते ताटकळत उभे रहात आहेत. आगार प्रमुखाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशामधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

वीर धरणातून पुढच्या 24 तासात पाणी सोडणार : नदीकाठी सतर्क रहावे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले वीर धरण 82.53 टक्के भरलेले आहे. वीर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून पुढील 24 तासात धरणातून नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे फलटण नीरा उजवा कालवा विभागाचे अभियंता सं. रा. बोडखे यांनी त्याबाबतचे पत्र … Read more

पुनवडी पुलाचा भराव संततधार पावसाने वाहून गेला : बारा गावे संपर्कहीन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर तालुक्यातील केळघर परिसरात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पुनवडी पुलाचा भराव वाहून गेला आहे. या पुलाचा भराव वाहिल्याने 10 ते 12 गावांचा केळघर- मेढ्याशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या 10 दिवसापासून पावसाने कमी- जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे. तर जावळी, महाबळेश्वरसह कोयना धरण क्षेत्रात … Read more

पाटण तालुक्यात 80 कुटुंबाचे स्थलांतर : रमेश पाटील

सातारा | पाटण तालुक्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे व संभाव्य अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन, दरड कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तीचा धोका टाळण्यासाठी तालुक्यातील 5 गावातील 80 कुटुंबातील 310 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याची माहिती पाटणचे तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी, सध्या पाटण तालुक्यात सर्वच विभागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. गतवर्षीचा नैसर्गिक आपत्तीचा … Read more

पाटण तालुक्यात पुन्हा भूस्खलन : प्रशासन सतर्क

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील डोंगर- दऱ्यातील पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून पाटण तालुक्यासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. काटे- अवसरी परिसरातील खुडपुलेवाडी आणि जितकरवाडी येथे भूस्खलन झाल्याचे ट्विट प्रातांधिकारी सुनील गाढे यांनी केले आहे. #सातारा #पाटण तालुक्यातील काटे अवसरी परिसरातील खुडपुले वाडी येथे … Read more

डेळेवाडी खिंडीत दरड कोसळली, रस्ता बंद

कराड | ढेबेवाडी आणि पाटण रोडला जोडणाऱ्या कोळेवाडी- तांबवे या मार्गावरील डेळेवाडी खिंडीत दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. ढेबेवाडी मार्गावरील अनेक गावांना मल्हारपेठ, उंब्रज, सुपने- तांबवे तसेच सातारा येथे जाण्यासाठी हा मार्ग सोमवार दि. 11 रोजी सकाळपासून बंद झाला आहे. त्यामुळे आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- ढेबेवाडी … Read more

ढेबेवाडी खोऱ्यातील 25 गावांचा संपर्क तुटला : पुलाचा भराव वाहून गेला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ढेबेवाडी खोऱ्यातील निवि कसणी, घोटीलसह 25 होऊन अधिक दुर्गम भागातील गावांना व वाड्यावस्त्यांना जोडणारा पवारवाडी- महाईंगडेवाडी येथील पुलाचा भराव वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यात या मार्गावरील पूल उध्वस्त झाला होता, त्यानंतर भराव भरून वाहतूक सुरू होती. परंतु हा भरावही पहिल्याच पावसात वाहून गेल्याने आता वाड्यावस्त्यांचा संपर्क तुटला आहे. … Read more

महिंद धरण ओव्हर फ्लो : धरण क्षेत्रात स्टंटबाजी करणाऱ्यावर पोलिसांचा कारवाईचा इशारा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ढेबेवाडी विभागातील वांग नदीवरील महिंद धरण अवघ्या दोनच दिवसात ओव्हर फ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असून धरणाच्या लाभक्षेत्राची उन्हाळभराची चिंता मिटल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान धरण क्षेत्रात कुणी पोहोताना तसेच सेल्फी काढताना किंवा जीव धोक्यात घालून स्टंट करताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार … Read more

वेण्णालेक ओव्हरफ्लो : सातारा जिल्ह्याला 12 जुलैपर्यंत रेड अलर्ट

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर पाचगणी, जावळी, पाटण या पूर्वेकडील भागात रात्रीपासून पावसाने सपाटा लावला आहे. महाबळेश्वरला पाणीपुरवठा करणारा वेण्णा तलाव ओव्हरफ्लो झाला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे महाबळेश्वरकर वासीयांच्या पिण्याची पाण्याची चिंता आता मिटली आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासह पुणे, रत्नागिरी आणि रायगड … Read more

कोयना धरणात 25 टीएमसी पाणीसाठा : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात पावसाने चांगली सूरूवात केली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातसह कोयना, नवजा, महाबळेश्वर, जावली येथे ही पावसाने चांगलाच जोर धरला आहे. तर उत्तर कोरेगाव भागातही पेरणीयोग्य पाऊस पडू लागला आहे. पाटण, महाबळेश्वर तालुक्यासह डोंगर- दऱ्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत. वेण्णा लेकही भरून वाहू लागला आहे. तर कोयना धरणात आज … Read more