आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सहकार्यातून तात्काळ मदतकार्य सुरु करावे : ओ. पी. गुप्ता

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस पडत आहे. कुठेही अतिवृष्टीमुळे आपत्ती निर्माण झाली तर त्या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्यातून तात्काळ मदतकार्य सुरु करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव ओ. पी. गुप्ता यांनी दिले. जिल्हास्तरीय मान्सून पूर्वतयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकामी आढावा बैठक श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न … Read more

कसणी घोटीलसह 25 गावांचा संपर्क तुटण्याची भीती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अनेक दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांच्या दळणवळणासाठी उपयुक्त असलेला आणि भरावाच्या तात्पुरत्या मलमपट्ट्यांनी बांधलेला ढेबेवाडी विभागातील दुर्गम कसणी गावाजवळचा पूल पावसाचा जोर वाढल्याने पाण्याखाली जाण्याची भीती आहे. भराव टाकलेला वाहून जाण्याची भीती असून वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुलापलीकडील कसणी घोटील, निगडे, महेंगडेवाडीसह अनेक वाड्यावस्त्या संपर्कहीन होण्याची शक्यता असल्याने … Read more

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी कुठे संपर्क करायचा ते पहा : कराडला NDRF टीम दाखल

सातारा | जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच खबरदारीच्या उपायोजना म्हणून एनडीआरएफचे एक पथक आवश्यक त्या साहित्यासह कराड येथे दाखल झाले आहे. या आपत्ती व्यवस्थापन कक्षांमध्ये तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या दुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी तहसील कार्यालयांमधील दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी … Read more

कराड शहरात धोकादायक झाड इनोव्हा गाडीवर कोसळले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात आज दिवसभर पावसाची रिमझिम सुरू आहे. अद्याप पावसाची जोरदार अशी बॅंटींग सुरू नाही. मात्र, दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास एक धोकादायक झाड कोसळून इनोव्हा गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने आज मंगळवार असल्याने बाजारपेठ बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कराड नगरपालिकेने अशी धोकादायक झाडे तसेच त्याच्या फांद्या तोडण्याची गरज … Read more

पसरणी घाटात पिकअप दरीत झाडावर लटकली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई- पाचगणी मुख्य मार्गावर पसरणी घाटातील नागेवाडी फाट्या नजिकच्या वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने मालवाहू पिकअप गाडी आज दुपारी बाराच्या सुमारास दरीत जाता जाता वाचली. दैव बलवत्तर म्हणून जिवितहानी झाली नाही. पाचगणीहून वाईकडे जात असताना नागेवाडी फाट्यानजिक वळणावर गाडी डाव्या बाजूचा कठडा तोडून पुढील बाजू दरीकडे झुकली नि दरीच्या काठावर … Read more

हुंबरणे गावाची वाट बंद : वनक्षेत्रपालांच्या गलथानपणामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांना शिक्षा

कराड | हुंबरणे (ता. पाटण) हे मोरणा खोऱ्यातील गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असून ह्या गावाला जाणारा 800 (आठशे ) मीटर रस्ता वन हद्दीतून जातो. मार्च अखेरीला वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर राक्षे यांनी घाई गडबडीने 800 मीटर रस्त्याकडेला गटार काढले व त्याची माती रस्त्यावरच टाकली. या वनक्षेत्रपाल राक्षे यांच्या मनमानी कारभारामुळे आता वाहतूक बंद झाली आहे. … Read more

सातारा जिल्ह्यात पुढील 4 दिवस पाऊस : ऑरेंज, यल्लो अलर्ट

Rain

सातारा | सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दि. 5 ते दि. 8 जुलै दरम्यान ऑरेंज आणि यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. कोयना धरण परिसरात सोमवारी रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सध्या कोयना धरणात 16 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हवामान खात्याने दि. 5, 6, 7 या … Read more

कोकणात तुफान पाऊस : कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला

पुणे | राज्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात पूरस्थिती निर्माण होवू लागली असताना कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे कोकणात अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक, नदीकाठची मंदिरे, बंधारे पाण्याखाली गेली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यातही मंगळवारी पहाटे पासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे आता शेतात पेरण्यास मोठ्या … Read more

जिंती येथील पुनर्वसना प्रश्न अंधातरीच : अतिवृष्टीत भूस्खलनाच्या भीतीने गावकरी मुंबईकडे रवाना

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत भूस्खलन होऊन डोंगर घसरल्याने चोहोबाजूंनी संकटात सापडलेल्या आणि प्रशासनाने महापुरात रेस्क्यू ऑपरेशन राबवीत सुरक्षितस्थळी हलविलेल्या जिंती (ता. पाटण) विभागातील जितकरवाडी व वाड्यावस्त्यांतील कुटुंबांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत वर्षभरात कार्यवाही झालेली नाही. तेथील तुटलेल्या पुलावर तातडीच्या संपर्कासाठी उभारलेला लोखंडी सांगाडाही यंदाच्या पावसाळ्यात वाहून जाण्याची भीती असल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. … Read more

भोजलींग डोंगरावर वीज पडून मेंढपाळाचा जागीच मृत्यू

दहिवडी | जिल्ह्यातील माण तालुक्यात विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसात अंगावर वीज पडून एका मेंढपाळचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. भोजलींग डोंगरावर शेळ्या- मेढ्या घेवून गेलेल्या मेंढपाळबाबत ही दुर्घटना घडली. काल सातारा जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण असते. दुपारच्या सुमारास वादळी वा-यासह पाऊस पडला. माण- खटाव तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. माण तालुक्यातील कापुसवाडी … Read more